Skip to main content

झटपट पराठा

लेखक यशोधरा यांनी रविवार, 30/06/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
..तर, पराठे बनवायची लहर आली होती पण जास्त पसारा करायची तयारी नव्हती. झटपट काय करता येईल ह्याचा अंदाज घ्यायला पाककृती पुस्तकं, जमवलेल्या रेश्प्या वगैरे पाहून झाल्या पण सोपं पण मस्त असं पटकन् आवडून जाईल, असं काही सापडलं नाही. नेहमीचा साधा पराठा तर नको होता. काय करावं, काय करावं हा विचार करत आंतरजालावर धांडोळा घेताना ही एक मस्त चटपटीत आणि पटकन् करता येईल अशी पराठ्याची कृती सापडली आणि बनवलेले पराठे घरी आवडले, म्हणून इथे पण सगळ्यांसाठी लिहूया, म्हटलं. पाककृती आणि फोटो - आंतरजालावरून साभार. आमच्यात स्वयंपाक बनवतात आणि मग डायरेक्ट खातात, मध्ये फोटो गिटो काढत बसायला वेळ नसतो, पण मिपावर फोटो नसतील पाककृती फाऊल असा एक ( वाईट्ट) नियम आहे, म्हणून हे आपले तोंडी लावण्यापुरते फोटो. तर, आपल्याला लागणार- मळलेली कणीक थोडे जिरे किंवा जिरेपूड तिखट पुदिन्याच्या पानांचा चुरा असेल, तर वा! वा! तूप / तेल ( तूप किंवा तेल वापरू शकता) कणिक मस्तपैकी मळून घ्यायची. पराठे करताना, प्रथम तवा तापायला ठेवायचा. आता, नेहमी चपात्या/ पोळ्यांसाठी घेतो, त्यापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, पुरीसाठी करतो, त्यापेक्षा थोडा मोठा आकार होईल, इतपत लाटायचे. आता ह्या लाटलेल्या पातीवर एक - दोन चिमटीभर तिखट, जिरे ( किंवा जिरेपूड) घाला. 20190630-171810 असला तर पुदिन्याच्या सुकवलेल्या पानांचा चुरा पसरा. माझ्याकडे चुरा नव्हता, पण पुदिन्याची पाने होती, ती बारीक कापून तीच घातली. पुदिन्याच्या पानांचा चुरा टाकून, असं दिसेल. 20190630-171832 आता ह्यावर एक दोन चमचे तूप टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचे व घडीच्या पोळीप्रमाणे लाटायचे. खूप पातळ लाटायचे नाही. तव्यावर आता हा लाटलेला पराठा भाजायला टाकायचा. 20190630-171853 खालची बाजू जरा भाजली की परतून घ्यावी, आता वरच्या बाजूला तूप लावावे व पराठा थोड्या वेळाने पुन्हा परतून दुसऱ्या बाजूलाही तूप लावावे व दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजावा. 20190630-171909 दही/ सॉस/ चटणी बरोबर खाण्यासाठी किंवा तसाच खायला पराठा तयार! 20190630-171719 इति श्री आंतरजालम् पराठापुराणम् संपूर्णम्|

वाचने 32972
प्रतिक्रिया 61

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) अंडे घालून कसे लागेल आणि २) पुदीना नसता तर तसाच चहात बुडवून खाता येईल असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

कोंबडीवर्गीय प्राण्याने म्हटले असते तर समजण्यासारखे होते पण कोंबड्याने ????

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा .... हा .... हा हे बाराखडीच्या व्याकरण नियमा नुसार आहे ! मैद्यातल्या मी च्या जागी प फ ब भ म कोणताही ओष्ठय उच्चार वापरू शकतो. भैदा, बैदा, फैदा इ. खरंतर भैदा म्हणायला हवंय, लगेच एक मागचं अक्षर चालत नाही ना ! मग त्या पुढचं अक्षर ब .... बैदा ! (अशीच आपली गंमत :-) )

In reply to by प्रचेतस

अंडे घालून किती वेळ झाला आहे किंवा थकवा आला आहे त्यावर ते अवलंबून आहे.

In reply to by प्रचेतस

अंडे खात नाही म्हणूनच ते (कचर्‍याच्या डब्यात) टाकण्याचा प्रश्न आला असेल (खरे बघितले तर, उत्तर, आले असेल). ;)

In reply to by प्रचेतस

आयतं जाग्यावर मिळतं, असं म्हणतात. अर्थात ही आमच्या पिढीची गोष्ट. आता महिलाही नोकरी करत असतात तेव्हा कामं वाटून घेऊन करावी लागतात. त्याला आयतं जाग्यावर मिळतं हे फिलिंग येत नाही असे म्हणतात. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

सरांनी बनवलेलं काही म्हणजे गुळण्यांसाठी मिठाचं पाणी वगैरे का?

In reply to by गवि

अगदी अगदी, किंवा चहा म्हणून नुसतीच मिक्स केलेली चायपत्ती साखर वगैरे वगैरे.

In reply to by प्रचेतस

नुस्तं एक सिंगल आमलेट केलं त्याचा पार चौथा झाला. मग मित्र म्हणे दोनचं करा तेव्हा जरा जमलं. पण काही वेगळं केलं तर पाकृ करतो. अंड्याचा पराठा करतो. -दिलीप बिरुटे

चला आता इथे रेसिपीचे जिन्नस शोधणे आले. मी इथे फार्मर्स मार्केटमधून पुदिना आणला आहे. बाकीचे सामान इथे इंडियन ग्रोसरीत मिळेल असं वाटतं.

In reply to by गवि

आपण जेव्हा ही रेशेपी कराल तेव्हा फोटु टाका प्लीज. नै तर लोक नुसते म्हणतात करून पाहू. वगैरे ते थापा मारल्यासारखं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

आदरणीय गविसेठ नेहमी म्हणतात यव करून पाहीन त्यव करून पाहीन त्यांच्याबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून म्हणावेसे वाटते त्यांना काहीच जमत नसावे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही दर्शविलेल्या या आदराने मी अगदी गहिवरलो आहे. गळा दाटून आला. डोळे पाणावले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्याबद्द्ल अगदी सहमत. ते इंडियन ग्रोसरीतही जायचे नाहीत ह्याबद्द्ल खातरी आहे.

सोप्पी आणि छान पाककृती यशोधरा ताई :) आम्ही ऑफिसला निघायचा आधी वेगळा नाष्टा करण्याएवजी कधी कधी हेच खातो गरम गरम चपात्या लाटताना असे करतो आणि त्यावर तुप घालून पटकन चपातीचा रोल करुन गरम गरम चपाती फस्त .... आ.. हा.. हा... मस्तच लागते

हा दंगा वाचून खूपच मज्जा आली! कधी काळी मिपावर अस्साच दंगा होत असे, त्याची आठवण आली! =)) सर्व दंगेकर्यांना त्यांनीच बनवलेले पराठे बक्षीस!

In reply to by यशोधरा

सर्व दंगेकर्यांना त्यांनीच बनवलेले पराठे बक्षीस!
हे राम. काही पराठासदृश पदार्थांना धपाटे असं का म्हणतात ते कळलं. ;-)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती अवांतर कराल? तुम्ही, प्रचेतस वगैरे ज्येष्ठ मिपाकर असे अवांतर करताना बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

In reply to by गवि

संक्षि म्हणून माझे एक मिपाकर मित्र आहेत त्यांना पण चांगले पराठे येतात म्हणे... हल्ली दिसत नै ते. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

>>>>>आम्ही मूली/कोबी /बटाटा याने आल्लु पराठे खाऊन दिवस काढतोय. तुम्ही मुलींनी इतर भाजीपालाही करून पाहिला पाहिजे असे वाटते. ;) (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

आमच्यात स्वयंपाक बनवतात आणि मग डायरेक्ट खातात
काय सांगता ?? आम्ही तर कोणताही पदार्थ बनविण्याअगोदरच मनातल्या मनात (मांडे) खातो.

इतक्या किचकट नि खटपटीच्या पाकृला लोक्स सोप्पी सोपी का म्हणताहेत हेच कळेना ! बाकी, यशो धन्य हो. येवढा पेशण्स माला नै बै जमत __/\__ काही ज्येष्ठ मिपाकर्स ईतक्या चांगल्या धाग्यावर बेक्कार धुडगूस घालताना दिसले ! उगाच नाही, मिपा सौंस्क्रूती बुडाली ;)

In reply to by सस्नेह

काही ज्येष्ठ मिपाकर्स ईतक्या चांगल्या धाग्यावर बेक्कार धुडगूस घालताना दिसले !
का नाही घालणार धुडगूस ? यशोमती मैय्या हल्ली फक्त प्रतिसादा पुरत्याच उरल्या होत्या ! कित्ती दिवसांनी पेर्त्या झाल्यायत त्या !

खायचा सोडून त्या अंड्याचा इतका किस पाडलाय की कोंबडीला ओव्हर टाईम करायला लागेल. साधी पोळीची कणीक चालेल काय. भाकरी जमतात पण पोळीची कणीक नेहमीच धोका देते पातळ ते अतिशय घट्ट असा प्रवास करीत दोन माणसांना पुरेल अशी सुरुवात करुन सात माणसाच्या पुरवणी इतकी कणीक मळल्याचा अनुभव गाठीशी आहे तेंव्हा हा धाडसी प्रयोग निवांत वेळेत करण्यात येईल. लेकीला आवडला कि बाकी कुणाच्या पसंतीची मोहोर नसली तरी चालेल. नाखु पांढरपेशा

In reply to by नाखु

१. सर्वात आधी कुणाकडून तरी पोळ्यांची कणिक मळून घेणे... बाकी मग यशोतैंच्या रेशिपीनुसार करा. हाकानाका.

ते पराठ्याला किती जोरात लाटायचं .. आणि आम्ही पुरुष ते फक्त खाऊ शकतो कि बनऊपण शकतो .. मी हे सिरियसली इचारतोय कारण मला या रविवारी बनवायचाय म्हणून ..

In reply to by चामुंडराय

हायला तुमचा प्रतिसाद वाचून आनंदरावांचा एका हॉटेलच्या सर्विस रिव्यू वाला धागा आठवला :)

मस्त.... पुदिना आवडतो. त्यामुळे बटाट्याचे पराठे करतांना किंवा खिमा पराठे करतांना पुदिना घालून बघायला हवा.