✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वटवटसावित्री

ख — खिलजि, Sat, 06/15/2019 - 16:36
हे देवी वटसावित्री मी पण पूजेन तुला लपून छपून फेरे घेईन उद्या पौर्णिमेच्या रात्री माझे सर्व काळे धंदे अव्याहतपणे चालू देत सदैव कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या नाहीतर होतील माझे वांदे मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी फार कठीण गं , झेलणं तिला ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष पण दुर्दैवाने वटवटसावित्री वटवट करूनच मारते माझ्या नावाने फेरे नेहेमी मागते देवाकडे मिळू देत याचे सर्व धागेदोरे इतकी वर्षे लोटली कळला नाही तुझा महिमा आज तुला मी शरण जातो बघ थांबव माझी दैना सूत घेऊनि, दिवा लावेन रोवेन मी पण एक फांदी पानसुपारीची व्यवस्था व्हावी जेणे होईल माझी चांदी हे वर्ष जर गेले निर्विकार वाहेन पुढच्या वर्षी हार गुप्त राहू देत हरेक धंदे जरा दाखव तू चमत्कार {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

प्रतिक्रिया द्या
2406 वाचन

💬 प्रतिसाद (4)

हॅप्पी कॉन्ट्रॅक्ट रिन्युवल डे मिपाकर्रस्

चामुंडराय
Sun, 06/16/2019 - 03:08 नवीन
अगदी समयोचित क्विता हॅप्पी कॉन्ट्रॅक्ट रिन्युवल डे मिपाकर्रस्
  • Log in or register to post comments

भारीच रोचक आहे

नाखु
Sun, 06/16/2019 - 10:25 नवीन
जो दोर्यात गुंतला तो फेर्यात अडकला आणि तंतूने बांधल्या रेशीममिठीसाठी. आज बापदिवस आणि बापाच्या बॉसचा सण एकाच दिवशी. आडबाजूच्या वठवृक्ष सोबतीचा नाखु
  • Log in or register to post comments

छान ! ;-)

दुर्गविहारी
Sun, 06/16/2019 - 18:14 नवीन
छान ! ;-) बाकी एक फॉरवर्ड टाकतो. सर्व मैत्रिणींना, भागिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! सात जन्म घरात तुमचीच 'वट' राहो .
  • Log in or register to post comments

अत्रुप्तम प्रतिसादम चौर्यम

खिलजि
Mon, 06/17/2019 - 12:04 नवीन
अत्रुप्तम प्रतिसादम चौर्यम आवडम म्हणूनम चौर्यम सर्वेषाम धन्यवादम सर्वेषाम धन्यवादम
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा