झुंबर

Primary tabs

नूतन's picture
नूतन in मिपा कलादालन
13 May 2019 - 7:14 pm

आकाश कंदील मला फार आवडतो.
दिवाळीचे दिवस,तो सुखद गारवा,ती तिन्हिसांज आणि कंदिलाच्या रंगीबेरंगी कागदातून पाझरणारा सौम्य शांत प्रकाश. वाऱ्याबरोबर सळसळणाऱ्या त्या लांब लांब झिरमिळ्या. अहाहा! कित्ती आनंददायी अनुभव!
दिवाळीचे चार दिवस भुर्रकन उडतात. कंदील उतरवायची कल्पनासुद्धा मला नकोशी वाटते. मग म्हणायचं, काय घाई आहे, देवदिवाळी झाली की काढूया! पण देव दिवाळी नंतर काय कारण शोधायचं? पण इच्छा तिथे मार्ग.
मला कारण सापडलं. नाताळ ते इंग्रजी नव वर्षदिन म्हणजे, स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे परदेशस्थ भारतीयांचे मायदेशी परतण्याचे दिवस! साहजिकच परदेशी असलेला लेक येइपर्यंत असू दे म्हटलं कंदील! शिवाय साधु संत येती घराच्या चालीवर...मुलं बाळं येती घरा,तोचि दिवाळी दसरा....नाही का? मी माझ्यावरच खूष झाले.
पण १ जानेवारीही गेला. माझा आकाश कंदील जमिनीवर उतरला. त्या रिकाम्या जागेकडे बघून फार उदास वाटू लागलं. विचारचक्र फिरत राहिलं. काहीतरी करण्यासाठी बोटं शिवशिवू लागली. कचऱ्यातून कला की कलेतून कचरा यावरून नेहमीच टोमणे ऐकावे लागतात.(कलेचा कचरा खूपच असतो हे गुपचुप कबूल करायला हरकत नाही)असो, तर मग ठरलं की ’लेफ्ट ओव्हर रेसिपिज’प्रमाणे उरल्या सुरल्या कला सामानातूनच काहितरी करायचं आणि क्विलींगच्या पट्ट्या, दोरे, मणी, टिकल्या वापरून तयार झालं हे झुंबर.............

k1

k2

आकाशदिव्याची जागा झुंबराने सजली. पुन्हा एकदा कोणत्याही ऋतूमासातली तिन्हीसांज आणि पश्चिमवारा मला आता तीच अनुभूती देणार होता.

प्रतिक्रिया

पैलवान's picture

13 May 2019 - 8:39 pm | पैलवान

अकॅसेस इल्ले

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2019 - 9:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

"पब्लिक अ‍ॅक्सेस" नसल्यामुळे फोटो दिसत नाहीत.

गुगल फोटोवर एक स्वतंत्र शेअर्ड अल्बम बनवा व त्यात तुमचे फोटो साठवा. नंतर त्यांचे दुवे वापरून ते फोटो इथे टाकल्यास, दिसतील.

नूतन's picture

13 May 2019 - 9:36 pm | नूतन

मला दिसत आहेत.
तरीपण बघते परत.

तुम्हीच टाकलेले फोटो तुम्हाला स्वतःला अॅक्सेस असल्याने दिसतीलच पण इतरांना तसा अॅक्सेस नसल्याने दिसणार नाहीत.

नाखु's picture

14 May 2019 - 9:14 pm | नाखु

निरभ्र दिसले,झुंबर काही दिसेना.
मी म्हटलं मीच पापी म्हणून दिसेना.
पुढील सोमवारी बघू.

सूमडीत कोंबडी वाचकांची पत्रेवाला नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2019 - 10:35 am | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम कलाकृती !!!

नूतन's picture

15 May 2019 - 11:46 am | नूतन

धन्यवाद

मस्त बनवले आहे झुंबर! लाईट लावल्यावर फारच छान दिसतंय.

चौथा कोनाडा's picture

15 May 2019 - 1:39 pm | चौथा कोनाडा

आता दिसताहेत फोटो !

वाह, क्या बात हैं !
सर्व झुंबरे आवडली. क्लासिकच !

नूतनजी, तुमच्या कला कौशल्याला सलाम ! _/\_

नूतन's picture

15 May 2019 - 8:34 pm | नूतन

प्रतिक्रिये बद्दल आभार

दीपक११७७'s picture

22 May 2019 - 12:45 pm | दीपक११७७

सर्व झुंबरे आवडली

जालिम लोशन's picture

22 May 2019 - 4:03 pm | जालिम लोशन

टिकावु आणी मळखावु दिसते आहे

दीपक११७७'s picture

22 May 2019 - 4:31 pm | दीपक११७७

मळखावु

नूतन's picture

24 May 2019 - 3:39 pm | नूतन

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
मळखाऊ दिसत नाही, मळखाऊ होण्यायोग्य आहे.
टिकाऊ! कागदाचं असल्यामुळे फार नाही. पण पुन्हा पुन्हा करून टिकवून ठेवणं शक्य आहे.

हातात कला कौशल्य आहे तुमच्या. खूपच छान! प्रकाशात तर खासच दिसतंय!

Namokar's picture

15 Jul 2019 - 7:01 pm | Namokar

खूपच छान केलय

बाजीगर's picture

28 Aug 2019 - 4:20 am | बाजीगर

छान आहे,आवडले,
अशीच कल्पक कलात्मकता दाखवत रहा.

नूतन's picture

18 Sep 2019 - 5:29 pm | नूतन

धन्यवाद

बबन ताम्बे's picture

18 Sep 2019 - 10:28 pm | बबन ताम्बे

सुंदर कलाकृती !