पाणीपुरीची पुरी

आरती.'s picture
आरती. in पाककृती
2 May 2019 - 2:24 pm

IMG_20190130_144015

साहित्य:
पाव किलो - बारीक रवा
मीठ - 1/2 टी स्पून
खायचा सोडा - 1/4 टी स्पून
तेल - 1 टीस्पून
पुर्या तळण्यासाठी 1 टेबलस्पून तेल

पाव किलो रव्यापासून 42 पुऱ्या झाल्या

कृती:

रवा, मीठ, सोडा आणि तेल मिक्स करून थोड थोड पाणी घालुन पीठ घट्ट मळुन घ्या. हे पीठ एका भांड्यात झाकुन अर्धा तास झाकुन ठेवा.
मी सकाळी पीठ मळून ठेवल पण नंतर मला वेळ नव्हता म्हणुन मी संध्याकाळी पाणीपुरीच्या पुऱ्या केल्या तरीही खुप मस्त्त झाल्या.

पीठ पुन्हा मळून चपातीच्या पीठाला गोळा घेतो तेवढा घेऊन चपाती लाटा. पानी पुरी च्या आकारा च झाकण किंवा कडा असलेली वाटी घेऊन त्याने पाणीपुरीचा आकार द्या. सर्व पुऱ्या अशा बनवून घ्या.
IMG_20190130_135044

कढ़ईंत तेल तापवून मिडीयम फ्लेम वर पुर्या तळून घ्या. ह्या पुरया अजिबात तेलक्ट होत नाहीत आणि तळताना तेल पित नाहीत, ख़ुप कमी तेलात तळून होतात.
IMG_20190130_135320

IMG_20190130_142247

टीप:
1.पीठ घट्ट मळून घ्याव.
2.पुरी तळून झाल्यावर जऱ नरम पडली तर ओव्हन मध्ये पाच मिनिट बेक करा.ओव्हन नसेल तर पुरया पुन्हा तळून घ्या

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

2 May 2019 - 2:35 pm | श्वेता२४

फोटोही सुरेख. पाणीपुरी अतिशय जिव्हाळ्याचा विषय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2019 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाणीपुरी अतिशय जिव्हाळ्याचा विषय.

सेम टू सेम.

-दिलीप बिरुटे

आरती.'s picture

3 May 2019 - 7:39 am | आरती.

धन्यवाद श्वेता24

अरे वा पाणीपुरीच्या पुर्‍या मस्त फुगलेल्या दिसत आहेत. आवडल्या..

यशोधरा's picture

6 May 2019 - 8:37 am | यशोधरा

छान! फोटो मस्त.
पाणीपुरी पुऱ्यांचा आकार जरा लहान हवा ना?

धन्यवाद दिलीप बिरुटे, पिंगु, यशोधरा.
पुरयांचा आकार लहान आहे.

गवि's picture

6 May 2019 - 8:49 pm | गवि

छान आहेत.

पण पाव किलो रव्यात (बारीक का असेना) केवळ एक टीस्पून (चहाचा चमचा) इतके तेल घालून त्याचा मळून लाटण्यासारखा गोळा होतो? आणि एक टेबलस्पून तेलात ४२ पुऱ्या तळून होतात?

एकावेळी एकच पुरी तळली का? की माझी टेबलस्पूनची कल्पना चुकतेय?

उगा काहितरीच's picture

6 May 2019 - 9:15 pm | उगा काहितरीच

तेल + थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तेल मोहन म्हणून (चुभुद्याघ्या) घालायचं आहे.

बाकी अशा प्रकारे छान होतात पुऱ्या. फक्त केल्यानंतर २-३ तासांनी घ्यायच्या म्हणजे तेलकटपणा कमी होतो व अजूनच छान कुरकुरीत लागतात.

गवि's picture

7 May 2019 - 11:12 am | गवि

धन्यवाद.. !

सस्नेह's picture

14 May 2019 - 4:09 pm | सस्नेह

भारी दिसताहेत पुर्‍या.

नूतन सावंत's picture

31 May 2019 - 9:44 am | नूतन सावंत
नूतन सावंत's picture

31 May 2019 - 9:45 am | नूतन सावंत
नूतन सावंत's picture

31 May 2019 - 9:45 am | नूतन सावंत
Namokar's picture

19 Jun 2019 - 5:14 pm | Namokar

मस्त...