पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते
माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ?
नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली
उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला
काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली
कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला
सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला
सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली
सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता
तो धावत आला सापाला पकडले अन डाळ पिशवीत भरली व सर्पोद्याना कडे निघाला
वाटेत कचरा कुंडीत डाळीची पिशवी टाकली
इकडे काकू पण नॉर्मल ला आल्याहोत्या सोसायटीचे लोक्स पण पांगले
अघटित टाळले म्हणून काकू नी देवाचे अआभार मानले
जर काकूंच्या लक्षात न येता त्यांनी डाळ कुकरली असती तर साने गुरुजींना
"साप डाल तडका " खायला मिळाला असता
मात्र पावशेर डाळ वाया गेली म्हणून काकूंना दिवस भर चूटपूट लागली
अकु काका , तुम्ही वोटिंग करता का ?
नाही म्हणजे , मी आपलं सहजच इचारलं
हि घटना खरी मानायची कि खोटी ?
त्याच काय आहे , आज आमच्या मुंबैत इलेक्षन हाय
सर्वाना सुट्टी आणि आम्हालाच न्हाय
साप डाळीत होता कि पाण्यात
ते तुम्ही नीट लिवलंच न्हाय
त्वरा करा,, चला उठा
लवकर टंकून टाका बरं
पावशेर डाळ वाया गेली
==)) ==)) ==))
एका वेळेला पावशेर डाळ..
काका मला तुमचे निरागस लेखन
नाग नंदिनी ऐवजी
In reply to नाग नंदिनी ऐवजी by श्वेता२४
मी तर नागनंदिनी सोसायटीत साप
+१ हीहीही