ऍव्हेंजर आणि मी..
ऍव्हेंजर फॅन कोणी आहे का ?
एक प्रश्न आहे गरिबाला...
तो ऍव्हेंजर्स एन्ड गेम सिनेमा आलाय तो एकदम फायनल म्हणायचा का? म्हणजे विषय संपला का एकदाचा?
पुढचं लिहीण्याआधीच सांगतो, वर्षभराने 'ऍव्हेंजर्स उरलंसुरलं' नावाने सिनेमा येणार असल्यास माझी काहीही हरकत नाही. मी ऍव्हेंजर्स विरोधी नाही. आणि मार्व्हल व्हर्सेस डीसी वगैरे फंदात तर मला मुळीच पडायचं नाही. आमच्यालेखी मार्व्हेल, डीसी म्हणजे शिवसेना-मनसे आहेत. म्हणजे एकाला झाका दुसऱ्याला काढा फरक नाही.
असो.
मुद्दा एवढाच आहे की, साधारण अजून किती वर्ष हे बघायचं आहे ह्याचा एक अंदाज घ्यावा म्हटलं.
बाकी ऍव्हेंजरची समीक्षा करण्याची आमची लायकी नाहीच हे जगजाहीर आहे.ह्यांचं सगळंच अवाढव्य आणि माझ्या आकलनशक्ती पलीकडलं ! मी ह्यांचा एक सिनेमा बघितला होता. साहजिकच तो मला कळला नाही. हे शल्य एका मित्राला सांगितल्यावर तो म्हणतो कसा,
"अरे असं कसं समजेल तुला. आधी आयर्न मॅनचे तीन पार्ट बघ. मग थॉरचे तीन पार्ट बघ. त्यानंतर कॅप्टन अमेरिकाचे किमान २ भाग बघायचे. यानंतर एजेस ऑफ अल्ट्रॉन नाही बघितला तरी चालेल पण एन्ट मॅन सोडू नकोस बरं का...मग डॉक्टर स्ट्रेंज बघावाच लागेल..आणि गार्डियन्स ऑफ गॅलॅक्सी बघितला तर उत्तमच. त्यानंतर हा सिनेमा कळेल तुला"
मी म्हटलं," एवढं बघितल्यावर डॉक्टरेट घरी पाठवतात की परत वेगळा प्रबंध लिहावा लागतो?"
हा विनोद त्याला कळला नसावा. तो तणतणत निघून गेला.
पण त्याच्या सल्ल्यावर उतारा म्हणून मी आपल्या लक्ष्याचा 'झपाटलेला' परत बघून टाकला.
(माझा आत्मा तुझ्यात..तुझा आत्मा बाहेर..ओम फट्ट स्वाहा:.... गॉड डॅमइट...विषय संपला)
मी ह्यांच्या फंदातच पडत नाही. आपण बरे अन आपले झी सिनेमावाले पिच्चर बरे..
आणि मी बघतो त्या हिंदी सिनेमात असतेच काय? सिनेमातला व्हिलन म्हणजे मोहल्ल्यातला एखादा गुंडा किंवा जास्तीत जास्त एखादा राजकारणी. आणि गुन्ह्यांचं स्वरूप म्हणजे खून, मारामारी वगैरे किरकोळ. पण ऍव्हेंजरमधला व्हिलन हा मुळातच पलीकडल्या आकाशगंगेत बसला असतो. तिथून तो आपल्या आकाशगंगेला छळत असतो. मग ऍव्हेंजरचे शूरवीर सेनापती कॅमेरावाला गॉगल आणि लाल-पिवळ्या रंगाची विज फायर करणारी पिस्तूल घेऊन त्या शत्रूला धडा शिकवतात. आणि ही फायटिंगसुद्धा जमिनीवर न होता अंतराळात होते. अडीच तीन तास विजेची बौछार केल्यावर तो शत्रू मरतो.
आणि खरी गम्मत इथून सुरु होते, लढून लढून थकलेल्या सेनापतींना नवीन माहिती मिळते की आपण ज्याला मारला तो खरा शत्रू नव्हे. ज्याला मारले तो तर छुटपूट होता. खरा शत्रू आणखी पलीकडल्या आकाशगंगेत आहे.
मग सगळे सेनापती आपापले गॉगल आणि पिस्तूल चार्जिंगला लावतात आणि पुढल्या सिनेमाची वाट बघतात.
पण सेनापतींच्या शौर्याला खरंच तोड नाही. आजवर आमच्या सनी देओलने गदर सिनेमात जमिनीतून हाताने उखडलेली हापशी म्हणजे आमच्यासाठी शौर्याची परिसीमा होती. पण हे लोकं एका बुक्कीत दोन-चार आकाशगंगा उलट्यापालट्या करून टाकतात राव. मी पाहिलेल्या त्या सिनेमात व्हिलनचं आकारमान साधारण ३०-४० सूर्य मावतील एवढं होतं. तरी तो आयरन मॅन का कोणीतरी साध्या करंगळीच्या जोरावर त्याला लोळवतो. हे पाहिल्यावर सनी देओलने बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर दोरीने ओढत ओढत भारतात आणला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
पण बाकी काही असलं तरी एक गोष्ट मात्र मी खेदानेच नमूद करू इच्छितो. एवढं तांत्रिक पाठबळ असूनही या ऍव्हेंजर्सची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍबिलिटी जरा कमीच आहे. म्हणजे एवढे वीस-बावीस सिनेमे काढूनही यांना अजूनही मूळ समस्या काय आहे तेच कळलेले नाही. ह्यापेक्षा तर आमचे ब्रिगेडीयर सूर्यदेवसिंग बरे. व्हिलनच्या कब्जात असताना मिसाईलवर चढून त्यातले फ्युज कंडक्टर काढून ज्या सहजतेने त्यांनी देशावरचं अणुसंकट टाळलं होतं त्याला तोड नाही. आणि हा पराक्रम करताना कव्हरिंग फायर म्हणून काय वापरावं तर पाईपचा धूर !
असा गनिमी कावा तर साक्षात महाराजांनीही वापरला नाही. म्हणजे सूर्यदेवसिंग जर ऍव्हेंजरमध्ये असते तर, अंतराळाच्या पटलावर एखादं कृष्णविवर वगैरे बांधून शत्रूची आकाशगंगा त्यांनी लगेच गिळंकृत केली असती.
हो !! कृष्णविवर बांधता येते !! एखाद्या ताऱ्याचे फ्युज कंडक्टर काढून सूर्यदेवसिंगांनी ही किमया अगदी आरामात केली असती.
उगाच हसायचं काम नाही भाऊ..पृथ्वीवर सापडणाऱ्या टिटॅनियम धातूपासून बनवलेला सुट जर अंतराळातल्या कुठल्याही वातावरणात तग धरू शकत असेल आणि पिस्तुलातून निघालेली वीज कुठल्याही ग्रह-ताऱ्यावर सारखीच तबाही पसरवत असेल (मग ते रेझिस्टन्स,कंडक्टन्स, इम्पेडन्स गेले तेल लावत!) तर ताऱ्याला फ्युज कंडक्टर असणे सुद्धा शक्य आहे!!
असो.
तर ऍव्हेंजर आवडणाऱ्या लोकांनो,
तुमचं काय ते एकदा फायनल ठरवा आणि सांगा.
तुमचाच,
ऍव्हेंजरचा एक सिनेमा थेटरात जाऊन एकदाही न झोपता पाहिलेला एक सामान्य चाहता.
याद्या
14808
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
माझा मोठा मुलगा प्रचंड चाहता
फुटलो!
ब्वॉर्र...
.
एक नंबर, चिनार शेठ!!!
छान लेख
अरे ये ब्रिगेडियर को नही
In reply to छान लेख by मराठी कथालेखक
छान चर्चा... जेव्हा काही
In reply to अरे ये ब्रिगेडियर को नही by राघव
जानी... आप सुर्यादेवसिंग को
In reply to छान लेख by मराठी कथालेखक
आम्ही साऊथ चे पिक्चर पचवेल
येक लंबर.. लय भारी चिनारशेठ!
मी आपला हे मार्वल पिक्चर्स - कल्पनाशक्ती, पात्रं आणि विज्युअल इफ
In reply to येक लंबर.. लय भारी चिनारशेठ! by राघव
=))
बरं झालं हेच
एकच लंबर
खुमासदार लेख!
हाहा भारी लिहिलंय ...आवडल
धन्यवाद !
जगात भारी! =))
जबरदस्त!
हा ..... हा .... हा ..... !
भारी लिहीलंय
लै भारी...बाकी माझी रेंज
शनिवार पहाटे ३ः१० चा शो पण
पुणे मुंबई आणि 2 3 गावे सोडली
In reply to शनिवार पहाटे ३ः१० चा शो पण by उगा काहितरीच
+१११
In reply to पुणे मुंबई आणि 2 3 गावे सोडली by अभ्या..
हे म्हंजे, हॅरी पॉटर नविन
In reply to +१११ by नाखु
बाभो...हे भलतेच निघाले...
मी बजाजच्या फटफटीबद्दल काही वाचायला मिळेल या अपेक्षेने आलो होतो.
In reply to बाभो...हे भलतेच निघाले... by ज्ञानोबाचे पैजार
हाहाहा
सर्वश्रेष्ठ
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला तरी ही चित्रपट मालिका आवडली....
हा ..... हा .... हा .
खुसखुशित लेख
विनोदाचा प्रयत्न जमला नाही
खरोखरच केविलवाणा प्रयत्न होता
In reply to विनोदाचा प्रयत्न जमला नाही by आदिजोशी
मस्त!
अरे
In reply to मस्त! by समीरसूर
मी पण अजून ऍव्हेंजर किंवा
कालपरवा स्टारगोल्डवर
परवाच सहकुटुंब हा सिनेमा त्रिमिती मध्ये बघीतला.