भूतबाधा की मनाचे खेळ?
मी चकवा, भूत बित यावर शक्यतो विश्वास ठेवत नाही. त्या गोष्टींकडे चाणाक्ष पणे पाहिलं तर सर्व काही लक्षात येते.
ही घटना साधारण 5 6 दिवसांपूर्वी ची आहे. म्हणजेच होळीच्या तिसऱ्या दिवसाची. मामाचे गाव आमच्या गावापासून खूपच जवळ. धरणाच्या वरच्या बाजूला मामाचे गाव तर माझे गाव धरणाच्या खालच्या साईडला. मामाची छोटी मुलगी 10वीला आहे. तिचा शेवटचा पेपर संपला म्हणून ती आमच्याकडे आली होती. मला ही मामाला भेटायचे होत म्हणून मी तिला थोडं थांबवलं आणि साधारण रात्री साडेसात दरम्यान तिला घेऊन निघालो.
मामाच गाव आडवळणी आहे. जायला यायला डोंगरा साईतून रिंग रोडन जावं लागतं. जाताना नदी साईटला त्यांच्याच गावचा स्मशानभूमी आहे. गर्द झाडी आणि उतार त्यामुळे तिथे एकट्या अर्ध्याला चालायला भीती वाटते. माझी बाईक आता त्या ठिकाणी आली. आणि बरोबर पुलावरच(स्मशानभूमी साईटला) धक्के खाल्ल्यागत वाटायला लागली. मामाची मुलगी जाम घाबरली. मी थोडा पुढे गेल्यावर थांबलो. तेव्हा मला समजलं गाडीला रिजर्व लागला होता. गाडीतील पेट्रोल संपलं किंवा रिजर्व लागला तर गाडी असच करती. पण मी थांबल्यामुळे आणि अफवांमुळे ती खूप भ्यायली आणि रडायला लागली. तिला समजवलं आणि पुढे निघालो. रस्त्यात आणि घरी पोचल्यावर भूत, प्रेत, चकवा असल्या सर्व गोष्टी(लोकल अफवा) समजल्या.
अगोदरच मी लेट गेलो होतो. त्यातल्या त्यात जेवण आणि मामाच्या गप्पा. यामुळे तिथून निघायला मला साडेदहा वाजले. गावचे साडेदहा म्हणजे गाववाल्यांचा झोपायचा टायमिंग. घरबाहेर चार टवाळ कार्टी सोडली तर कुणीही नसत. मी ज्या वाटेने गेलो त्याच वाटेने येणे होतंच. झाला माझा प्रवास सुरु. जाताना मामाची पोरगी तरी होती...... येताना मात्र तिने सांगितलेल्या हॉरर अफवा आणि भीतीचे दडपण माझ्यासोबत होतं.
मी येताना आता त्या नदीच्या एरियात पोचलो. वळणे आणि सरळ रोड यामुळे अपर डिपर चाललं होतं. सरळ रोड आला. साधारण खड्डे होते. अप्पर टाकला...... अप्पर टाकता क्षणी पुढे कवठ्या महाकाळ चे अद्ययावत व्हर्जन बाभळीच्या झाडाला लटकत होतं. आणि लाईट मूळ चमकत होत. गाडी फिरवून रिटर्न मामाकडे जायचं अस ठरवल पण थोडा विचार केला. भूत काय फिल्म मधल्या भुतांसारखी थोडी असणार?? गाडी हळू घेतली. लांबूनच निरीक्षण केले. तो काळा भावला होता. नदी, थंडी, भारी वातावरण आणि साधारण लाल माती यामुळे अमच्याकडे स्ट्रॉबेरी जास्त पिकते. आणि ते स्ट्रॉबेरी वाले शेतात भावले, कपडे वैगेरे असलं अडकवत असतात. आणि त्यातल्या कुणीतरी तर रस्त्यावरच भावलं अडकवलेलं.
थोडा विचार केला, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला म्हणून भूत वैगेरे अफवा यावर परत एकदा विश्वास बसला..... तरीपण खर सांगतो माजी जाम फाटली होती.
तसाच पुढं गेलो. आता नदीचा पूल आला होता. स्मशानभूमी चा परिसर आला. परत अप्पर टाकला. पुढे पाहतो तर काय...... एक मुलगी हॅट घालून रस्त्याच्या बाजूने चालली होती. काही समजायच्या आत तिच्याजवळ पोचलो. ती मुलगी नव्हती कोणतरी दुबळा पतला मुलगा होता. कदाचित भिजवणी किंवा शेतात डुकरांच्या मुळे राखणीला आला असावा. आता मात्र मी पुरता भिलो होतो....... वैज्ञानिक दृष्टीकोन गेला तेल लावत..... जय श्रीराम बोललो...... आणि बाईकचा स्पीड वाढवला आणि जे सुटलो परत मग वळून पाहिलं नाही.
प्रतिक्रिया
:)
'शक्यतो' विश्वास ठेवत नाही...
सहमत
त्या मुलाला मदत हवी असती तर त्याने मला हात करायला हवा होता?
पण त्या मुलाचे पाय उलटे होते
मनात भीती होती
नंतर सगळं सुचतं...
काय कळलं न्हाय बा म्हंजी भूत
आयडीयाची कल्पना लय भारी.
एखादं खट्याळ भूत असेल तर
माझा अनुभव ..
वपुंची "दोंदे" आठवली =))
:-)
सोप्पंय
एक सूचना :
भगवान
ओ भुत , कल आना .