Skip to main content

[शशक' १९] - प्राक्तन

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/02/2019 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
"या; काय हवंय ? " "चहा?" "नको" "कॉफी?" "नको मला तू पाहिजे" "काय ?" "हो आदेश आलाय" "कोणाचा ?" "आज संध्याकाळी तू या खुर्चीतच शेवटचा श्वास घेशील. " त्याला घाम फुटला त्यांन मागं वळून घंटी वाजवली. समोर बघतो तर कुणीच नाही. संध्याकाळपर्यंत गिऱ्हाईकांच्या वर्दळीत तो सगळं विसरला . "ए चल, काय असेल ते काढ" "अहो हे काय चाललंय? " "कोण तुम्ही ?" "ए चल बाहेर ये , भाईला प्रश्न विचारतो ? ". "अरे अरे माझा शर्ट" "भाई बसा भाई" भाई खुर्चीत बसला. हातातल्या चाकू टेबलवर खुपसला. गल्ल्यात हात घालून नोटा बाहेर काढल्या. दुसऱ्या क्षणी एक अस्फुट किंकाळी भाईंच्या तोंडून बाहेर पडली आणि छातीवर हात ठेवत वेडंवाकडं मटकूळं करत तो खुर्चीतच कोसळला .

वाचने 13040
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

+१ हायला, यमदूत असे "कोण कुठे बसला आहे" यावरून त्याच्या गिर्‍हाईकांची ओळख पटवतो होय ?! :) पण, तरीही, गोष्ट आवडली.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अगदी याच शब्दात प्रतिक्रिया लिहायला खाली स्क्रोल करत होते, तेवढ्यात तुमची प्रतिक्रिया दिसली =)) आगाऊ सुधारणा: हृदयाच्या झटक्यापेक्षा वरचे झुंबर पडणे-छाप अपघात जास्त व्यवस्थित बसला असता असं वाटतं.