Skip to main content

[शशक' १९] - परप्रांतातून

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/02/2019 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
परप्रांतीयांचे लोंढे येतच होते. मुजोर राज्यकर्त्यांच्या अमानुष अत्याचारांना बळी पडलेल्या त्या लोकांना हे शांतताप्रिय राज्य खुणावत होतं. त्या लोंढ्याबरोबर आलेल्या, अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेल्या, त्या झोपलेल्या किडकिडीत मुलाला सैनिकाने उठवलं. ‘कोण रे तू? कुठून आलास? तुझे आई आणि वडील कुठे आहेत?’ तो दचकून जागा झाला. प्रवासात सहस्रवेळा त्याच्या आई आणि वडिलांची चौकशी लोकांनी केली होती आणि दर वेळी नको नको वाटत असतानाही, त्यांच्या झालेल्या अपमानाचा, छळाचा आणि खुनाचा तो काळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता! दूरवर दिसणाऱ्या तक्षशिला विद्यापीठाकडे पाहत तो म्हणाला, ‘मी विष्णुगुप्त चाणक्य. मगध प्रांतातल्या चणकपुरीतून इथे शिक्षणासाठी आलो आहे.’ आता त्याच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्नं तरळत होती.

वाचने 14145
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

+१

आवडली पैजारबुवा,

आशावादी, सकारात्मक अंत असलेल्या कथा छान वाटतात. शोकांतिका, नकारात्मक शेवट असलेल्या कथा उगाच त्रास देतात.

In reply to by तुषार काळभोर

कथेला+१ पैलवान दादा,काही टिकाकारांना, विश्लेषकांना राजकारणातील,जीवनातील आणि एकूणच जगातल्या सकल नकारात्मक गोष्टींचा प्रसार,प्रचार आणि जाहीरात करण्यात स्वारस्य असते. सगळ फक्त चांगलं आणि प्रगतीशील आहे आंधळेपणाने मानणं गैर आहेच पण फक्त विनाशकारी आणि दुर्गती कडे वाटचाल आहे असंही नाही. तसं भासवून विखारी आरोप करणं ही एक विचारजंती विकृती आहे उच्चशिक्षित हुशारांना तेच पुरोगामित्व वाटते हीच शोकांतिका आहे

सुरूवातीला कथा महाराष्ट्रातल्या आलेल्या उत्तर भारतीय मुलाची वाटत असतांना विष्णूगुप्त वाचून अनपेक्षीत धक्का बसला, कथा आवडली.

+1

.

छान!

+१

+१

+१

+१

आवडली

+१ आवडली!

आवडली

+1

+1

.


+१

+१