Skip to main content

[शशक' १९] - वस्तरा

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणत्या दुपारी, उन्हाच्या झळा बसत होत्या. फुफाटा आसमंतात उडाला होता. "सुन्या अरे ये सुन्या चल लवकर, शाली वरल्या माळाकड चाललीये. आज नक्की गठल बघ" ब्रश खाली ठेऊन सुनील वस्तराच हातात घेणार होता इतक्यात दिपकच्या हाळीने तो चमकला "आँ " "अरे आँ काय करतोय चल लवकर, काय फटाकडी दिसून ऱ्हायली आज शाली, कहरच " "अरे संपत" सुनील चाचरत बोलला. " कोण संप्या, त्यो शालीचा भाऊ? त्याला काय घाबरतोय? मी बघून घेईन त्याला. तू आटप " इतक्यात छातीवर अंथरलेल्या कळकट्या रुमालाने गिऱ्हाईकाने दाढीचा फेस पुसला. अन बाकड्यावरचा वस्तरा उचलला. तसा पहिला वार सुनीलवर केला, आणि दिपककडे मोर्चा वळवला. हादरलेला दिपक चाचरत एवढंच बोलू शकला, "संपतराव तुम्ही?"

वाचने 29434
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

असे प्रत्यक्षात होत्नाही हेच वाईट आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

पुन्हा वाचली असता असं वाटलं की मी चुकीचा +१ नाही ना दिला. कारण गोष्ट फसलीय. सुन्या जो न्हावी आहे त्यानेच संपतला दाढीचा साबण लावलाय आणि तो दिपकला पहिल्या वाक्यातच अडवेल व सावधही करेल की हा खुर्चीवर जो बसलाया तोच संपतराव आहे. तेव्हा पुढे काही बोलु नकोस म्हणुन.

In reply to by प्रमोद देर्देकर

"अरे संपत" सुनील चाचरत बोलला. >> त्याने प्रयत्न केलाय, पण दिपकने त्याला फारसं बोलायला संधीच दिली नाही असं वाटतं..

मस्त... लेखनाची स्टाईल जव्हेरगंज यांची वाटत आहे. कथा त्यांची नसल्यास आगाऊ अंदाजाबद्दल क्षमस्व!

कोणीका असेना पण गिर्‍हाईकासमोर असं बोलणारा दिपक &%$# असल्या पाहिजे.

वस्ताऱ्याने आजकाल वार होत नाहीत. पुर्वी च्या काळी ब्लेड चा शोध नवता तेव्हा धार लावायचे वस्तारे होते. ते धारेच्या दगडावर घासून घासून नंतर दाढी करत. हेच प्रसंगी शस्त्रासारखे वापरता येत. नंतर HIV घ्या भितीने ते बंद झाले.