मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - खजील

साहित्य संपादक · · स्पर्धा
हा नेहमीप्रमाणे दुकानात बसलेला दुपारची वेळ, साडी नेसलेली, हिडीस वाटावा असा मेकअप आणि टाळ्या वाजवत तो आला. हा नेहमीप्रमाणे त्रासिक चेहऱ्याने काही नाही जा पुढे बोलला, तो क्षणभर रेंगाळला आणि मनाशी काहीतरी ठरवून खड्या आवाजात ह्याला बोलला अरे बाबा हिकड तर ये कि. हा उठला त्रासिकपणे आणि त्याला गुर्मीत म्हणाला काय पाहिजे रे ? त्याने काही लिपस्टिक, टिकल्या आणि चमकी वस्तू दाखवायला लावल्या आणि त्यातील भडक कलरच्या त्याला आवडलेल्या वस्तू हातात घेऊन याच्या हातात पैसे कोंबून फ़क़्त इतकेच बोलला “भाऊ कधीतरी आमची पण इज्जत कर” आणि खजील झालेला हा ‘त्याच्याकडे’ पाहत हातात पैसे घेऊन सुन्नपणे उभा होता दुकानाच्या दारात.

वाचने 12419 वाचनखूण प्रतिक्रिया 27

श्वेता२४ Wed, 02/06/2019 - 17:35
खूपच छान विषय . पण अजून प्रभावी मांडता आलं असतं असं वाटलं.

सुधीर कांदळकर गुरुवार, 02/07/2019 - 19:45
आवडली. मेघना पेठे यांच्या एका कथेत एक विशेष प्रसंग आहे. एक मुलगी नटून प्रियकराला भेटायला जातांना पाऊस येतो. ती एका इमारतीच्या आडोशाला उभी राहाते. एक तृतीयपंथी बाजूला येऊन उभा राहतो. ती अंग चोरून तुच्छतेचाकटाक्ष टाकते. तेवढ्यात तिच्या केसात कावळ्याची विष्ठा पडते. तृतीयपंथी मायेने ती विष्ठा पावसाच्या पाण्याने हातानेच स्वच्छ करतो. धन्यवाद.

चांदणे संदीप Fri, 02/08/2019 - 20:43
+१ अगदी आजचाच प्रसंग. दुपारी हाटेलात बसलो होतो. दोन तृतियपंथी येऊ लागले. हाटेलवाला वैतागून ड्रॉवर उघडून सुट्टे पैसे काढू लागला आणि त्यांनी मात्र आत येऊन एक कोपऱ्यावरचा टेबल पटकावला. शांतपणे ऑर्डर दिली. जेवल्यानंतर बिल देऊन थाळी चांगली होती असं सांगून निघून गेले. Sandy

नाखु Sun, 02/10/2019 - 10:33
उत्तम कथा. लोक माणूस म्हणून दारुड्या, गुन्हेगार लोकांना स्विकारतात मान्य करतात,पण या लोकांशी कायम तुच्छतेने पाहीले जाते हे फारच घृणास्पद कृत्य आहे.

In reply to by विजुभाऊ

उपेक्षित Tue, 02/12/2019 - 18:15
+१ असे लिहिले नसेल तर प्रतिसाद ग्राह्य धरला जाणार नाही असे जव्हेरगंज यांनी एका प्रतिसादात लिहिले असल्याचे आठवत आहे.