MLM नंतर SLM, अर्थात नव्या बाटलीत जुनीच दारू.

Primary tabs

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in काथ्याकूट
30 Nov 2018 - 3:54 pm
गाभा: 

मल्टी लेव्हल मार्केटिंगनंतर सध्या सिंगल लेव्हल मार्केटिंगचा सुळसुळाट झालेला पहायला मिळतो. यामध्येे ठरविलेली रक्कम भरून आपण सामील व्हायचे. ही रक्कम रूपये १०००, १५००, २००० किंवा कंपनी ठरवते त्याप्रमाणे असते. काहीवेळा रक्कम न भरताही कंपनीमध्ये थेट सामील होता येते. यासाठी आपले बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, संपूर्ण नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी कंपनीला दिल्यावार आपणास युजरनेम व पासवर्ड प्राप्त होतो, ज्याचा वापर आपण कंपनीच्या वेबसाईटवर लॉग-ईन करून ‘व्यवहार’ करण्यासाठी करू शकतो. सुरूवातीस आपल्याला ‘पिन’ विकत घेऊन री-एन्ट्री मारावी लागते. पिनांसाठी लागणारी रक्कम आपण थेट कंपनीत जमा करावी किंवा दुसऱ्या एखाद्याकडे पैसे भरून पिन विकत घ्याव्यात, अशी सोय केलेली असते. या पिना तुमच्या ऑनलाईन खात्यात जमा होतात. कंपनीच्या वेबसाईटवर लॉग-ईन करून आपण मिळालेल्या पिनांची री-एन्ट्री मारायची. री-एन्ट्री मारली की आपले पेमेंट जनरेट व्हायला सुरूवात होते. पहिल्या तीन किंवा चार री-एन्ट्री या प्रत्येकी एका पिनाच्या असतात. पुढील री-एन्ट्रीज् या मात्र दोन पिनांपासून ते जसजशी लेव्हल वाढत जाते, त्यानुसार सात ते आठ पिनांच्याही होतात. कंपनीने आठवड्यातून ठरवलेल्या एखाद्या वारी किंवा १०, २०, ३० या तारखेला क्लोजिंग असते. क्लोजिंगच्या दिवसापर्यंत री-एन्ट्री मारणे आवश्यक असते. क्लोजिंगनंतरच्या २-३ दिवसांनी आपल्या लेव्हलनुसार पेमेंट आपल्या खात्यात जमा होईल, असा कंपनीचा दावा असतो.

यादरम्यान तुमचे पेमेंटही री-एन्ट्री मारल्यावर मिळत असते. याबाबत पुढील एक उदाहरण देत आहे :-

पहिली री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ३५० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १)

दुसरी री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ५०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल २)

तिसरी री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ७०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ३)

चौथी री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ११०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ४)

पाचवी री-एन्ट्री २ पिनांची (रूपये २०००) मारली की १८५० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ५)

सहावी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की ३२०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ६)

सातवी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की ५००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ७)

आठवी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की ७५०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ८)

नऊवी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की १२००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ९)

दहावी री-एन्ट्री ४ पिनांची (रूपये ४०००) मारली की २१००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १०)

अकरावी री-एन्ट्री ५ पिनांची (रूपये ५०००) मारली की ३८००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ११)

बारावी री-एन्ट्री ६ पिनांची (रूपये ६०००) मारली की ७०००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १२)

तेरावी री-एन्ट्री ७ पिनांची (रूपये ७०००) मारली की १२५००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १३)

चौदावी री-एन्ट्री ८ पिनांची (रूपये ८०००) मारली की ३००००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १४)

पंधरावी री-एन्ट्री ८ पिनांची (रूपये ८०००) मारली की ७००००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १५)

(यामध्ये १५ ते २० टक्के रक्कम ॲडमीन चार्जेस व टीडीएसच्या नावाखाली आपल्या पेमेंटमधून वजा करण्यात येतात)

तुम्हाला जो कंपनीमध्ये जॉईन करेल, त्यालाही तुमच्या लेव्हलसोबत विशिष्ट टक्केवारीनुसार रक्कम कमिशनपोटी कंपनीतर्फे देण्यात येते. मनी सर्क्युलेशनचा शिक्का लागू नये म्हणून आपल्या प्रत्येक पिनांसाठी किंवा लेव्हलसाठी काही कंपन्यांतर्फे प्रॉडक्टस् दिली जातात.

मुळातच ही सिस्टीम सिंगल लेव्हल मार्केटिंग असल्यामुळे येथे तुम्हाला दोनजण जोडायची गरज नसते. जो कोणी कंपनीत प्रवेश घेईल तो थेट तुमच्या स्थानाखाली जोडला जाईल. प्रत्येक लेव्हल भरण्यासाठी त्या-त्या लेव्हलच्या गरजेनुसार तितके लोकं तुमच्या स्थानाखाली जॉईन होणे आवश्क असते. त्याबाबतची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर आपल्याला मिळालेला युजरनेम व पासवर्ड वापरून आपण पाहू शकतो.

बहुतांशी कंपन्या विशिष्ट लेव्हल भरल्यानंतर पेमेंट देणे बंद करतात. कोणी याबाबत विचारले असता ‘सॉफ्टवेअर अपडेशन करायचे आहे, सर्टिफिकेशन बाकी आहे’, अशी विविध कारणे सांगून ‘नंतर पेमेंट नक्की मिळेल, तोपर्यंत तुम्ही लोकं जोडणे व री-एन्ट्री मारणे थांबवू नका, तुम्हांला पेमेंट चालू झाल्यावर ते कमिशन व लेव्हल इन्कम लगेच मिळेल’, असे आमिष वारंवार दाखवले जाते. कंपनीकडून अनेकांना अगोदर थोडेफार पेमेंट मिळालेले असल्याने त्याचा पुरावा दाखवून कमिशन मिळण्यासाठी नवीन लोकांना जॉईन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असतो. शेवटी यात रिस्क फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे आणि ईझी मनीच्या नावाखाली यामध्ये किती गुंतायचे, ते आपणच ठरवावे.

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

30 Nov 2018 - 4:18 pm | आनन्दा

काहीच कळले नाही बुवा..

भंकस बाबा's picture

2 Dec 2018 - 11:45 am | भंकस बाबा

नसत्या फंदात (फंडात)न पडलेले बरे !

श्वेता२४'s picture

30 Nov 2018 - 5:16 pm | श्वेता२४

पीन म्हणजे काय. एटीएमचा असतो तसा का