कुठली शाळा ?

नजदीककुमार जवळकर's picture
नजदीककुमार जवळकर in काथ्याकूट
19 Nov 2018 - 9:10 am
गाभा: 

मित्रहो, मदत हवी आहे ! आंबेगाव बु. दळवी नगर येथे 2bhk घेण्याचा विचार झाला आहे. मुलांच्या चांगल्या cbsc-English (शक्यतो )शाळा बघत आहोत. कारण पुढे transfer होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलगी वय 9 सध्या चवथीत (श्री श्री रवीशन्कर विद्यामंदिर, भुगाव) येथे जात आहे. मुलगा वय 3 सद्या (आर्यन स्कूल, दत्त नगर कात्रज जवळ) जात आहे. दोन्ही शाळा ओक आहेत. पाचवी पासून मुलीची आणि मुलाची शाळा बदलण्याचा विचार करत आहोत. मुलीची शाळा 15km पडेल दळावी नगर पासून, म्हणजे साधरण 40-45मिनिटे पोहचायला.चांदणी चौकात road work सुरु होणार असे कळले त्यामुळे पुढे अजून उशीर होऊ शकतो. नवीन घर दळवीनगर आंबेगाव असल्याने जवळपास एखादी चांगली शाळा बघत आहोत.

शाळा : शिक्षणावर भर देणारी शाळा, खूप hyped,so-called process oriented,costly शाळा नकोत. पुढील आयुष्यात मुलांना शिक्षणाचा उपयोग व्हावा अशी माफक अपेक्षा. शाळा खर्चिक नको कारण graduation ला हा पैसा कामी पडू शकेल. सध्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा वार्षिक खर्च 1.5 लाख आहे . पुढे अजुन वाढणार.

Govt. Aided चांगल्या शाळा चालतील. सेवासदन शाळा कशी आहे ?

प्रश्न साधा असला तरी किचकट वाटतो ! तर मित्रांनो मदत करा.

धन्यवाद !!

प्रतिक्रिया

.... पुढे अजुन वाढणार.

माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण पहिली ते बारावी जेमतेम एका लाखात झाले...एक जण इंजिनियर झाला आणि नौकरी करतोय....

माझ्या मते तरी, एस.एस.सी. सेमी इंग्रजी हा पर्याय, माझ्या मुलांना योग्य ठरला...५-५० रु.मासिक फी (नक्की किती फी होती ते आठवत पण नाही, इतकी नगण्य होती.) आणि वर खिचडी फुकट..शिवाय शाळा घराजवळ असल्याने, २-४ मिनिटात मुले घरी...

जाऊ दे, आम्ही सुटलो...

कुमार१'s picture

17 Jun 2019 - 12:34 pm | कुमार१

एक चांगला लेख :

'इथे टिकते, वाढते मराठी'

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/on-marathi-lan...