अतृप्त आत्मा -८

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
17 Nov 2018 - 12:36 pm

" बापु ! म्या काय घोडं मारलय वं तुमचं ? कशापै माग धरुन बसलावं ?? " बाबल्या अर्ध सुगडं तोंडात ओतुन रडायला लागला.

" भाड्या ! माझ्या उधारीची बोंब मारत होतास ना मगाशी ? म्हणुनच आलोय परत .तुझी उधारी चुकवयला " आम्ही

" ओ बापू ! उधारीचं सोडा ,तुमच्या आख्या खानदानाची ,पुढच्या धा पिढ्यांची हजामत फुकटात करुन द्देतो इथुन पुढं .पन सोडा मला .दया करा " बाबल्या कासाविस झाला .

"अन कुठं बोलनार बि नाय ,आयच्यान गप बसुन भादरीन तुमची पोरं " बाबल्या काकुळतीला आला.

नान्या पाडेगावकर आणी आप्प्या अजुनही नान्याच्या गाडीपाशी कायतरी बोलत होते.बहुतेक आमचीच निंदानालस्ती चाललेली.

" बाबल्या ! तुला उद्या भेटतो जा घरी.आणी कुठं बोललास तर तुलापण माझ्याबरोबर असं अधांतरी भटकावं लागेल " बाबल्याचं मानगुट सोडत आम्ही बोललो.

मानेवरचा हात काढताच बाबल्या बावचळुन इकडेतिकडे बघत आम्हाला हाका मारु लागला.

म्हणजे एखाद्याला स्पर्श केला तरच फक्त त्या व्यक्तीला आमचं दर्शन होणार होतं.

बाबल्या घराकडे पळाला आणी आम्ही नान्याच्या गाडीकडे सरकलो.

खुप गंभीर चर्चा असावी दोघांची.चेहऱ्यावर जाणवत होतं .आम्ही तीथे पोहचुन नान्याच्या गाडीच्या बॉनेटवर बैठक मारली.एव्हाना रात्रीचे नउ साडेनउ झाले असावेत.पण मुळातच कोकणी खेडं असल्याने आणी ते देखील स्मशानाजवळ सामसुम झाली होती.

तीसरं कुणीही नसताना गाडीची थोडीशीच हालचाल झाल्याने त्या दोघांची हातभर फाटली."चला निघुयात,उशीर झालाय. मी सोडतो तुम्हाला "नान्या भिती लपवत बोलला .
"हो हो !! चला चला " आप्पा भेदरल्यासारखा धोतर सावरत पटकन पुढचा दरवाजा उघडुन गाडीत शिरला.
मग नाईलाजाने आम्हाला देखील गाडीत मागच्या सिटवर दरवाजा न उघडताच जाउन बसावे लागले .

आप्पा नाना पाडेगावकराला आम्ही कसे नीच ,स्त्री लंपट ,लबाड ,फसवे वगैरे आहोत हे सगळं रंगवुन सांगत होता.आणी नाना देखील आमच्या कामातल्या कुचराई बद्दल सांगत त्याला दुजोरा देत होता.

" हा बाप्या आमच्या जयुला येता जाता छेडायचा .मी त्याला त्याबद्दल बरेचदा चोप दिला होता." अप्पा बरळला

च्यायचं खुळचट सालं .जयडी आम्हाला रोज कॉलेजला जाताना वाडीत भेटायची .आणी आप्पाच्या हिंस्त्रपणाच्या तक्रारी सांगायची.आप्पाला आमचं भेटणं मान्य नव्हतं त्यामुळे तो बरेचदा जयडीला घरात तोंड दाबुन मारहाण करायचा.एकदोनदा आम्हीही समजावयाचा प्रयत्न केला त्याला पण म्हातारा बेरकी होता.

आता आम्ही जर स्त्रीलंपट असतो आणी तेंव्हा जयडीला येताजाता छेडत असतो तर मगाशी ती आमच्या गालावरुन हात फिरवत आणी आम्हाला उचलताना आमचा हात हातात घट्ट धरुन रडली असती का ?

सगळ्या गावाने बघीतलं होतं.या नानानेच तीला आमच्यापासुन दुर केलेलं जो आत्ता आप्पाच्या बोलण्याला दुजोरा देत होता.

नाही म्हणायला एक प्रसंग घडलेला त्याकाळी.म्हणजे रात्रीची आठ साडेआठची वेळ होती.आप्पा आणी जयडी चाळीच्या जीन्यातुन वर येत होते आणी नेमके आम्ही खाली चाललेलो.तेवढ्यात लाईट गेली .आणी मिट्ट अंधाराचा फायदा घेउन आम्ही जयडीला जवळ ओढलं.काहीतरी विचीत्रच फिल आला जयडी दिसत होती त्यापेक्षा थोडी जाड वाटलीपण विचार करायला वेळ नव्हता.आम्ही ओठांचा चंबु करुन जयडीच्या गालावर टेकवणार एवढ्यात लाईट आली.

हाय रे कर्मा !!

बघीतलं तर जयडी दोन पायऱ्या मागे तोंडावर हात ठेउन हसत होती. आमच्या मिठीत असलेल्या आप्पाच्या टकलात आणी आमच्या ओठांच्या चंबुत अर्धा mm च अंतर होतं.एकदम विजेचा झटका बसल्यासारखं आम्ही आप्पाला जीन्यातुन ढकलुन दिलं आणी रुमकडे पळत सुटलो.
मागुन शिव्यांच्या लाखोल्या ऐकु येत होत्या.

आम्ही भुतकाळात रमत असतानाच आप्पा काहीतरी बोलला.ज्याने तंद्री एकदम भंगली.

" नाना ! आताच संधी मिळालीये या बाप्याची फॕमिली चाळीतुन हुसकायला ". आप्पा एकदम डोक्यात जाणारं ढसकला

" मी सांगतो नाना ! होउ दे साल्याचे दिवस नाही बाहेर काढले ना ही बाप्याची फॕमिली तर नाव नाही लावणार बापाचं. तसंही सात महिन्याचं भाडं थकवलय हरामखोरानं.आणी आता कमवतंही नाहीये कुणी" आप्प्या पचकला

"त्याचा थोरला आहे की आमच्याकडे .छान बाइंडींग शिकवलय त्याला बापुने .घालवता नाही येणार " नाना बोलले

" वंश परंपरा थांबवा नाना आता .उद्या बाप्याचं पोरगं तुमची प्रेस हस्तगत करेल" आप्पा विष ओकला

" इतके दिवास बाप्याला धरुन होता आता त्याचं कार्ट राइट हँड बनवताय " आप्प्या पुन्हा पुन्हा उगाळत होता.

"आप्पा काळजी नको त्याला फक्त बुक बाइंडींग जमतय.आणी आम्ही आता नवी टेक्नोलॉजी आणतोय.कंपोजींग बंद करणार आहे .आणी तसंही तो शिकाउ आहे .300/- रुपयात तुमचं भाडं नाही परवडणार त्याला " नान्या चिरकला

मागे बसुन आम्ही शांतपणे सर्व संभाषण ऐकत होतो.
आता बाबल्यानंतर कुणाचं झाड धरावं या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं .

"नाना पाडेगावकर तु तो गया " असं म्हणत आम्ही मागल्या सिटवर पडलेल्या नानाच्या पाकिटातली सिगारेट शिलगावली.

ते दोघेही आधीच ओढत असल्याने त्यांना लक्षात नाही आलं.

नाट्य

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

17 Nov 2018 - 1:04 pm | पद्मावति

सुपर्ब! वाचतेय. पु.भा.प्र. हा भाग जरा मोठा होता त्यामुळे अजुनच चांगलं वाटलं वाचायला.

विजुभाऊ's picture

17 Nov 2018 - 1:11 pm | विजुभाऊ

लिहीत रहा. मजा येतेय
मिरासदारांच्या भुताचा जन्म कथेची आठवण झाली

प्रमोद देर्देकर's picture

17 Nov 2018 - 2:55 pm | प्रमोद देर्देकर

मस्त. येवू दे अजून लिहा पटापट .