मिर्झापूर

अथांग आकाश's picture
अथांग आकाश in काथ्याकूट
17 Nov 2018 - 11:44 am
गाभा: 

प्राईम व्हीडीओ वर काल-परवा रिलीज झालेली मिर्झापूर हि नवी वेबसिरीज बघायला सुरुवात केली आहे! पहिल्या सिझन मधल्या ९ भागांपैकी आत्ता पर्यंत ३ भाग बघून झाले आहेत! भाषा आणि दृश्यांमध्ये नेटफ्लिक्स वरच्या सॅक्रेड गेम्सशी खूप साधर्म्य जाणवतंय! दिग्दर्शन पण प्रभावी वाटतंय!

प्रतिक्रिया

लई भारी's picture

17 Nov 2018 - 11:10 pm | लई भारी

ट्रेलर बघून एकदम अंगावर येणारी वाटली होती; तुमचा अनुभव काय आहे?
एकंदरीत परीक्षणं बरी नाही आहेत. लोकांना आवडते का बघणं रंजक ठरेल!

अथांग आकाश's picture

18 Nov 2018 - 9:16 am | अथांग आकाश

झाली संपूर्ण बघून! सादरीकरण आणि पंकज त्रिपाठी, कुलभूषण खरबंदा यांच्या सशक्त अभिनयाला इतर कलाकारांची योग्य साथ मिळाल्याने मालिका चांगली वाटली!
हिंसा, शिवराळ भाषा आणि प्रणय दृश्ये गँग्ज ऑफ वासेपूर आणि सॅक्रेड गेम्सची आठवण करून देतात! श्रिया पिळगावकरचा अभिनय ठीकठाक आहे पण चेहऱ्यात आई सुप्रिया सारखा गोडवा नाही!

साबु's picture

20 Nov 2018 - 5:01 pm | साबु

पन्कज त्रिपाठी आवडतो..
हिंसा, शिवराळ भाषा आणि प्रणय दृश्ये गँग्ज ऑफ वासेपूर आणि सॅक्रेड गेम्सची आठवण करून देतात-+१

चिगो's picture

23 Nov 2018 - 3:45 pm | चिगो

ट्रेलर बघून वाटतं तशीच हिंसा, शिव्या इत्यादी असलेली कथा.. सगळ्याच अभिनेते/अभिनेत्रींचा अभिनय कथानकाशी समर्पक. ‘गेम आॅफ थ्रोन्स‘ सारखीच हिंसक दृष्ये अंगावर येणारी व बीभत्स आहेत.

जाता जाता : देशी कंटेट्सच्या बाबतीत तरी ‘अमेझाॅन प्राईम’ हे नेटफ्लिक्सच्या तुलनेत ‘व्हॅल्यु फाॅर मनी‘ आहे, असं मला वाटतं..

अथांग आकाश's picture

23 Nov 2018 - 4:11 pm | अथांग आकाश

जाता जाता : देशी कंटेट्सच्या बाबतीत तरी ‘अमेझाॅन प्राईम’ हे नेटफ्लिक्सच्या तुलनेत ‘व्हॅल्यु फाॅर मनी‘ आहे, असं मला वाटतं.. >>>
+१