अतृप्त आत्मा -५

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
15 Nov 2018 - 9:31 pm

मुळात आम्ही बाकीच्या कुणालाच दिसत नसताना हा डांबर गोळा आंम्हास कसाकाय बघु शकतोय ? या कल्पनेने आम्ही आश्चर्यचकित झालो होतो.पण चला कुणीतरी संपर्क साधतोय हेच खुप असं मानुन आम्ही द्रोणात तरंगत तीकडे निघालो.

जवळ जाताच जाड्या खेकसला "काय राव ! केव्हाचा बोलावतोय .चला बसा पटकन बॉसने बोलवलय."

"च्यायला ! बॉस ? कोण बॉस ??
त्या धसकटाला सांग जाउन आधी बोनस पाठव घरी मग बघु यायचं की नाही " आम्ही पण खेकसलो

"अहो ! यावं लागेल आता तुम्हाला .तुम्ही मेलायत आणी यमदेवांनी बोलावणं धाडलय .मी दुत आहे त्यांचा .पोटावर नका मारु चला पटकन"

च्यायला ! हे असं प्रकरण होतं तर

पण एवढी सगळी मजा सोडुन,आणी बरेचसे हिशेब चुकते करायचं सोडुन असंच निघुन जायची आमची काही इच्छा नव्हती.

चाळीतले बरेच हिशोब राहीले होते.आप्प्या गोखलेला धडा शिकवायचा होता,त्या मंदा मावशीकडुन पैसे परत घ्यायचे होते.बायडीला तीच्या नाकात नथ घालून हम भी कुछ कम नही हे दाखवायचं होतं, जयडीचा..... (राहुन गेलेल्या गोष्टी).शंभ्याला एकदा बदकवायचं होतंच.आता एवढं सगळं सोडुन अचानक कसं जाणार ?

"चला ! आजचं टारगेट संपवु द्या " काळ्या बोलला

"राहु दे की दोन दिवस तोवर दुसरं गिऱ्हाईक बघा" आम्ही रिक्वेश्ट केली

"त्या म्हातारीला उचला तसंही काही कामाची नाहीये ती " मंदा मावशीकडे बोट दाखवत आम्ही बोललो.

"असं नगाला नग नाही चालत .तुम्हालाच यावं लागेल " काळ्या

"टारगेट कंप्लिट केलं तर तुम्हाला काय इन्सेंटीव्ह मिळतो का?" आम्ही विषयांतर केलं

"इन्सेंटीव्ह वगैरे काही नाही पण बॉस सोमरसाचा घडा मागवुन देतात इंद्रदेवांकडुन " काळ्या

"सोमरसा पेक्षा भारी काही घेणार का ?" आम्ही पुन्हा विषयांतरात

बाबल्याने आणलेल्या पिशवीकडे बोट दाखवत " त्यातलं द्रव्य बघा चाखून तुमचा सोमरस झक मारेल " आम्ही सुचवलं

रिक्षात डोकावुन बघीतलं तर अजुन एक दोन द्रोण बसलेच होते.त्यांनीही काळ्याला आग्रह केला बघा चव म्हणुन

हि मात्रा लागु पडली आणी काळ्याने बुच न उघडताच बाटली संपवली.

तीकडे बाटली कशी संपली हे न समजुन बाबल्या त्याच्या कारागीराला शिव्या घालू लागला .

एक बाटली रम पोटात गेल्यावर त्या काळढोल्याला तो यमदुत असल्याचा विसर पडला आणी तो सामान्य माणसासारखा रडुही लागला.

रोज यमराज कशी मोठी यादी देतात आणी आम्हाला कसं आत्मे गोळा करत फिरावं लागतं याचं वर्णन करायला त्याने सुरुवात केली.

लोकं कसा न येण्यासाठी त्रास देतात .गयावया करतात आणी याला कसं निर्दयी बनुन न्यावच लागतं हे सगळं विव्हळुन विव्हळुन सांगायला लागला चोंग्या .

मायला ! आता याची उतरवावी की आपलं काम साधावं या विचारात आम्ही पडलो .

पण मग कशीबशी समजुत काढुन आणी पाजलेल्या दारुचा दाखला देउन आम्हाला इथे थांबण कसं आवश्यक आहे हे त्या रताळ्याला पटवुन देण्यात आम्ही यशस्वि झालो.

पटवापटवीत तसंही आम्ही माहिर होतोच.जयडीला पटवलीही होती पण तीच्या बापाला पटवण्यात घोळ झाला थोडा.

नियतीच्या निर्णयात बदल घडवुन साक्षात यमदुताला दयेचा पाझर फोडल्याबद्दल आम्हाला नोबेल मिळावे का ?

असो..

तर त्या काळ्याने डायरीत बघुन आम्हाला भुतयोनीत ढकलायची व्यवस्था केली आणी सुर्यास्तानंतर ऐच्छिक मानवीरुप मिळण्याचा आशिर्वाद देउन गाडीचा स्टार्टर ओढला.

नाट्य

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

16 Nov 2018 - 12:06 pm | मराठी कथालेखक

संपली की काय ?

प्रमोद पानसे's picture

16 Nov 2018 - 1:03 pm | प्रमोद पानसे

नाही हो.