अतृप्त आत्मा -३

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
15 Nov 2018 - 4:25 pm

आता जयडी आमच्या गालावरुन हात फिरवतीये हे बघुन आमच्या बायडीचा मत्सर जागा झाला नसता तर आश्चर्य होतं.त्याही परिस्थितीत डोळ्यातल्या अश्रुंआडुन ? आमच्या कलंत्राने ते सर्व हेरलच.आणी खस्सदिशी जयडीचा हात बाजुला करुन हि बया हात फिरवत हमसायला लागली.

च्यामायला ! अगं बया जिवंत असताना नाही कधी फिरवलास आणी आत्ताच का गं सुचलं तुला ? असे विचार मनात येत असतानाचा शंभ्या पाटलाचा "सामान आणलय बरं का !" आवाज आला.

या भाड्याला मला पोहचवायची फार घाई झालेली.परिस्थिती बघुन एकेकाळी आम्ही त्याची तिन खोल्यांची जागा एकविस रु.भाडं वाढवुन लाटलेली .आणी त्याला दिड खोल्यांत जावं लागलेलं.हाच राग त्याच्या मनात होता.

मग जरा बाहेर जाउन आम्हाला उचलण्याची काय व्यवस्था केलीये हरामखोराने ते बघावं.अस म्हणुन आम्ही द्रोण घेउन बाहेर गॕलरीत गेलो.

जाताजाता दारावरची पाटी वाचली खुप दिवसांनी.
'श्री बापु (सुरेश)जोशी येथे रहातात.'

खाली नोटही होती.
'दुपारच्यावेळात कोणत्याही कारणास्तव आणी विनाकारण दरवाजा वाजवु नये.अपमान केला जाईल'

अभिमानच वाटला स्वतःचा .

नाट्य