अतृप्त आत्मा -२

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
15 Nov 2018 - 3:00 pm

थोड्यावेळाने कंटाळुन सिलींगवरुन आमचं द्रोण घेउन खाली उतरलो .म्हणलं बघु तरी आपण कसे दिसतोय ते .

कालच बाबल्याच्या सलुन वरुन उधारीत दाढी आणी फेशियल करुन घेतलेलं.गोखल्यांची जयडी माहेरपणाला आलेली .ती आधीपासुनच झलक द्यायची आम्हाला.म्हणजे बॕचलर असताना इथे रहायला आलेलो तेव्हापासुनच. त्यामुळे ती आली की चकाचक रहायचो आम्ही.

काल बाबल्या उधारीला नाहीच म्हणत होता.पण चहा पाजुन आणी उद्याची हमि देउन घेतलं काम उरकून .

आणी आत्ता आम्ही आमचा तजेलदार चेहरा न्याहाळत असताना हा बाबल्या बाहेर कुणालातरी काल आम्ही उधारीत दाढी केल्याचं सांगत होता.
किती हिशोबी नालायकपणा करतात लोकं.कुठं काय बोलायचं समजतच नाही .

तेवढ्यात जयडी आली तीच्या म्हातारीबरोबर.आणी आमच्या कलंत्राचं सांत्वन करताना आमच्या गुळगुळीत गालावरुन हात फिरवत राहीली.एकदम वॉव दिसत होती चाळीशीत पण.

पण तो स्पर्ष आम्हाला का जाणवत नव्हता.?

अरे हो आम्हीतर आमच्या गालापासुन दोन फुट वर होतो ना अधांतरी.

नाट्य