अवनी हम शरमिंदा है...

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in काथ्याकूट
13 Nov 2018 - 5:44 pm
गाभा: 

वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे,

प्रत्येक वाघाची एक स्वतःची हद्द असते , सहसा दुसऱ्या कुठल्या हिंस्त्र प्राण्याला तिच्या हद्दीत येण्याची परवानगी नसते, २ बछडे सांभाळायचे त्यांचे रक्षण करायचे आणि या जगात उद्या एकटे जीवन जगण्यासाठी तयार करायचे, शिकार शिकवायची, आत्मरक्षण शिकवायचे, लाड करायचे प्रसंगी कठोर व्हावे लागते हे सगळे करताना.

आणि या वाघिणीवर आरोप काय तर १३ लोकांचे प्राण घेतले म्हणे.. त्यातील ३ लोकांचे शवचिकित्सा केल्यावर त्याच्या जखमेवर अवनीची थुंकी आढळली. म्हणजेच तिने ठार केले. पण खाल्ले नाही. खाल्लेही असेल बहुदा. पण बाकी १० जणांच्या मृत्यूचे कारण काय ? माहित नाही. तरीही १३ लोकांच्या हत्येचे आरोप.

बरं मारलेही असतील तिने १३ जण , पण काय ती तुमच्या घरात घुसून हल्ला करत होती? अरे तुम्हीच वनक्षेत्रात शेती सुरु केलीत वनरक्षकांना हाताशी धरून, तेंदूपत्ते गोळा करायला तिच्या हद्दीत शिरलात..मग २ पिल्लांची आई असलेली वाघीण ती तिला धोका वाटल्यावर काय करणे अपेक्षित होते तिने?

वन्यप्राणी आणि वनसंपदा सांभाळण्यासाठी आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे, त्यासाठी एक मंत्री, एक राज्यमंत्री, आणि एक आय ए एस अधिकारी देखील नेमलाय . पण या प्रगत राज्याच्या वनविभागाला एक वाघ जिवंत पकडता आला नाही हि शरमेची नाही तर संताप आणणारी बाब आहे. तुम्हाला १३ महिने पाठलाग करून २ पिलांच्या आईला जिवंत पकडता आले नाही? खरंच प्रामाणिक प्रयत्न झाले का?

अवनीला मारल्यानंतर आता तिच्या २ पिलांचे काय ? जगातील का ती?
बरं या सगळ्या मोहिमेत संशय घेण्याला बरीच जागा आहे, १३ महिन्याचा शोध, रात्री केलेली कारवाई, त्यात दाट मारण्यासाठी पशुवैद्याचिकिसक असावा लागतो, तोही नव्हता सोबत, मग दाट कोणी मारला? नक्की दाट मारला का?

आज शवविच्छेदन करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगतिले ते म्हणजे अवनीला पाठमोरी असताना गोळी घातली गेलीये, दाट मारल्यावर तिथून रक्त निघणे अपेक्षित असते ते निघाले नाहीये., आणि महतवाचे म्हणजे शिकारी असगर अलीने गोळी नाही तर त्याच्या मुलाने शिकार केली आहे .....वर तो शिकारी असगर अली म्हणे तिची २ पिल्लेही नरभक्षक होऊ शकतात..म्हणजे याला हौस पूर्ण करण्याची अजून २ संधी.. अरे १३ महिन्याची पिल्ले माणसाची सोड, सशाची तरी शिकार करू शकतात का?

आणखी एक चीड आणणारी गोष्ट म्हणजे तिथली गावकऱ्यांनी अवनीची हत्या झाल्यावर गावात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.. कहर आहे .. गावातील, घरातील व्यक्ती ठार झाल्यावर दुःख हे होणारच पण या गावकऱ्यांना समुपदेशनाची गरज होती, जेणे करून हि घटना टाळता अली असती.
वन आणि वन्य प्राण्याचे महत्व समजावून सांगून गावकऱ्यांच्या मदतीने हातात हात घालून काम करता आले असते.

त्याच कसंय ना कि असे वाघ मारल्याने सरकारला कधी धक्का लागत नाही, जेमतेम मंडळी सोशल नेटवर्किंगवर विरोध निषेध करतात पण चिंता नसावी , आपले सरकार सुरक्षित आहे.
आणि हो जेव्हापासून मुनगंटीवार वनमंत्री झालेत तेव्हापासून ३ वाघ, १२ बिबटे, आणि २००च्या वर रानडुकरे मारण्याचे आदेश गेलेत आणि अमलात देखील आलेत.
सलाम मुनगंटीवार आपल्याला.

प्रतिक्रिया

लिहायचं आहे, लिहिते थोड्या वेळाने.
ह्या विषयावर लिहिल्याबद्दल धन्यवाद.

खिलजि's picture

13 Nov 2018 - 6:46 pm | खिलजि

बोलाल तितके थोडे आहे या विषयावर . एक मात्र नक्की आपल्या देशाला किंबहुना आपल्याला या वनसंपत्तीची काही एक पडली नाही आहे . वन्य प्राणी आणि त्यांचे संवर्धन हि काळाची गरज आहेच पण त्यानुषंगाने कायद्याची अंमलबजावणीही तितकीच महत्वाची आहे . सध्यातरी प्रगतीचा आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याचा हव्यास माणसाला पुढे निराशेच्या खोल गर्तेत ओढणार आहे . आजही वर्तमानपत्रामध्ये रिसॉर्टच्या निसर्गरम्य जाहिराती बघून आपण तेथे राहायला जातो . आपल्या राहणीमानात कळतनकळत आपल्याकडून किंवा हॉटेल व्यवस्थापनाकडून पर्यावरणाची हानी होत असते . तेथे नवीन नवीन कल्पना " हि सफारी अन ती सफारी " वारेमाप रुपये मोजून राबवल्या जातात . त्यावर कोणाचेच बंधन नाही .
जेव्हा एखादा विभाग वन्यजीवसंवर्धनासाठी घोषित होतो तेव्हा तेथील लोकांचे पुनर्वसन हा एक कळीचा मुद्दा बनून राहतो . त्यामुळे हि योजना फक्त कागदावरतीच टिकते आणि मग हे असे अवनीसारखे प्रकार घडतात . आज अवनी प्रकरण गाजतंय ते कोर्टाच्या आणि सरकारच्या आदेशामुळे . अन्यथा अश्या किती अवनी यमसदनी धाडल्या असतील ते देव जाणे .

तुमच्या लिखाणातून एक मार्ग दिसला बघा राव .. अवनी गेली ती वाघीण होती कुत्री नव्हे .. या वन्यजीवांचे संवर्धन खरंच धनदांडगे लोक अगदी मनापासून करतील बघा . आज कुत्र्यांची पैदास आपल्याला नकोशी वाटते . कारण एकच गल्लोगल्लीत ती व्यवस्थित पाळली जातात . अर्थात वाघाला पाळायचे तर आपल्यासारख्या सामान्य माणसांचे काम नव्हे . त्यासाठी एखादा अंबानी नाहीतर ताटात बघायला हवा.
हीच कुत्री ईशान्येकडे तुम्हाला बघायलासुद्धा मिळणार नाहीत कारण एकच कापून यथेच्छ हादड्ली जातात .
जर सरकारने स्वतःचा नाकर्तेपणा मान्य करून वन्यसंवर्धनासाठी खासगी लोकांना संमती दिली तर त्यांचे संवर्ध उत्तम रित्या होऊ शकते . हे माझे आपले लिखाण वाचून एक मत तयार झाले आहे , कुणाला त्यावर हरकत असेल किंवा दुमत असेल तर प्रकाश टाकावा ..

ट्रम्प's picture

13 Nov 2018 - 8:45 pm | ट्रम्प

विचारच करत होतो अजून अवनी बद्दल कळवळा असलेला धागा कसा नाही आला !!!!
पाटील साहेब ती कसर तुम्ही भरून काढलीत धन्यवाद .
मान्य आहे जंगल आणि गावे यांच्या सीमारेषा पुसट होत चाललेल्या आहेत पण जे 13 गावकरी मारले गेले ते सगळे यत्किंचित तेंदूपत्ता गोळा करणारे होते , त्यात दारिद्र्यात राहून शेती करणारे कोणी ही नव्हते ही नवीन माहिती आपल्या कडून समजली . त्या 13 गावकऱ्यांना खूपच किरकोळीत काढलंय सर्वांनी . सामान्य गरीब कष्टकरी जीवाला या जगात किंमत नाही हे खरे.
त्या भागातील गावकऱ्यांनी अवनी बद्दल याचिका टाकणाऱ्या नां , सोशल मीडियावर अवनी ची बाजू मांडणाऱ्या मेणबत्ती बहाद्दरानं फक्त त्या भागात एक महिना राहण्याची विनंति केली होती पण उंटावरून ज्ञान देणाऱ्यां पैकी एकाची ही हिंम्मत नाही झाली .
मी तर म्हणेन मुनगंटीवार हेच खरे धडाडीचे मंत्री आहेत फडणवीस सरकार मधील . महिनाभर वनखाते प्रयत्न करून सुद्धा वाघिणीला बेशुद्ध करण्यात यश येत नव्हते मग मारली असेल शिकाऱ्याच्या मुलाने पण त्या मुळे पुढचे दोन चार गरीब जीव वाचलेत ना ?
दुसरी गोष्ट गल्लीतील भटक्या कुत्र्यां मूळे कित्तेक निरागस जीव प्राणाला मुकले आहेत पण त्या मेनका बाईंना भटक्या कुत्र्यांच्या जीवाचे मोल जास्त असायचे , आशा केंद्रीय मंत्रीपदी असलेल्या हेकट बाईला जागा दाखवण्याचे काम आपल्या मंत्र्यांनी केले हे विशेष .
त्या हेकट मंत्री बाईच्या मतदारसंघात वाघिणीची हत्या झाल्याचे निदर्शनात आणून तोंड बंद केले तेव्हां पासून ती बाई गप्प आहे . अशा केसेस मध्ये आपले मंत्री नेभळटपणा दाखवतात पण आपल्या मंत्र्यांनी कणखरपणा दाखवला जो फडणवीस सुध्दा दाखवू शकणार नाहीत त्यामुळे मनापासून सलाम मुनगंटीवार साहेबांना .

Nitin Palkar's picture

13 Nov 2018 - 9:25 pm | Nitin Palkar

+११११. वन्य जीवनापेक्षा मानवी जीवन नक्कीच अधिक महत्वाचे.

सतिश पाटील's picture

14 Nov 2018 - 11:26 am | सतिश पाटील

नितीन पालकर साहेब , वन्य जीवनापेक्षा मानवी जीवन अधिक महत्वाचे आहे? हे कोण ठरवणार ? माणूसच?

सतिश म्हेत्रे's picture

13 Nov 2018 - 11:09 pm | सतिश म्हेत्रे

लोकांना प्राणी आणि मानव यामधील फरक कळत नाही हेच खरे.

सतिश पाटील's picture

14 Nov 2018 - 11:25 am | सतिश पाटील

अवनीला जिवंत पकडण्यापेक्षा तिची हत्या केली , तुम्ही याचे समर्थन करता का?

हे म्हणजे दुष्काळी भागांतील गरीब शेतकऱ्यांना स्वतःला खायला अन्न नसतांना त्या शेतकऱ्यांना धर्मोपदेशक प्रमाणे ' गाय कसायला विकू नका , गायीच्या पोटात देव असतात , गोमूत्रा मूळे एवं होत अन त्यांव होत ' असे सांगण्याचा प्रकार झाला .

जंगलात अवैधरीतीने घुसखोरी करून तस्करी साठी वाघाची शिकार करणे कधीच समर्थनीय होऊ शकत नाही पण 13 पेक्षा जास्त अजून गरीब माणसे मारली जाऊ नये म्हणून वाघाची हत्या करणं 100 टक्के समर्थनीय आहे .
आज पर्यंत पिंजऱ्यात शेकडो वाघ व बिबटे वनविभागाने पकडलेत पण ही वाघीण पिंजऱ्यात सापडत नव्हती म्हणून तिची हत्या करावी लागली त्यात कोणीही कसलाही गुन्हा केलेला नाही .
अदिवासी भागातील ज्या ज्या घरातील कर्ता पुरुष बाया अवनी ने मारल्या त्याच दुःख त्या भागातील लोकांनाच माहीत .
यावरून कंदाहार विमान अपहरण ची केस आठवली , अतेरिक्यांनी प्रवाशां पैकी रुपेन कट्याल ची हत्या केल्या नंतर उरलेल्या प्रवाशांच्या केंद्र सरकार बद्दल न्युज चॅनेल वरील संतप्त प्रतिक्रिया च्या दबावाखाली केंद्रसरकारने हाफिज ला च्या बदल्यात उरलेले प्रवाशी सोडवले .
त्याच हाफिज ने नंतर मुबंई वर हल्ला करून तमाम भारतीयांचे ( खास करून महाराष्ट्रियांचे ) चांगले च नाक ठेचले . तात्पर्य विमानप्रवाशी सगळे उच्चभृ शहरी वर्गातील होते व त्यांच्या जीवाची किंमत अनमोल होती , त्यांच्या पुढे हे 13 गावकरी किस झाड की पत्ती ? आता अवनी बद्दल तमाम शहरी उच्चभृ वर्गीयांना आलेल्या पुळक्या मूळे त्या मेलेल्या गावकऱ्यांनां नुकसानभरपाई सुध्दा लवकर भेटणार नाही हे नक्की .

लोनली प्लॅनेट's picture

14 Nov 2018 - 2:05 pm | लोनली प्लॅनेट

तुम्हाला त्या 13 लोकांचा कशामुळे पुळका आलाय कोण लागतात ते तुमचे.. आमचे जसे वन्यजीवांवर प्रेम आहे तसे तुमचे त्या 13 जणांवर प्रेम आहे असे समजायचे काय.. जंगलाचे प्राण्यांचे मोल समजत असते तर अशी प्रतिक्रिया तुम्ही दिलीच नसती.. आणि ते लोक जंगलावर जगतात.. वाघ आहेत म्हणून जंगले टिकून आहेत.. वाघ संपले कि जंगले संपणार आणि मग कशाच्या जोरावर जगणार हे लोक

' वाघ आहेत म्हणूनच जंगले आहेत ' म्हणूनच आता पर्यंत वनखाते वस्तीत आलेले वाघ , बिबटे पकडून पुन्हा दुर्गम जंगलात सोडत असते हे माहीत आहे ना ?
राहिला प्रश्न त्या 13 लोकांवर प्रेम करण्याचा !! अहो त्या 13 लोकां मध्ये तुम्ही जरी असता तरी माझ्या भावना तेवढ्याच हळव्या असत्या . कृ ह घ्या .
मेनका गांधी तुमची कोण लागती हो ?
अवनी साठी हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढल्या नंतर रात्री चिकन बिर्याणी चापणारे कोण लागतात तुमचे ?
चर्चा वयक्तिक पातळीवर वर येऊ न देण्याचे भान विसरले का ?

चिकन तंदूर फ्राय , बार्बेक्यू ,चिकन मटण बिर्याणी चापताना खुंटीला अडकवून ठेवता का हो तुमचं प्राणिप्रेम ?
या प्राण्यांना जीव नाही का ? तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तो कसाई कोंबडी आणि बकरी ची हत्या करतो ते तुम्हाला चालत का ?
का तिथे तुम्ही पाळीव प्राणी हे खाण्यासाठी वाढवले जातात असा युक्तिवाद करत बसणार ?
व्यवस्थित विचार करा आणि मगच चर्चेत भाग घ्या !!

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Nov 2018 - 6:22 pm | अनिरुद्ध.वैद्य

असो! आम्ही पडलो, शहरात राहणारे एसित बसुन काम करणारे लोक्स. त्यामुळ शेतकरी अन ग्रामीण भागात राहणार्‍या भोळ्या भाबड्या लोकांचे प्रश्न आम्हाला समजत नाहित्च. त्यामुळं काय आम्ही काहिही लिहिलं तरी फरक पडतच नाही. पण

ती नरभक्षक होती हे आदरणीय सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झालेलेच आहे. तेव्हा त्याब्दद्ल वाद नको, पण ज्या पद्धतीने तिला मारलं हे संशयास्पद आहे! आधी तिच्या बछ्डयांना पकडा अन मग तिला पकडा अन अगदीच नाही जमलं तर मारा असं कोर्टानं म्हण्लेल.

अन म्हणुनच खालचे काही मुद्दे एकुणात भयंकर खटकल्या गेलेत.

१. १३ पैकी ३च माणसांचे शवविच्छेदन करुन पैकी १ का व्यक्तीचा मृत्यु वाघाच्या हल्यात झाला असं सरकार म्हणतंय. इतर १० जणांनी कसे प्राण गमावले त्याबद्द्ल काहीच माहिती नाही. म्ह्णुन काय अवनीनं मारलं?

२. सुर्यास्तानंतर प्राण्यांना मारता येत नाही, कायदा आहे तसा.

३. रात्री ओपन जिप्सितुन का गेलेत तिकडे? मुळातच कायद्यानं परमिशन नस्तांना हे केलेलं काम.

४. शिकार्‍याच्या पोराला का नेलं तिथे? मदतनीस म्हणुन फॉरेस्टवाले नव्हतेच का?

५. कोणताही फाटका (फिल्डवाला किंवा थेअरीवाला किंवा फेस्बुकी फोटो टाकणारा) वाघप्रेमी सांगु शकेल की वाघ हा आपल्या क्षेत्रातच राह्तो इतरत्र जोपर्यंत त्याच्या क्षेत्रातुन त्याला दुसर्‍या वाघाने हुसकावल्या जात नाही, तोपर्यंत तो आपले क्षेत्र सोडत नाही, अन अगदी नियमीतपणे तो आपल्या क्षेत्रात फिरत असतो. त्यामुळ महिना महिना सापडत नाही म्हणणे खरच केविलवाणे वाटते.

सतिश पाटील's picture

15 Nov 2018 - 10:59 am | सतिश पाटील

हेच म्हणायचे होते...

अवनीच्या मृत्यू साठी वापरलेल्या पद्धतीबद्दल प्रश्नचिह्न असू शकते. आपण सर्वच आजपर्यंत अनेक प्राणी, जीवांची हत्या करुन किंवा त्यांना बेघर करूनच येथपर्यंत पोहोचलो आहोत. मग ते नदीमधील असोत वा समुद्रातील असोत वा आपण जेथे राहतो तेथे आधी कैक वर्षं राहणारे प्राणी पक्षी असोत. त्यांच्यासाठी आपण सर्व गुन्हेगार नाही का? का केवळ समोरून गोळ्या घातल्यामुळे एवढा गहजब?
अवनीला शूट करण्याचे आदेश supreme कोर्टाने दिले होते. तेथे सर्व बाजूंचा विचार करून व गरज बघूनच निर्णय दिला जातो.

कायद्याच्या आणि निसर्गाच्या कचाट्यात नेहेमीच दुर्बल लोक अडकतात. आता हेच बघा ना. ज्या लोकांनी जंगलातल्या जमिनी शेतीसाठी बळकावल्या त्यांच्या पैकी कोणी रात्री शेतातल्या घरात राहिले नसणार. म्हणजे वाघाच्या कचाट्यात सापडले ते गरीब शेत मजूर असणार. त्यांच्या पैकी अजून किती लोकांचा जीव गेल्यानंतर अवनीची हत्या समर्थनीय ठरली असती?

मला असे वाटते कि अवनीच्या हत्येमध्ये आक्षेप घेण्यासारखा भाग म्हणजे तिला लहान बछडे आहेत हे माहित असताना देखील जाणीवपूर्वक तिची हत्या करणे.

सुनामी, काश्मीर, केरळ, आणि चेन्नई येथे झालेला पावसाचा कहर पहिल्या नंतर एकाच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपण सर्वच कधीतरी जात्यात जाणारच आहोत. फक्त पाण्यात बुडून मरणार कि तहानेने व्याकुळ होऊन मरणार , झोपेतच भूकंपामुळे काळनिद्रेच्या अधीन जाणार कि जंगली श्वापदाच्या घास होणार एवढाच काय तो तपशीलातला फरक.

जगातील लवकरच एक नंबरची लोकसंख्या आणि राहायला तुटपुंजा देश. अगदी पंचवीस वर्षापर्यंत म्हात्रे पूल, संगम प्रेस, महर्षी नगर येथे शेती पहिली. आता शेती निदान तीस किलोमीटर दूर गेली आहे. राहायला आणि खायला जमीनच लागते अशी शृंगापत्ती अनुभवणारा एकमेव देश म्हणजे आपला देश असेल.

सतिश म्हेत्रे's picture

13 Nov 2018 - 11:13 pm | सतिश म्हेत्रे

इतके निराश होवू नका हो. आणखी काही वर्षात लोकसंख्या नियंत्रणात येईल. आणि हो वाढत्या महागाई आणि पाण्याच्या कमतरते मुळेच ही लोकसंख्या कमी होत आहे.

वन्य प्राणी, वाघ वगैरे बाजूला ठेवा. फक्त एकदा विचार करा १३ नाही, १ माणूस जरी मारला असला तर तो तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींपैकी आहे, आणि पुन्हा तुमचाच लेख वाचून काढा. असवेन्दनशीलतेचा कळस आहे हा कि २-३ माणसे मारली असली म्हणून काय झालं? वा!!!
राहता प्रश्न बेशुद्ध का नाही केले वगैरे ठाकरे बंधूंचे ज्ञान..एकदा वाघासमोर जा व आपली निर्णयक्षमता आणि मेंदू कसा चालतो हे बघा. मी कान्हाच्या जंगलात सुरक्षित जीप मध्ये बसून कमीत कमी २०० मी अंतरावरून वाघ बघितला होता..आणि आमची जीप आली त्या आवाजाने त्या वाघाचे आमच्याकडे लक्ष गेले, व तो हळूहळू चालत आमच्या दिशेने येऊ लागला..जीप ड्राइवर सोडून जीप मध्ये बसलेल्या सगळ्यांची कमीतकमी वीतभर फाटली होती. वाघ हा अस्सल जातिवंत सुंदर, रांगडा, पण तेवढाच क्रूर प्राणी आहे. वाघ हा लांबूनच चांगला दिसतो. एकदा तो तुमच्या जवळ आला ना, मग हे प्रश्न विचारा स्वतःलाच कि याला आपण बेशुद्ध करूया का, डोक्यावर फक्त टपली मारून पळून जाऊया का वगैरे. मूर्तिमंत भीती होती अवनी म्हणजे. आणि एकदा वाघ माणसाच्या रक्ताला चटावला कि मग तिथली माणसे गेलीच म्हणून समजा. निरुपाय होता. शिकार करायची असती तर असं शिकाऱ्याला आमंत्रण देऊन गाजावाजा करून बोलावत नाहीत. उद्या जर सरकार ने सांगितलं नसतं कि अवनीला मारलं आहे म्हणून, तर त्या गावकर्यांना सोडून कोणाला *टा कळलं नसतं. उगाच खुर्चीवर बसून शरमिंदा है वगैरे ओरडण्यापेक्षा तिथे जाऊन एकदा राहून या. कोण शरमिंदा होतंय ते नंतर बघू.
ता. क.: वैयक्तिक घेऊ नका. हा लेख सगळ्याच खुर्ची वरील व्याघ्र प्रेमींसाठी आहे.

Nitin Palkar's picture

14 Nov 2018 - 8:56 pm | Nitin Palkar

काही ठिकाणी ह्युमन राइटस वाले जसे कार्यशील झाले होते, तसे नक्की जाणवू लागलेय. असहिष्णुता! वाघिणीप्रतीकेवढी ही असहिष्णुता! केवढे हे क्रौर्य!!

सतिश पाटील's picture

14 Nov 2018 - 11:44 am | सतिश पाटील

गतिशील साहेब, ज्या गतीने आपण हा लेख वाचलंय त्यापेक्षा दुपटीने आपण प्रतिक्रिया लिहिलेय का?

तुम्ही एकटेच नाही आहेत ज्याने वाघ पाहिलंय, तुम्हीच म्हटल्याप्रमाणे २०० मी अंतरावरून तुम्ही वाघ पहिला तेव्हा जीपच्या चालकांव्यतिरिक्त बाकी सगळ्यांची वीतभर फाटली होती, फाटणारच, तुम्ही पैसे देऊन वाघ पाहायला गेला होतात, आणि जीपचालक त्याला वाघ कळला होता, वाघ त्याला नवीन नाहीये, वाघासमोर कसे वागायचे आणि काय काळजी घ्यायची हे तुमच्यासारख्या पर्यटकापेक्षा काकणभर का असेना पण जीपचालकाला ते ज्ञान होते, आणि वाघ समोर आल्यावर तुमच्या आमच्यासारख्या लोकांचा मेंदू काम नाही करणार हे मान्य आहे, पण वाघाला बेशुद्ध करायला किंवा जिवंत पकडायला वनविभाग ते तुमच्या आमच्या सारख्या पर्यटकांना हातात दाट आणि बंदूक देऊन नाही पाठवत " जा रे बाळ्या , जरा तो वाघ धरून आण पाहू." त्यासाठी प्रशिक्षित लोकांची तज्ज्ञ टीम असते.त्यांना प्रशिक्षण असते.

अवनीला जिवंत पकडण्यापेक्षा तिला ठार करून तिची २ बछडे अनाथ केले, जे जगतील कि नाही याची शाश्वती नाही, या गोष्टीचे तुम्ही समर्थन करता का?

आणि कन्हैया , ठाकरे वेगैरे विशेषणे वापरून जितेंद्र आव्हाड सारखं बरळन्यापेक्षा मुद्देसूद प्रतिक्रिया लिहिली असती तर छान वाटले असते.

ता.क.वैयक्तिक घेऊ नका

थोडक्यात तुम्हाला माणसांची मुले अनाथ झालेली, घर उध्वस्त झालेली चालतील, पण नरभक्षक वाघ जिवंत पाहिजे असा दिसतंय. चालू द्या. ज्याची जळते त्यालाच कळते. आपल्याला इथे बसून कळणार नाही तिथल्या गावातल्या लोकांची परिस्थिती. खालील लेख वाचा. क्षमा असावी, इंग्लिश मधेच आहे आणि तो तसाच इथे टाकत आहे

This is what one of my friends (Paresh Deshmukh), an avid traveller and tiger watcher, had to say on this issue. Pretty detailed.

https://www.facebook.com/paresh.desh...50933321603333

Do read it if you are interested in understanding why the Pandharkawda tigress T1 a.k.a. Avani was shot down under the orders of concerned authorities.

*(I) A LITTLE ABOUT VERY BASIC OF TIGER BEHAVIOUR -
- Tigers are territorial animals.
- Each adult individual - male or female - has his/her own territory which is regularly patrolled and maintained by them through scent marks, scrape marks, wreck marks etc.
- Cubs of any female typically live with the mother for approximately 2 years and then separate. During these two years, the mother teaches them about survival in the jungle including lessons about hunting.
- Once the cubs are around 2 years old, they have to establish their own territory. This may happen by either dethroning their own mother/father from their home territories, or moving out in search of new land.
��

*(II) A LITTLE ABOUT OUR PROTECTED AREAS -
- Our forests can broadly be divided in two parts - Protected Areas (PAs) and Non-protected Areas (NPAs).
- PAs majorly cover our National Parks and Wildlife Sanctuaries.
- A "Tiger Reserve" is a status given to any PA considering the feasibility of survival of tigers over there. As such, a tiger reserve may consist of a National Park, or a Wildlife Sanctuary, or both - Pench Tiger Reserve being a good example.
- NPAs are typically small, fragmented patches of forests surrounded by farm land, villages, small towns, roads, railway lines etc.
- Though a large of portion of our wildlife enjoys the benefits of PAs, it is worth noting that a considerable number of animals stay outside our PAs.
- Our Tiger Reserves (PAs) enjoy great protection with thorough monitoring of wildlife, and protection teams like the Special Tiger Protection Force (STPF).
- The non-protected areas, even though they are tiger bearing, have little protection.
��

*(III) A LITTLE ABOUT ANIMAL MOVEMENT -
- Many of the animals regularly migrate from one place to the other - be it a long-distance migration, or local migration.
- As discussed in the first section, sub-adult tigers typically move out of their birth territory in search of establishing their own turf.
- Such movement of tigers include movement from one PA to the other PA or from within a PA to a NPA.
- When a tiger moves from a PA to another PA, it has to pass through a human dominated landscape, thus getting it closer to humans.
- When a tiger moves out of a PA to a NPA, it puts itself close to humans.
- Tigers who are born in the NPAs itself are closer to humans from the beginning.
��

*(IV) WHEN DOES A TIGER BECOME A MAN-EATER –
- This is a subject of complete separate discussion, but I will try to talk a little.
- FIRST AND FOREMOST – there is a huge difference between when a tiger KILLS a human and when a tiger EATS a human.
- Killing of humans by a tiger can be out of self-protection. We have a problem when the tiger starts to eat the human flesh.
- As per guidelines, to label a tiger as a man-eater, it should be established in at the least three cases that beyond reasonable doubt, the particular tiger is the culprit of killing and eating humans.
- A man is not the natural prey of the tiger. Just like our mothers tell us what is edible, a tigress teaches the cubs what to eat, and humans are not on that list.
- A tiger may start eating human flesh either because old-age would not let it kill the natural prey, or because it first kills a human for self-defense and accidently eats the flesh, thus getting to know that it is edible. But again, it is very very difficult to know HOW a tiger becomes a man-eater.
- However, it can be said with some confidence that if a tigress is used to hunting and eating humans, it is likely that her cubs will also follow the same route.
��

*(V) PRESENT CASE OF T1 a.k.a. AVANI –
- A huge chunk of her territory is covered with small villages, farm lands etc.
- Her first human kill was in 2016, and since then, she had killed 12 more humans.
- At present, she was a mother to two 10 months old cubs.
- Forest Department was working towards mitigating this human-animal conflict and spreading awareness among villagers about do’s and don’ts about living in a tiger dominated landscape.
- It was after she made 3 humans kills in a row that order to capture her or to shoot her were put in force by the PCCF.
- The said order was challenged by activists in Supreme Court and the Supreme Court, considering the situation on the field, upheld the PCCF’s orders.
- The orders were to either tranquilize and capture the tigress alive, or to shoot her down. The efforts of the search team were in the said direction, and if the tranquilizing could not be achieved, she was destined to meet the unfortunate end.
��

*(VI) WHY IT WAS PERTINENT TO MOVE HER OUT OF THE LANDSCAPE –
- As people living in urban areas, it is very difficult for us to imagine a life in a wildlife dominated landscape. A few people in Mumbai can imagine how it must feel like to have a leopard come into your society at night and take away the dogs as their prey.
- Communities who live in a wildlife dominated area are typically exposed to crop raids by herbivores, cattle killing by carnivores, and at times, even human killings by carnivores.
- It is very hard for us to imagine the loss of money, and loss of life they must be facing. Irrespective of such losses, their acceptance towards the presence of wildlife is remarkable.
- Forest Department has a key role in maintaining this acceptance of communities towards wildlife. They compensate the villagers for loss of crops, loss of cattle, and loss of human life.
- As such, the animals can stay in peace because the local communities are tolerant towards them. NO CONSERVATION ACTIVITY CAN BE A SUCCESS WITHOUT THE SUPPORT OF THE NATIVE COMMUNITIES.
- If T1, after 13 human kills, was allowed to stay in that landscape, we would have lost the confidence of the locals, thus putting all our future conservation activities in danger.
- We have to save the tigers as a species and not one particular tiger who was convicted as a man-eater.

��

*(VII) THE ROOT OF THE PROBLEM –
- T1 is a representative example of the real problem here – we are losing our forest cover real fast, and it is not a good sign.
- Tiger sits at the top of food chain, and thus, is an indicator of a healthy ecosystem. If we lose our forest cover, we are destroying the habitat for our wildlife, making the animals get closer to humans, thus increasing the chances of a conflict.
- Movement of animals should be safe and without any disturbance. Such movement is critical for exchange of gene pool to ensure long term survival of the species.
- In order to make this movement safe, we have to establish and maintain GREEN CORRIDORS between the forests.
- Development is necessary, but it should be sustainable, and not at the cost of nature, for there cannot be human survival without our jungles.
��

*(VIII) KILLING OF T1 UNDER SUSPICIOUS CIRCUMSTANCES AND POLITICISING THE DEATH –
- Yes, she could have been tranquilized and kept in captivity for the remainder of her life. However, the current search operation was already in its 8th month and a considerable amount of resources were spent in searching her. As such, shooting her down, if the circumstances are such, was very much on the table.
- It is alleged that the way in which she was killed was suspicious, and that she could have been tranquilized instead. If this is the case, the post mortem report will suggest so and necessary actions should be taken on the people involved.
- Many are trying to blame the authorities for the killing. It is difficult to understand this view point when our Forest Department works sincerely and with all their might to save our tigers. Had the circumstances not forced them, they would not have wanted the death orders on the table.
- Some are trying to link this death for politically blaming the ruling party. I completely agree that this not a really good government when it comes to environment. They have allowed destruction of key landscapes for projects like railway line through Melghat, road widening through the Kanha-Pench corridor, Ket-Betwa river linking etc. However, it is hard to imagine them taking particularly keen interest in this single tigress, when there are other tigers too in the same landscape.
��

*(IX) SOCIAL MEDIA ACTIVISM – THE BIGGEST PROBLEM EVER –
- People on social media have come out to support the “Save Avani” campaign like crazy. There are posters, videos, posts, petitions all over.
- How many of them have a tiger or a leopard lurking around in their backyard?
How many of them have lost their crops to animals?
How many of them have lost their cattle to animals?
How many of them have a family member killed by a tiger?
It is very easy to post/like/comment/sign a petition from the comforts of our homes, but how many of them know what the ground realities are?
How many of them know about the anger of villagers the Forest Department has to deal with after a human death?
- Man-Animal conflict is a critical issue and requires comprehensive understanding of animal behavior, skills to manage people and their sentiments, and at the same time, take decisions that are best for the wildlife in long term – no matter how harsh they may sound right now.
��

It is not difficult to understand the real issue and the complications involved. I do not have an academic background in conservation, and yet I am able to apply logic and make an informed decision.
I sincerely request you all that the next time you come across such an issue, rather than blindly trusting what you are reading, please try and analyze the entire subject. It is much much more complicated than it may look. Make an informed decision.
Saving our wildlife is not just government’s task. It is a collective responsibility of all of us.
Get your mind out of your safari vehicle and get your eyes away from the viewfinder of your camera – conservation is much bigger than going on safaris and clicking pictures of tigers.
Saving our jungles is critical for our own survival. Let us work towards that.

- Paresh
4th November 2018

(Tagging those people herewith who I feel can be relevant. Please feel free to un-tag yourself if you do not wish to be tagged.)

Update to the original post - 5th November 2018
After reading many opinions about this issue, I feel that there is a need to post an update to the original post. I sincerely request every person who has liked/commented/shared this original post to read the update as well, and those who have shared the original post - do copy+paste the update in comments of your shared posts.
So here it goes -

UPDATE 1 TO THE ORIGINAL POST - 5TH NOVEMBER 2018

(A) TRANQUILIZING vs KILLING -
- There is absolutely no debate when it comes to this argument. She should have been tranquilized and kept in captivity instead of killing. However, things are much easier said than done.
- A few points which I have discovered in this regard are that the landscape in the problem area does not have a lot of strong trees. Most of the vegetation is shrubs and small trees, thus making it difficult to build machans to sit-out and wait for the tigress to move or come close to a bait so that she can be shot with a tranquilizing dart. Further, it is a rocky landscape which makes it difficult to track the pugmarks as compared to a sandy landscape.
- Considering all of this, I am sure that Forest Department had tranquilizing as their primary approach, but again, it is very difficult to understand the field realities and problems while sitting here.
��

(B) CLAIMS OF KILLING UNDER SUSPICIOUS CIRCUMSTANCES -
- If that is indeed the case, an investigation should be made and necessary action should be taken against those responsible.
- I am not sure why the FD had to go with the shooters from Hyderabad and why they had no other options for the task. However, there are claims that the person who executed the killing did not have the authority to do so. In this regard, a person has shared photos of orders of the CCF of that area in which names of members of Shafat Ali Khan's team are mentioned. That list bears the name of his son along with a few others.
- A laughable claim is that the tigress was killed to satisfy the blood thirst of the appointed shooter. In this regard, please note that the Forest Department is a honorable body that works beyond limits to protect our jungles and wildlife. They are not someone with who some shooter can toy with. Experience the field work with them, try and interact with them and then you shall know. The shooters were under the strict orders from FD and they were obliged to follow them.
��

(C) CLAIMS ABOUT THE LAND BEING DIVERTED FOR MINING -
- It widely talked that 467 hectares of land has been acquired by Reliance Cement Company Private Limited (RCCPL) to set up a cement plant. Please note that the initial clearances for acquisition of this land were given back in 2012. RCCPL, along with its existing projects in UP and MH, was taken over by Birla Corporation Limited (BCL) in August 2016. BCL declared in August 2018 that they are going to set-up a new plant in the said 467 hectares land.
- The said 467 hectares of land is located around Mukutban.
- Mukutban is situated at an distance of over 80 km (road distance) from the current conflict area of T1 (which was area around Ralegaon - for those of you who do not know that.) Though, this area is close to Tipeshwar WLS, it is not that close to the current problem zone. - Further, 467 hectares are around 4.70 square kilometers. The said territory of T1 was over 120 square kilometers. (Please note that in no way here it is suggested that the it is ok to let go a few square kilometers of forest. Every inch is critical. I am just trying show a relative picture here.)
- It seems a long shot that all this mess was created by the government just so that this particular cement project could begin for which land was already transferred and initial clearances were already given as long ago as 2012!
- I am not saying that the current government is very clean when it comes to environment. Please refer to point (VIII) in the original post. All I am saying that linking the RCCPL cement plant to T1 conflict seems like a long shot.
��

(D) WHAT IS WITH ALL THE EMOTIONAL DRAMA?
- I have seen countless posters, videos, texts with emotional messages regarding the action taken.
- I can understand that one may feel sorry for the way things turned out to be. Even I am saddened that the tigress had to be shot instead of being captured alive. But we have to understand that overspread of direction-less emotions can be a great fuel for wrong messages, rumours, and ill-informed opinions.
- We do not want unnecessary expression of direction-less emotions. We want people to be emotional, but still have the ability to see things through for what they are. THAT will lead to though-driven action. Emotional drama will not achieve anything.
��

(E) VERY IMPORTANT - THE PURPOSE OF THE ORIGINAL POST
- The purpose of the original post was to make it a point that none of us urban dwellers, including myself, can imagine -
(a) co-existing with wildlife in a wildlife dominated landscape, and,
(b) the field situations faced by the forest department.
- Please note with all your attention that the people who do live along with tigers or leopard or elephants or rhinos in their backyards, are far far more accommodative to wild animals than any of ever can be! The jungle stands because of them, and the jungle falls because of our needs. Their support is critical to any conservation activity. Please think of that the next time you come across such an issue.
- Further, please understand that it is not an easy task to maintain a jungle, to walk 10 km a day to patrol, to deal with fishing mafias, to deal with poachers who come with SMGs in their hands. It is very easy to say that "If she can be shot with a bullet, the she could be shot with a tranquilizing dart" but the ground realities can very well be different.
��

Kindly consider the above points as well in forming your opinion. I am going to post all of this in the original post as well

पप्पुपेजर's picture

14 Nov 2018 - 2:24 pm | पप्पुपेजर

This is one of the best explanation by Paresh as he owns and works for footloose he is having heavy credentials to talk about this.
He has worked with forest departments in hand and know the ground realities.
People who are just commenting about the killing will never give a answeर् if the dead person if from there family what will be their reaction ot it.
And i will suggest all the people who are giving comments about the killing that they should stay with villagers in the area and see if they can work in the habitat.

मार्मिक गोडसे's picture

14 Nov 2018 - 12:23 pm | मार्मिक गोडसे

पिंजरा लावून अवनीला जिवंत पकडता आले नसते का? तीची व तिच्या पिल्लांची देखभाल करण्यास काय अडचण होती?

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Nov 2018 - 6:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

मध्यप्रदेश अन रणथंबोर मधले वाघ जेव्हा नरभक्षी झालेले, तेव्हा त्यांना व्यवस्थीत पकडुन झु मध्ये रिहॅब केलेले.

झेन's picture

14 Nov 2018 - 1:00 pm | झेन

लोकसत्ता मधे आलेला लेख एक बाजू अशीही मांडतो

https://www.loksatta.com/maharashtra-news/tiger-suffering-villagers-chal...

विवेकपटाईत's picture

14 Nov 2018 - 1:09 pm | विवेकपटाईत

एकदा मागासलेल्या भागातुव आलेल्या आईएएस अधिकार्याने सहज बोलताना म्हंटले," विवेकजी एसी कमरे में बैठकर समस्याओं पर चर्चा करनेवाले गाँव के लोगोंको इन्सान समझते ही नहीं है. कभी कभी लगता है , ये लोग मानसिक विकृतीसे ग्रस्त हैं. "
नरभक्षी वाघीणीला मारल्या गेले ते ही कोर्टाचे आदेश घेउन. महानगरात राहणार्या तथाकथित वन्यप्रेमींच्या प्रतिक्रिया वाचून त्या अधिकार्याचे शब्द आठवले. १. गावकरी जंगलात का गेले? ते तिथे हजारो वर्षांपासून राहतात. अधिकांश वेळी जंगलातून बाहेर शिकार करणारे वाघ/ बिबटे नरभक्षी होतात, हि साधी माहिती या अतिशहाण्यांना नाही. हि वाघीण हि जंगलाच्या बाहेर पडलेली होती.
२. गावातील लोकांनी पैश्यासाठी मेलेल्या माणसांना जंगलात ठेवले व वाघिणीच्या हल्ल्यात त्यांच्या मृत्यू झाला असा कांगावा केला. शहरात शेजारी मेला तुम्हाला माहित नसेल पण गावात कुणीही मेले तरीही पंचक्रोशीत लोकांना कळते. कुणीही आपल्या स्वकियाचे प्रेत जंगलात फेकणार नाही. ३. ज्यांचे आप्त गेले त्यांनी वाघिणीच्या मृत्यू वर हर्ष केला. त्यात वागवे काय. तुमचा शत्रू मेल्यावर तुम्ही हि प्रसन्न होणारच. ४. शेवटचा कहर म्हणजे वाघिणीने कुणालाच मारले नव्हते. तिच्या पोटात मानवी अवशेष सापडले नाही. काही महिने आधी खालेल्या व पचलेल्या माणसाचे अवशेष पोटात सापडण्याची शक्यता कमीच असते. याचा अर्थ तिने कुणाला मारले असा होत नाही.

अश्या प्रकारे अनेक प्रतिक्रिया होत्या. सर्वच गावकरी खोटे बोलतात. हीच मानसिक विकृती. पूर्वी हि आतंकवादीच्या मृत्यू नंतर हि असेच प्रश्न उठविले जात होते. पोलीस मनोबल तोडण्यासाठी. आत्ता हि वनविभागाचे मनोबल कसे तुटेल हेच प्रयत्न आहे. आता या प्रकरणात असेल्या वनाधिकार्यांना मानसिक त्रास होणार आहेच. असेच सुरु राहिले तर वनविभागातील अधिकारी कर्मचारी कितीही मानवी हत्या झाल्या तरी त्या नरभक्षक प्राण्याला मारण्याचा प्रयत्न करणार नाही. उगाच डोक्याला ताप. जे सुरु आहे चालू द्या. हीच भूमिका पूर्वी सुरक्षा दलांनी घेतली होती. "मर गये तो पेन्शन, बच गये तो टेन्शन". टेन्शन घेण्यात अर्थ नाही. परिणाम ग्रामीण जनता आपल्या प्राणांच्या रक्षेसाठी अवैध शिकार्यांना सर्वच हिंस्त्र प्राण्याची सूचना देईल. आज जर त्या वाघिणीचे पिल्ले वनविभागाला सापडले नाही तर त्याचे खरे गुन्हेगार एसीत बसून शेळ्या हाकणारे तथाकथित पशुप्रेमी राहतील.

कपिलमुनी's picture

7 Dec 2018 - 11:12 pm | कपिलमुनी

हेच वाक्य शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणाले की मज्जा येते !
एसी मध्ये बसून शेतकऱ्यांना सलले देणारे असेच महाभाग असतात

खिलजि's picture

14 Nov 2018 - 1:22 pm | खिलजि

ह्ही ह्ही ह्ही ,, ह्ये बाकी शंभर टक्के खरं आहे हा .. अहो मला वाघाचा अनुभव घ्यायला कान्हाला जावे लागले नाही तर तो इथेच आला . बोरिवली नॅशनल पार्कमध्ये . त्याच झालं असं , आम्ही सर्व तिथे पांढऱ्या वाघाची जोडी आणि आपले साधे पट्टेदार वाघ बघायला सफारीमधून गेलो . तिथे सर्व सूचना व्यवस्थित लिहिल्या होत्या . माझ्या मोठ्या मुलाने मोबाईलमधून फोटो काढायला सुरुवात केली अन काढताना मोबाईल त्याच्या हातातून खाली पडला . दोन पांढरे वाघ आणि तीन पट्टेरी वाघ तिथेच तलावात आतबाहेर करत होते . दरवाजा आतून बंद होता आणि मी ड्रायव्हरला विनंती केली कि मोबाईल खाली पडला आहे तर तो पटकन उतरून घेऊ का ? त्याने आधी नाही म्हंटले नंतर त्याला काय वाटले कुणास ठाऊक तो म्हणाला पटकन जा आणि या . दरवाजा उघडला आणि मी खाली उतरलो . वाघ जेमतेम वीस तीस पावलांवर असतील . मला वाटलं काय करणार आहेत , मी पटकन गेलो मोबाईल उचलला आणि बघतो तर काय तीस पावलांवरचे वाघ (दोन) फारच जवळ आले होते धावत . मी घाईतच आत घुसलो आणि पटकन दरवाजा बंद केला .. कानावरून गोष्ट गेली . माझ्यासकट सर्वांची खरंच वीतभर फाटली होती . च्यामारी जर पिंजऱ्यातले वाघ इतके डेंजर तर जंगलातले कसे असतील त्याचा विचारच ना केलेला बरा...

लोनली प्लॅनेट's picture

14 Nov 2018 - 1:55 pm | लोनली प्लॅनेट

कोर्टाचा स्पष्ट आदेश होता कि आधी तिच्या बछड्यांना पकडा आणि मग अवनी ला बेशुद्ध करा आणि अगदी नाईलाज झाला तरच मारा.. पण या निर्लज्ज लोकांनी फक्त मारायचेच ठरवले तेही सगळे नियम पायदळी तुडवून.. जर ती नरभक्षक असती तर तिने गावात घुसून लोकांवर हल्ले केले असते.. आणि आत्तापर्यंत 60-70 लोक मारले गेले असते.. तिने फक्त आपल्या पिल्लांच्या रक्षणार्थ हल्ले केले.. only self defense म्हणजेच तिच्या नरभक्षक असण्याचा कोणताही पुरावा नाही फक्त लोकांनी सांगितले म्हणून.. ते ऐकायलाच हवं ना कारण मग पुढील वर्षी मते कशी मिळणार.. वाघ थोडीच मतदान करतात.. तिला मारताना एका तरी महाभागाच्या डोक्यात (मनात म्हणणार होतो पण असल्या लोकांना मन थोडीच असणार) तिच्या निष्पाप बछड्यांचा विचार आला नाही.. यांना माणूस म्हणून घ्यायची देखील लाज वाटली पाहिजे.. एक वाघीण मारणं म्हणजे 10 वाघ मारणं कारण ती पिल्लाना जन्म देत असते.. जंगलात वाघ आहे ते त्यांचे घर आहे आपण तिथे जाऊ नये हा common sense आहे.. आणि जर वाघ संपले तर जंगलही संपेल मग कशाच्या जोरावर जगणार हे लोक.. जगण्याचा मूलभूत अधिकार असणाऱ्या कोणाही प्राण्याला मारण्याचा अधिकार कोणालाही नसतो.. तिला बेशुद्ध करून दुसऱ्या जंगलात सोडणे अगदी शक्य होते.. आता तर अशाही बातम्या येऊ लागल्या आहेत कि तेथे cement factory होणारे म्हणजेच यामागे corporate हात आहेत.. मुनगुंटीवार साहेब दिवाळीत त्या लोकांच्या घरी जाऊन आले.. 5 वर्षाचं पोरगंही सांगेल कि ते मते मागण्यासाठी गेले होते .. आपल्या वाघ वाचवा मोहिमेचे ambassador आहेत बच्चन साहेब.. एक चकार शब्दही काढला नाही त्यांनी तोंडातून.. पैसे दिले कि काढतील म्हणा.. जंगले त्यातील सुंदर निष्पाप प्राणी जर असेच हकनाक मरत राहिले आपण पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत.. मी माझ्या फेसबुक वर याबाबत 4 post टाकल्या होत्या.. अक्षरशः कोणीही त्या like केल्या नाहीत उलट विरोधात प्रतिक्रिया दिल्या.. किती संवेदन शून्यता.. या घटनेचे गांभीर्य फक्त त्यांनाच समजते ज्यांचे वन्यजीवांवर प्रेम आहे. खरंच "अवनी हम शरमिंदा है"

सतिश म्हेत्रे's picture

14 Nov 2018 - 2:24 pm | सतिश म्हेत्रे

.... वन्यजीवांवर प्रेम आहे. आधी इतर मानव जाती वर प्रेम करा म्हणाव लोकांना. त्याची खरी गरज आहे.

सतिश म्हेत्रे's picture

14 Nov 2018 - 2:25 pm | सतिश म्हेत्रे

.... वन्यजीवांवर प्रेम आहे. आधी मानव जाती वर प्रेम करा म्हणाव लोकांना. त्याची खरी गरज आहे.

कोणताही निष्पाप प्राणी किंवा मनुष्य मारला जाणं हे खूप खेदजनक आहे याबद्दल दुमत नसावं. या केसमध्ये वाघिणीवरचे आरोप खरे की खोटे यावरच संशय घेतलेला काही ठिकाणी दिसतो. जर वाघिणीने गावकऱ्यांना मारलंच नसेल तर ही वाघिणीची शिकार दुर्दैवी आहे.

पण उलट बाजूने एक प्रश्न पडतो की मारण्याचे आदेश देणारे मंत्री आणि ते शिकारी बाप लेक यांना उगीच ही वाघीण मारुन काय मोठा फायदा होणार होता / झाला? तस्करी हा उद्देश असणारे लोक शिकार गुपचूप आणि अनामिक राहून करतात. उघड गाजावाजा करून नव्हे.

इतर कोणता फायदा असेल ? तो काही मोठा बिग बजेट किंवा मलिदा खायला मिळणारा प्रकल्प नव्हता किंवा कोणता राष्ट्रीय गौरव पुरस्कारही नव्हता.

उलट लाभार्थी गावकऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त अशा काही एका लोकसंख्येकडून टीका होणं हा अपेक्षित धोका असूनही मंत्री तो निर्णय का घेतील?

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Nov 2018 - 6:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

वाघाच्या संरक्षणात न संवर्धानात. आपलेच कराचे पैशे हायेत ते. आपलच नुस्कान होत्यय त्यात.

ओके. त्या बजेटचा लाभ मिळवायचा असा उद्देश असू शकतो. ही शक्यता वैध आहे.

मग इन दॅट केस, थेट ठार करण्यात जास्त बजेट कसं जाईल?

उलट पकडण्याची प्रोसेस दीर्घकाळ लांबवणं, त्यासाठी उपकरणं, अधिक खर्च असं नसतं का केलं?

शिकारी किंवा मंत्री यांना तडकाफडकी वाघीण मारण्यात काय फायदा असावा?

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2018 - 9:20 am | अनिरुद्ध.वैद्य

सुमारे १० ते १५ बाल बच्चे होतात (तिचे पिल्ल तिच्या पिल्ल्यांची पिल्ल) , तेव्हा झालेलं नुकसान भरपुर आहे.

नितीन पालकर साहेब , वन्य जीवनापेक्षा मानवी जीवन अधिक महत्वाचे आहे? हे कोण ठरवणार ? माणूसच?<

नको. कशाला? ते वाघांनाच ठरवू द्या की! असंही समोर आलेल्या माणसाला मारु नये, त्याच्या मागं त्याची लेकरं असतील त्याचं कुटुंब उघड्यावर पडेल असा काहीतरी विचार करुनच ते माणसांना मारत असतील की! किंवा माणसांना कोणत्या पद्धतीनं मारावं, कोणत्या परिस्थितीत मारावं याची कडक नियमावली असेल व सर्व वाघ त्याचं कसोशिनं पालन करत असतील . तसंच अशा नियम न पाळता माणसांना मारणाऱ्या वाघांवर इतर मानवप्रेमी वाघ एखाद्याधाग्यासदृश्य जागेवर जोरजोरात चर्चा करुन त्या वाघाला टोचून टोचून बोलण्याची व एकटं पाडण्याची किंवा शिक्षा देण्याची तरतुद करतीलच. त्यामुळे कोणाचे जीवन महत्वाचे हे ठरवण्याची जबाबदारी वाघ प्रजातीला द्यायला आपली काहीही हरकत नाही ब्वा.

झेन's picture

14 Nov 2018 - 3:37 pm | झेन

<त्यामुळे कोणाचे जीवन महत्वाचे हे ठरवण्याची जबाबदारी वाघ प्रजातीला द्यायला आपली काहीही हरकत नाही ब्वा.code>

तसपण जबाबदारी ही दूस-यांचीच असते.

निष्पाप प्राण्यांच्या बद्दल असेल तर पोल्ट्री, कत्तलखान्यातल्या जिवांची काही किंमत नाही ? त्यांची रोज कत्तल असते.
उगाच एका वाघाच्या म्रुत्युचा एवढा बाजार मांडला आहे, ते पण . . "तेरे कातिल जिंदा है " या चालीवर ?

सतिश पाटील's picture

14 Nov 2018 - 5:20 pm | सतिश पाटील

झेनबाई चुकलंच बघा आमचं , एवढी कोंबड्या बकरी खाण्यासाठी कापली जातात ते आम्हाला चालतंय ,
पण एक वाघ मारल्याचा नुसता थयथयाट लावलाय आम्ही..छया .. डोळे उघडले आपण आमचे..

आणि ते "तेरे कातिल अब भी जिंदा है" हि चाल तुम्हीच लावलीत
अवनी हम शरमिंदा है , तेरे लिये कुछ ना कर सके, अवनी हम शरमिंदा है ... अशी काहीशी आमची चाल होती.

मार्मिक गोडसे's picture

14 Nov 2018 - 6:09 pm | मार्मिक गोडसे

निष्पाप प्राण्यांच्या बद्दल असेल तर पोल्ट्री, कत्तलखान्यातल्या जिवांची काही किंमत नाही ? त्यांची रोज कत्तल असते.
चुकीची तुलना करताय तुम्ही. पाळीव प्राणी खाण्यासाठी वाढवून मारल्याने वन्यजीव साखळीवर काहीही परिणाम होत नाही, ह्याउलट वन्यजीवन अन्नसाखळीतील मांसाहारी प्राणी मारल्याने पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे.

झेन's picture

14 Nov 2018 - 7:08 pm | झेन

निष्पाप प्राणी, दोन पिलांची आई असा सूर वाटतो आणि त्या दोन पिलांच्या आईला क्रूरपणे मारणे वगेरे ..

वाघाला मारण्यासारखेच पोल्ट्री आणि इतर पशू कत्तल करण्यासाठी वाढवणे ही पण निसर्गात ढवळाढवळच आहे. आतातर कृत्रिम पध्दतीने गाईला/म्हशीला स्रिय पाडस (नेमका शब्द ?) होणे भारतात शक्य झाले आहे.

वाघाच्या बाबतीत, माणूसपणाचे सगळे ओझे परस्पर तिथल्या गरीब गावकऱ्यांवर सोईस्करपणे टाकणे पण गंमतीशीर वाटते.

मार्मिक गोडसे's picture

14 Nov 2018 - 7:57 pm | मार्मिक गोडसे

वाघाला मारण्यासारखेच पोल्ट्री आणि इतर पशू कत्तल करण्यासाठी वाढवणे ही पण निसर्गात ढवळाढवळच आहे. आतातर कृत्रिम पध्दतीने गाईला/म्हशीला स्रिय पाडस (नेमका शब्द ?) होणे भारतात शक्य झाले आहे.
ह्याने पर्यावरणाचे कसे नुकसान होते हे समजले नाही.

झेन's picture

14 Nov 2018 - 8:08 pm | झेन

लेखाच्या शिर्षकापासून 'पर्यावरणचे नूकसान' हा एकच मुद्दा आहे असे खरंच वाटत नाही.

विशुमित's picture

14 Nov 2018 - 8:16 pm | विशुमित

धागालेखकाचा मुद्दा भाजप विरोध आणि समर्थकांचा भाजप-बचाव असे तर नाही ना??
नाही म्हंटलं, आजकाल एवढंच बाकी आहे देशात. कृपया गैरसमज नसावा.

अस्वस्थामा's picture

14 Nov 2018 - 9:04 pm | अस्वस्थामा

विशुमित भाऊ, सोशल मिडियावर हे असं चाललेलं पाहून तर 'मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी ..' या म्हणीचीच आठवण येते. कोण मेलेय महत्वाचं नाही, एक तर सरकारला (कोणत्या पक्षाचं आहे ते बघून) बदडा, नाहीतर डिफेंड करा.. मग कोणी जरा मुद्द्याचं बोललाच तर त्याला विरोधी म्हणून आधीच इग्नोरून टाका. हेच सगळं.
इथे, धागालेखकाचा हेतू राजकिय वाटत नाही पण खूपच भावनिक आहे त्यामुळे त्यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया येत आहेत (जे की चुकीचेच आहे ). तर इतर प्रतिक्रिया मात्र दुर्दैवाने त्याच नेहमीच्या राजकिय वळणावर जाताहेत.

विशुमित's picture

14 Nov 2018 - 10:55 pm | विशुमित

+1

तुम्हाला एक गंमत माहितेय का?
या मुद्द्यावर भाजपा समर्थक गदारोळ करतायत आणि विरोधक सरकारची बाजू घेऊन भांडतायत..
कोणाची बाजू नेमकी कोणती आहे काही कळेनासं झालंय बघा...

सतिश पाटील's picture

15 Nov 2018 - 11:04 am | सतिश पाटील

हा धागा राजकीय स्वरूप न पकडो एवढीच इच्छा

मार्मिक गोडसे's picture

14 Nov 2018 - 4:53 pm | मार्मिक गोडसे

अवनीला जे इतक्या जवळून गोळ्या घालून ठार करू शकतात त्यांना तीला बेशुद्ध करणे अवघड नव्हते. कोर्टाने ठार करणे हा शेवटचा पर्याय सुचवला होता.

विशुमित's picture

14 Nov 2018 - 5:39 pm | विशुमित

अवनी बाबतीत वन खात्याने सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि Standard Operating Process (SOP) पाळली का, फक्त एवढीच चर्चा अपेक्षित आहे.
बाकी मिपावर कोणालाच किंमत नाही आहे. ना माणसाला ना प्राण्यांना! हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

विशुमित's picture

14 Nov 2018 - 5:43 pm | विशुमित

बाकी मिपावर दोन्हीना किंमत आहे. माणसाला आणि प्राण्यांना ! हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
...
असे पण वाचू शकता. नाहीतर मान्यवर वाघ चवताळून यायचे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Nov 2018 - 6:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

नाही पाळली. कायदे मोडले सरकार्नेच.

गामा पैलवान's picture

14 Nov 2018 - 5:41 pm | गामा पैलवान

सतिश पाटील,

तुमचा उद्वेग पोचला. शासनावर दोष येतो तो अवनीस जिवंत न पकडण्याचा आहे.

वाघांची संख्या वाढली, पण त्यांना राहायला जंगलं नाहीत. अतिरिक्त वाघ मोजून, त्यांना पकडून इतरत्र सोडायची कुठलीही यंत्रणा दिसंत नाही. एकंदरीत वन्यजीव व्यवस्थापनाचा पूर्णत: अभाव दिसतो आहे.

जास्तीचे वाघ पकडून त्यांना प्राणीसंग्रहालयात ठेवता येईल का याची चाचपणी व्हावी. पिंजऱ्यातला एक वाघ किती लोकांना रोजगार देऊ शकेल याची आकडेमोड जाहीरपणे व्हायला हवी. अर्थात हा आकडा जंगलावर अवलंबून असलेल्या लोकांच्या तुलनेने लहानंच असणार आहे. तरीपण लोकांची सुरक्षा, रोजगार एकीकडे आणि दुसरीकडे व्याघ्रसंरक्षण यांचा ताळमेळ साधण्यासाठी ही आकडेमोड आवश्यक आहे.

आ.न.,
-गा.पै.

लोनली प्लॅनेट's picture

14 Nov 2018 - 5:44 pm | लोनली प्लॅनेट

1

अस्वस्थामा's picture

14 Nov 2018 - 5:50 pm | अस्वस्थामा

न रहावून विचारतोय. पोटतिडिकीने लिहिणार्‍या सर्वच लोकांनी वरचा परेश देशमुखांचा इंग्रजीतला लेख वाचलात का ? त्यातल्या स्पष्टीकरण अथवा मताबद्दल आक्षेप/दुरुस्त्या असतील तर मग त्याबद्दल बोलले जाईल का ?
सोशल मिडिया आणि इतर मिडिया वगैरे या सगळ्या गदारोळात ती पोस्ट एकच संयत आणि लॉजिकल वस्तुस्थिती मांडणारी आढळली (मलातरी) आणि नक्कीच अशा मतांना चर्चेत वरचं स्थान असावं असं वाटतं. किमान मी तरी बरंचसा शांतपणे विचार करु शकतोय ते वाचल्यावर.

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Nov 2018 - 6:44 pm | अनिरुद्ध.वैद्य

अवनी मॅन ईटर होतीच, पृव्हन विथ डाऊट का असेना. प्रश्न तिला कस मारलं ह्याचा आहे. अन तिथच सरकारनं कायदा मोडलाय.

अस्वस्थामा's picture

14 Nov 2018 - 8:53 pm | अस्वस्थामा

नाही हो नाही वाचला

वाचावा असं म्हणेन. तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगने चांगलं विवेचन आहे. आणि सरकारपेक्षा पण एक व्यवस्था म्हणून भाष्य असल्याने जास्त नीट मांडलंय त्यांनी.

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Nov 2018 - 9:21 pm | अनिरुद्ध.वैद्य

त्यानी

१. रात्री का मारलं
२. शिकार्‍याच्या मुलानं परवानगी का मारलं
३. ओपन जीप्सीतुन का जंगलात गेले रात्रिच्या वेळी
४. परवानगी नसतांना लोकं जंगलात का गेले

हया प्रश्णाना उत्तरच दिलेलं नाहिये.

धन्यवाद.

अस्वस्थामा's picture

14 Nov 2018 - 9:40 pm | अस्वस्थामा

मला वाटतं, मी अथवा ते लेखक कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला पाहतायत असं नाहीय. फक्त भावनिक उद्रेकापेक्षा मुद्देसूद वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न आहे असं मला वाटलं. लेख वाचला असेल तर प्रश्न २ आणि ४ याची उत्तरं दिली आहेत. प्रश्न १ आणि ३ बद्दल मी शिकारी, वन अधिकारी अथवा या विषयातला तज्ञ, माहितगार नसल्याने काही सांगू शकणार नाही. पण हे प्रश्न असतील तर पर्याय चर्चेत अपेक्षित असावे. अन्यथा 'दिवसा अथवा रात्री, ओपन जिप की बंदिस्त जीप' हे माझ्यासाठी तरी परस्पर-संबंध न समजणारे प्रश्न आहेत (का मारले हा प्रश्न माझ्यासाठी तरी मोठा आहे.)
असो.

रात्री जंगलात जाणं अन त्यात रात्री ओपन जीप्सी वापरण हे सरळ सरळ कायद्याच उल्लंघन आहे म्हणुन तर गोंधळ. जर रात्रीच जायच होत तर बंद जीप घेऊन गेले असते तर किमान गोळी घालुन जीव घ्यायची वेळ आली नसती.

असो.

वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे

कुत्री नव्हे हा भाग नकोसा वाटला. वाघ वाघच असतो हे मान्य पण या विशिष्ट तुलनेसाठी कुत्र्यासारखा जिवाभावाचा उमदा मित्र प्राणी वापरायला नको असं वाटलं. अर्थात पूर्ण वैयक्तिक मत. लेखाचा कंटेंट समयोचित आणि आवश्यक विषयावरच आहे.

सतिश पाटील's picture

15 Nov 2018 - 11:10 am | सतिश पाटील

वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे
हे उपरोक्त वाक्य मी यासाठी वापरले कि, कुत्र्याला जेव्हा पिल्ले होतात आणि माणूस त्यांच्या जवळ जातो तेव्हा मुळातच कुत्रा हा माणसाला आपला मित्र समजत असल्याने कौतुकाने त्याची पिल्ले आपल्याला दाखवत शेपटी हलवत असतो, फारच क्वचित वेळा कुत्रा गुरगुरतो तेही तो माणूस जर अनोळखी असेल तर.
पण वाघ आपल्या पिलांची काळजी घेताना असे वर्तन करू शकत नाही, समोर माणूस असो कि आणखी कोणीही, तो हल्लाच करणार.
कुत्र्याला मारले तर चालते पण वाघाला नको असे मला म्हणायचे न्हवते.
चूभूदेघे .

माझा गैरसमज झाला. आता लक्षात आलं.

अवनीचे बछडे शोध घेउनही अद्याप सापडले नाहीत.

अवनीला बेशुद्ध केले असते, कींवा पिंजर्‍यात पकडले असते तर ती काय या बछड्यांचा पत्ता सांगणार होती काय? अवनीला जीवंत पकडुनही तीचे बछडे सापडले नसतेच ना? नरभक्षक वाघाबरोबर त्याचे बछडेही नरभक्षक होणार नाहीत काय? नरभक्षक वाघ कीतीही घनदाट जंगलात सोडला तरी बाहेर येउन माणसे मारणारच.

त्या वाघीणीला बेघुद्ध करायचे खुप प्रयत्न झाले होते असे ऐकले आहे. काही जनावरे अशा सापळ्यात फसत नाहीत. रात्रीच बाहेर फीरतात. (म्हणुनच बहुतेक अद्याप बछ्डे सापडले नाहीत). त्यांना मारातला रात्रीच जावे लागते. वनवीभागाचे कर्मचारी काही कसलेले शीकारी नसतात. तुमचा आमच्या सारखेच जीवाला जपणारे सरकारी नोकर असतात. सरकार त्यांना नरभक्षक प्राण्यांची शीकार करायला भाग पाडु शकत नाही. त्यासाठी शीकारीच बोलवायला लागतात.

इतक्या जवळ आलेल्या वाघाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचे मरण ओढाउन घेण्यासारखे आहे. आणी शीकारी ते चांगलेच जाणुन असतात. तेव्हा वाघाला गोळी कुणी मारली (शीकार्‍याने की त्याच्या मुलाने) यावरुन गोंधळ घालणे मुर्खपणाचे आहे. त्यांना वाघाला गोळीघालुन मारायची परवानगी मिळाली होती, त्यांनी ती कामगीरी बजावली.

जे लोक कधीही घनदाट जंगलात गेले नाहीत, (कर्नाळा, नॅशनल पार्क, आणी अभयारण्य नव्हे, खरे जंगल जीथे माणसाचा वावर जवळ जवळ शुन्य आहे असे)त्यांना या शीकारीतल्या अनेकवीध धोक्यांची कल्पनाही येणे शक्य नाही. कीतीही पुस्तके वाचुन तो अनुभव येणार नाही. नरभक्षक वाघ आसपस फीरत असताना शीकर्‍यांनी व वनविभागाने त्याच्या बछड्यांना शोधत फीरावे, त्यांना आधी पकडावे, मग वाघाला पकडावे कींवा मारावे अशी अपेक्षा
केवळ मुर्ख कींवा अज्ञानी माणुसच करु शकतो.

जे अवनीसाठी ईथे गळा काढत आहेत, कींवा मेणबती मोर्चे काढत आहेत, त्यांना एवद्गेच सांगणे की तुम्हाला वाघांचा खरच कळवळा व अंगात हींम्मत असेल तर त्या जंगलात जाउन अवनीच्या बछड्यांचा शोध घ्या. अन्याथा ज्यांनी आपल्या जीवावर खेळुन गावकर्‍यांना सुरक्षीत केले त्यांचे आभार मानुन गप्प बसा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2018 - 9:26 am | अनिरुद्ध.वैद्य

तुम्ही सरकारी परमीशन काढुन द्या.

सगळंच ऐकीव माहितीवर विसंबुन फुकटचे सल्ले देत सुटतात सगळे आजकाल.

नेत्रेश's picture

15 Nov 2018 - 10:37 am | नेत्रेश

परमशीनची गरज नाही, अवनी फीरत असले ले क्षेत्रसंरक्षीत नाही आहे. उद्याच जा.

सतिश पाटील's picture

15 Nov 2018 - 11:20 am | सतिश पाटील

नेत्रेश भाऊ , सरकारी परवानगीची जर गरज नाही तर तुम्हीही चला ना सोबत, आम्ही बछडे शोधतो आणि तुम्ही मेलेल्या लोकांचे सांत्वन करा, किंवा १३ लोक मेले तेव्हा तुम्ही त्यांना वाचवायला का नाही गेलात हे हि सांगा, उगाच अवसान आणू नका कसं?
जमलेच तर १३ लोक कसे मेले याचा शोध तुम्ही घ्या , आणि अवनीला मारणे याची खरंच गरज होती का याच्या शोध आम्ही घेतो. येताय का?

नेत्रेश's picture

15 Nov 2018 - 12:36 pm | नेत्रेश

१३ लोक वाघीणीने मारले, शीकार्‍यांनी वाघीणीला मारले, मी तीथे जाउन काय करणार?

ज्या लोकांना आंतरजालावर बसुन, नरभक्षक वाघीणीची हत्या न करता जीवंत पकडायला हवे होते, व बछड्यांना आधी पकडायला पाहीजे होते असे वाटले, त्यानी जरा बछड्यांना शोधायला जाउन तीथल्या परीस्तितीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2018 - 2:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

बर झालं सांगितलत! बाय द वे बछडे सापडलेत अन सुखरुप आहेत.
काळजी बद्दल धन्यवाद.

श्वेता२४'s picture

15 Nov 2018 - 7:52 am | श्वेता२४

एकदम सहमत

सुबोध खरे's picture

15 Nov 2018 - 10:05 am | सुबोध खरे

कोणत्याही वादात न पडता आणि मानवी आयुष्य हे प्राण्याच्या आयुष्यापेक्षा अनमोल आहे हे तत्व मान्य करून मी काही मुद्दे मांडतो आहे.
वाघ हा अन्न साखळीतील( भक्ष्य आणि भक्षक) सर्वात वरचा दुवा आहे. ( वाघ हा कुणाचे अन्न/ भक्ष्य नाही).
अन्न साखळीतील एक दुवा निखळला तर संपूर्ण अन्न साखळी अस्ताव्यस्त होते हि वस्तुस्थिती.
इथे वाघ शिकार करतो तेंव्हा तो तृणभक्षी प्राण्यांपैकी सर्वात अशक्त किंवा रोगी प्राण्यांना आणि लहान बछड्याना सर्व प्रथम नाहीसे करतो. त्यामुळे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहते. अन्यथा यातील रोगी प्राण्यांमुळे तुमच्या गाईगुरांना रोग होण्याचा मोठा धोका असतो.

तृणभक्षी प्राणि अति झाले कि जंगलाच्या बाहेर येऊन तुमच्या शेतीचे नुकसान करतात. राजस्थान गुजरात आणि मध्यप्रदेश या भागात जेथे वाघ (किंवा सिंह) नाहीत तेथे नीलगाय ( हि एक हरणाची जात आहे) या प्राण्याने शेतीवर उच्छाद मांडला आहे. गाय नाव असल्याने लोक तिला(/ त्याला) मारत नाहीत आणि नैसर्गिक भक्षक नसल्यामुळे त्यांची संख्या अफाट वाढली आहे आणि त्यामुळे शेतीचे जबर नुकसान होत आहे. बिबळे एवढ्या मोठ्या प्राण्याला मारू शकत नाहीत.

गीर अभयारण्याच्या आसपासच्या भागात नीलगायींचाच काय पण हरिणांचा शेतीला त्रास बराच कमी आहे आणि तेथे सिंह माणसांच्या मदतीने (होय हे सत्य आहे) हरिणांची शिकार करतात याची एक आश्चर्यकारक फिल्म ऍनिमल प्लॅनेटवर दाखवली गेली होती.

असे तृणभक्षी प्राणी अफाट वाढले तर ते जंगलात असलेले कोणतेही खाद्य भुकेपोटी खातात. त्यामुळे हरिणासारखे प्राणी झाडाच्या साली सुद्धा खाऊ लागतात ज्यामुळे मोठे वृक्ष सुद्धा नष्ट होऊ लागतात आणि याने जंगलाची अपरिमित हानी होते. वृक्षाचे बीज, लहान रोपटी खाल्ली गेल्यामुळे जंगलाचा ऱ्हास होऊ लागतो आणि वाळलेले वृक्ष माणसे सरपणासाठी तोडू लागतात. वृक्ष नष्ट झाले कि जमिनीची धूप होऊन तेथे पूर येणे सारखे प्रकार होतात किंवा जमिनीची ओलावा धरण्याची क्षमता कमी होऊन जमीन उजाड होऊ लागते आणि अशी अख्खी पर्यावरण सृष्टी (ecosystem) नष्ट होऊ लागते.

जेथे वाघ नाहीत तेथे माणसांनी सुद्धा जंगलाची अपरिमित हानी केली आहे कारण जंगलात केंव्हाही जाऊन निर्भयपणे काहीही घेऊन जावे. शिवाय जंगलाच्या बाजूने शेती करण्यास सुरुवात होते आणि जंगल आक्रसत जाते.

विस्तारभयामुळे मी येथेच थांबतो.

परंतु वाघ मेले तर काय बिघडते माणसाचे पोट भरले पाहिजे असे (गैर)समज असलेले असंख्य लोक आहेत.

जंगलाच्या जवळ राहणाऱ्या माणसाला दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला तर माणूस जंगलाचा आणि पर्यावरणाचा नाश करणार नाही. हे काम सरकारचे आहे यात वादच नाही.

सध्या वाघ कि माणूस हा विषय ऐरणीवर आला आहे त्यासाठी कोणतीही बाजू न घेता किंवा भावनेच्या आहारी न जाता वस्तुस्थिती मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न --/\--.

यशोधरा's picture

15 Nov 2018 - 10:27 am | यशोधरा

प्रतिसाद आवडला.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2018 - 10:35 am | मार्मिक गोडसे

योग्य शब्दात छान प्रतिसाद.

विशुमित's picture

15 Nov 2018 - 1:17 pm | विशुमित

Ecosystem खुप सोप्या शब्दात मांडलीत.

उत्तम संतुलित प्रतिसाद डॉक्टर.

प्रमोद देर्देकर's picture

15 Nov 2018 - 1:46 pm | प्रमोद देर्देकर

वा डॉक मस्त प्रतिसाद . सौ सोनार की तो एक लोहार की .

आता हा धागा वामा करा म्हणावं सं. मंडळाने.

समीरसूर's picture

15 Nov 2018 - 2:08 pm | समीरसूर

अवनीला का ठार मारले, तिला वाचवता आले असते का, माणसाचा जीव महत्वाचा की वाघाचा...बरेच प्रश्न आहेत. मला या घटनेची पूर्ण माहिती नसल्याने त्यावर मला सध्या तरी मत नाही. मुळात ही चर्चा (की हमरीतुमरी?) इथे करून काय होणार आहे मला खरंच कळत नाही पण काही प्रतिसाद बघता एक गोष्ट जाणवते, आपण आपल्या प्रतिसादांमध्ये लगेच हमरीतुमरीवर येतो आणि उद्धट वाटावेत असे प्रतिसाद टाकतो. आपण "तुला काय कळतंय? आलाय मोठा! कवडीची अक्कल नाही आणि चालला इतरांना शिकवायला!" असा छुपा सूर असलेले, वैयक्तिक उणीदुणी काढणारे, समोरच्याची लगेच लायकी काढणारे, भलताच मुद्दा पकडून मूळ मुद्द्यापासून कुठल्याकुठे भरकटत जाणारे आणि त्यावरून समोरच्याची अकारण अक्कल काढणारे असे प्रतिसाद टाकून चर्चेला भांडणाचे रूप देत आहोत का हे तपासून बघायला पाहिजे. वाघाचा मृत्यू किंवा अजून कुठलीही चर्चा असो, वैयक्तिक दुश्मनी करावी असे काही हे विषय नाहीत. किंबहुना कुठल्याच चर्चा तशा नाहीत/नसाव्यात. आपल्या इथल्या कडाक्याच्या भांडणाने हे प्रश्न सुटणारदेखील नाहीयेत. मग अकारण दुसर्‍या व्यक्तीला मूर्खात काढून आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे अपमानास्पदरीत्या दाखवून देण्याने काय साध्य होत असावे? ते ही अशा विषयांवर ज्याच्याशी आपला थेट संबंध येण्याची सुतराम शक्यता नाही किंवा ज्यांवर आपल्या इथल्या भांडणाचा कणभरदेखील परिणाम होणार नाही! बरे, अशा विषयांतली आपल्याला संपूर्ण माहिती असते का? बहुधा नाही. अशा घटनांमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग असतो का? अजिबात नाही. मग इथे ज्यांच्याशी आपण इतकी वर्षे संवाद साधतो त्यांच्याशी अशा विषयांवरून वितुष्ट करण्याने काय समाधान मिळत असेल?

सहज आठवले. परवा कॅबने कुठूनतरी घरी येत होतो. पौड रस्त्यावर मेट्रोचे काम चालू असल्याने वाहतूकीचे प्रश्न आहेत. एक दुसरी कॅब डाव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. काही कारणामुळे त्याला पुढे जायला अर्ध्या मिनिटाचा उशीर झाला. कारण काय होते माहित नाही. तो जसा पुढे गेला, त्याने खिडकीतून मान बाहेर काढून माझ्या कॅबच्या दिशेने बघत कचकचीत शिवी दिली.

"का रे ****द, दिसत नाही का **व्या?"

आमचा कॅबचालकदेखील मुरलेला होता.

"ये ***द! तुला दिसत नाही का पुढे गाडी आहे ते, ***ल्या?"

पुढे जाणार्‍या कॅबला किती उशीर झाला? अर्धा मिनिट! पण संवादाची पातळी बघा, दर्जा बघा!

हा संवाद असाच व्हायला पाहिजे का? इतका मोठा प्रॉब्लेम खरंच होता का? पण भारतीय लोकांची ही मानसिकताच आहे. कुणाला म्हणून आपणहून रिस्पेक्ट दिला तर आपली रेषा, आपली वट, आपला जोर कमी पडेल...आणि ते तर अजिबात नकोय! कालपरवाच्या इकॉनॉमिक टाईम्समध्ये नारायण मूर्तींचा सुंदर इंटरव्ह्यू आला आहे. त्यांनी आपल्या या मानसिकतेवर अचूक बोट ठेवले आहे.

https://economictimes.indiatimes.com/markets/expert-view/one-cant-hold-m...

असो. विषयाला धरून नाहीये पण सांगावसं वाटलं म्हणून सांगीतलं. चुकलं असल्यास माफ करा आणि सोडून द्या. (आधीच माफी मागीतलेली बरी!)

इरसाल's picture

15 Nov 2018 - 2:14 pm | इरसाल

तुम्ही तेलाचा तवंग आलेल्या तर्रीवर ताक ओतताय.
कृ. ह. घेणे!

समीरसूर's picture

15 Nov 2018 - 2:21 pm | समीरसूर

ताक चालेल...मिरचीपूड नको! ;-) नाहीतर आधीच जहाल, मिरचीपूड टाकली तर मग कानातून धूर!

हा इफेक्ट सर्व ऑनलाईन न्यूजपेपर्सच्या बातम्यांखाली प्रतिसादांतून उफाळताना दिसतो. लोक सुरुवातीपासूनच थेट आयमाय काढणे, घोडा लावणे, कोणाची माता कोणासोबत आणि एकूणच एकमेकांवर थेट व्यक्तिगत अत्यंत तीव्र हल्ले करतात. हे जवळजवळ सर्वत्र आहे. परस्परांना, बातमीदाराला, संपादकाला, नेत्यांना, लेखकांना सर्वांना लाखोली वाहिली जाते आणि त्यात सर्वात तीव्र कटुता दाखवण्याची स्पर्धा असते. याहून डिटेल उदाहरणं देणं इथे शक्य नाही पण कोणालाही सहज वाचता येईल ऑनलाईन वृत्तपत्रांत. वाचलंच असेल.

कदाचित याच कारणाने लोकसत्ताच्या कॉमेंटस अचानक दिसेनाश्या झाल्या आहेत.

अमोनिमस होणे याचा पहिला इफेक्ट म्हणजे मनातलं साठलेलं जहर बाहेर टाकणे इतकंच असतं का? त्याचं प्रमाण भयंकर मोठं आहे आणि अस्वस्थ करणारं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक खदखदत आहेत.

फार काही करता येणार नसलं तरी यावर एक वेगळ्या धाग्यात चर्चा व्हावी.

समीरसूर's picture

15 Nov 2018 - 5:12 pm | समीरसूर

न्यूजपेपर्समध्ये समजू शकतो; तिथे कुठलाच विधिनिषेध नसतो. सगळ्या जगातली शंभर वेगवेगळ्या भाषा बोलणारी, अनोळखी, निरनिराळ्या संस्कृतीची, पार्श्वभूमीची लोकं वावरत असतात. तिथं बातम्या कधी-कधी संताप आणणार्‍या असतात. मिपासारख्या संस्थळावर फक्त मराठी, काहीशी चांगली पार्श्वभूमी असलेली, वाचन-कला यांचा आस्वाद घेणारी/घेऊ शकणारी, जग फिरून पाहिलेली अशी सुज्ञ मंडळी असताना असे व्हावे हे जरा विचित्र वाटते. बरीचशी मिपाकर मंडळी एकमेकांना वैयक्तिकरीत्या ओळखतातदेखील, अगदी मित्र म्हणावेत अशी! शिवाय कट्टे होतात; एकत्र खाणं-पिणं होतं. अशा एका संस्थळावर असे होत असेल तर ते थोडं खटकतं.

अमोनिमस होणे याचा पहिला इफेक्ट म्हणजे मनातलं साठलेलं जहर बाहेर टाकणे इतकंच असतं का? त्याचं प्रमाण भयंकर मोठं आहे आणि अस्वस्थ करणारं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक खदखदत आहेत.

मला नेमका हाच प्रश्न पडतो, कसलं आहे हे जहर? लोकं इतकी का खदखदत आहेत? असं काय महाभयंकर घडलेलं आहे यांच्या आयुष्यात? छान एसी खोलीत भरल्या पोटी बसून कुठली खदखद बाहेर निघते आहे? ज्यांच्या मनात जहर किंवा खदखद असायला हवी किंवा असेल ते तर बिचारे ऑनलाईनपासून कितीतरी दूर आहेत. मग हे विनाकरण अहंगंड कुरवाळत इतरांना फालतू म्हणून हिणवणारे नक्की कोण आहेत आणि हे सगळं ते का करतायेत? मला वाटतं हा प्रश्न आपल्या मानसिकतेत दडलेला आहे. आपल्याकडे जो तो स्वतःला बादशाह समजतो...एनीवे...फार काही करता येणार नाही हे मात्र खरं!

प्रमोद देर्देकर's picture

15 Nov 2018 - 6:37 pm | प्रमोद देर्देकर

तुम्ही या बचड्यानची चिंता सोडा ते सापडलेत.
पण वाघांची संक्रांत काही सुटत नाहीये अजून.
आजच चंद्रपूर येथे 3 बचड्याचा रेल्वे ओलांडताना चिरडून म्रुत्यु. वाघीण जिवंत आहे तिचा शोधत चालू आहे .

संजय पाटिल's picture

15 Nov 2018 - 8:50 pm | संजय पाटिल

अरेरे =:(
आता यावरून रेल्वेच्या ड्रयव्हरची नोकरी गेलीच...
संदर्भ.. पंजाब मधल्या रावण दहणाचे प्रकरण...

अवनीसंदर्भात ही काही माहिती. मला सत्यासत्यता ठाऊक नाही.

Revealing FACTS ON AVNI's CASE:

The alleged killings in Pandharkawada Division in Pandharkawada started in June 2016. This was right in between the announcement of the cement factory sale by the Ambanis and actual purchase by MP Birla group in August 2016.

1. Feb 2016: Announcement of acquisition of Cement Company from Ambanis -- https://www.birlacorporation.com/media/press-releases/press_release_4feb...

2. August 22, 2016: Purchase completed -- https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/cement/birl...

3. August 2017: Announcement of expansion plans for Yavatmal plant in the forest -- https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/birla-corp-to-invest-in-...

* Half decomposed mutilated human bodies, deep inside the forest started being declared by the Forest Department as killings by T-1. No DNA analysis was done to prove TIGER attack.

* Compensation of 8 lakhs given to victims’ families without any consideration of the fact that they were illegally inside the forests. No forest rights allows grazing to be done INSIDE forests or Forest Development Corporation of Maharashtra (FDCM).

* Locals can’t use the forest for grazing as they have not been given any rights under CFR or PESA. It is indeed illegal to graze inside the forests and the FD is making up excuses for their lack of capability and their incompetence by saying the locals taking cattle inside the forests are not truly illegal graziers.

4. January 22, 2018: Notification of forest land diversion --https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/465-hectares-forest-lan...

* Within 7 days of the notification of forest land’s official diversion to the Ambanis, on 22 January 2018, the first shoot to kill order for the Tigress was issued by the PCCF on 29th January 2018.

* Eye-witnesses were illegally taking their cattle into the forest’s waterbody where the new mother -- Tigress and her cubs lived.

* The post-mortem report does not even mention time of death. No clarity if the injuries were ante-mortem and it was a decapitated body of an illegal grazier.

* The PCCF hastily called Shafat Ali Khan the very day to shoot the Tigress and was officially reprimanded for this.

* No DNA analysis was done to ascertain if there was Tigress DNA on the body either before the shoot-to-kill order was issued by the PCCF.

Now, the sanitizing of the Forest for the expansion plans of the cement factory also meant that the PCCF hastily issued the capture order for the MALE Tiger, T-2.

5. August 8, 2018: Announcement of expansion and new mega cement plant for another 2000+ crores -- https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/cement/birl...

Birla Cement Board meeting held on Saturday, August 4, 2018, announces expansion plan for Yavatmal plant located in Mukutban, Pandharkawada Forest. Doubling of capacity, creation of captive thermal plant, and a heat-recovery plant.

On the same day, after a long gap of 6+ months, a Forest Dept. 'Field Monitoring Team' allegedly spots the tigress and cubs (one of the ONLY actual sightings), and later that same day, in the evening, a human kill is reported.

सतिश पाटील's picture

22 Nov 2018 - 11:32 am | सतिश पाटील

खूप महत्वाची माहिती दिलीत, वन आणि वन्य प्राण्यांबद्दल आपले शासन आणि नागरिक किती गंभीर आहेत हे या विषयावर दिसले.

सतिश पाटील's picture

7 Dec 2018 - 11:40 am | सतिश पाटील

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीने दिलेला हा अहवाल.

एक वाघ काय मारला तर असे अश्रू ढाळत आहेत जणू यांच्याच घरातला कोणी मेला, किंवा मारल्या गेलेल्या लोकांच्या घरातले दुःखचे तुम्हाला काही पडले नाही का? मारू दे कि वाघ ...

असे बोलणारे आता हा अहवाल वाचून काय स्पष्टीकरण देतील वाघाचा खून केल्याचे?