राया उशीर का जाहला...

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
9 Nov 2018 - 6:41 pm

रात सरली पहाट झाली झुंझुरल्या सार्‍या दिशा
झोप नाही ,जीव झाला सखया वेडापिसा
वाट पहाते तुमची राया, उशीर का जाहला
सख्या सांगा उशीर का जाहला
.......
काल दुपारी राघू आला निरोप तो घेउनी
मी मैना हरखून गेले सांगावा ऐकुनी
ऐकुन माझे रूप खुलले, चमचम जणू चांदणी
दिवा ठेवते दो नयनांचा तुमच्या वाटंला
राया उशीर का जाहला.....
......
विडा केशरी सायंकाळी , काया माझी कातकेवडा
मिठीत घेता विरघळले मी, ओठ साखर खडा.
खयाल येता किणकीण वाजे, हाती हिरवा चुडा
हुरहूर का ही मनी दाटली , जीव पिसा जाहला.... सांगा राया उशीर का जाहला....
........
रात्र सजणा अंधारी ही, काटा फुलतो अंगावरती.
मिठीत गंधीत चांदणं ल्याले , रातराणी बघ मी झाले.
गालावरती गुलाब फुलले, लाजलाजून चूर झाले
स्वप्न पाहून जीव शिणला, राया उशीर का जाहला.
................................ चकोर शाह.

miss you!संस्कृती