ट्रेंडी फॅशन आणि किमती

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Nov 2018 - 8:48 pm
गाभा: 

कपड्यांच्या ट्रेंडी फॅशनचे खूप सुरेख नाविन्यपूर्ण ऑप्शन्स उपलब्ध होत आहेत. अर्थात दुसर्‍या बाजूस गेल्या दहा वर्षापासूनच तसा किमतींचाही आलेख चढता आहे. सणासुदीला ट्रेंडी फॅशनचे कपडे घेतले जाणे सहाजिक आहे त्याच वेळी चार माणसांच्या कुटूंबांची कपड्यांची खरेदी सेव्हिंग्सना बर्‍या पैकी कात्री लावते आहे.

ट्रेंडी फॅशनही व्हावी सणही साजरा व्हावा आणि सेव्हींग्सना लागणरा जोर का झटका धीरेसे लागावा म्हणून काही सुचवण्या सारखे आहे का ? तुम्ही ट्रेंडी फॅशन च्या वाढत्या किमतींना कसे फेस करता आहात? ह्या वेळची खरेदी तर झाली पण चर्चेतून काही चांगल्या सुचवण्या आल्यास पुढे वापरता येतील.

चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

4 Nov 2018 - 9:22 pm | उगा काहितरीच

यावेळची खरेदी : औंध भागातील एका नामांकीत (Branded) दुकानातून कुर्ते घेत होतो. किंमत थोडी जास्त वाटत होती पण २-४ दुकाने पाहून आलेलो होतो व तेथील कुर्ते आवडले होते. एक कर्मचारी जवळ आली व हळूच म्हणाली , कर्मचाऱ्यांना ३०% सवलत आहे बिलींग करताना सांगा . खरेदी झाल्यावर तिला बोलावलं तिने तिचा नंबर , OTP वगैरे टाकला व आम्हाला MRP वर ३०% सवलत मिळाली. ;-) (कदाचित कर्मचाऱ्यांशी चांगलं बोलण्याचा , ट्राय केलेले कपडे व्यवस्थित ठेवण्याचा परिणाम )

पाषाणभेद's picture

5 Nov 2018 - 10:32 pm | पाषाणभेद

तसे करुन गंडवले असे तर नाही?

Pvdpune's picture

5 Nov 2018 - 4:54 pm | Pvdpune

मोठ्या रिटेल दुकानांमध्ये जी किंमत आपण पाहतो, त्यामध्ये जवळपास 30% ते 65% margin असू शकते. ज्या स्टाफने तुम्हाला स्टाफ डिस्काउंट देऊ केले, ते कदाचित त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी असू शकते.
बऱ्याच कंपन्या सणासुदी दरम्यान टार्गेट्स वाढवून देतात, परंतु तीव्र स्पर्धेमुळे स्टाफ हा मार्ग वापरतात.