सुषुम्ना अनन्त्_यात्री · मंगळवार, 06/11/2018 - 00:00 दिवाळी अंक सुषुम्ना स्क्रीनवर उमटणारे तुझे शब्द थुई-थुई पिसारू लागताच भानावर ये. भगभगत्या भवतालाचा घसाजाळ आवंढा गीळ नेटाने टंकत जा पुढे मग दोन रस्ते हाकारू लागतील पहिला : कातीव-वळणदार-निवांत सावल्यांचा-टाळ्या-जयजयकारांचा-सुबक (दोन्ही बाजूंना वायफळाचे मळे) दुसरा : सरळसोट-उघडा-बोडका-डोकं वितळवणाऱ्या उन्हाचा (दुर्बोधाच्या खाईत चिरंतन मुक्काम) भरकटू नकोस ह्या इडा-पिंगला रस्त्यांवर परज पहार सर्जनाच्या उत्फुल्ल-अधीर-अदम्य-अतृप्तीची भीड वास्तवाच्या कभिन्न पथ्थराला तसू तसू बनव तुझी पायवाट तुझ्या अस्तित्वाच्या मूलाधारापासून श्रेयसाच्या सहस्रारापर्यंत तुला तेजाळत नेणारी वर्गीकरण दिवाळी अंक वर्ष दिवाळी अंक २०१८ 7 टिप्पण्या 10,543 दृश्ये Comments तुषार काळभोर · 06/11/2018 - 20:16 नवीन ह्या वाटेनं डोक्याला बायपास केलं पण काहीतरी भारी वाचतोय असं वाटत होतं. यशोधरा · 07/11/2018 - 08:54 नवीन वेगळीच. वेगळीच. कविता सुचण्याच्या, स्फुरण्याच्या जाणिवेबद्दल आहे का हे? प्राची अश्विनी · 07/11/2018 - 09:19 नवीन Robert Frost हूनही वेगळा Robert Frost हूनही वेगळा रस्ता.. आवडला.. अनन्त्_यात्री · 07/11/2018 - 16:58 नवीन In reply to Robert Frost हूनही वेगळा by प्राची अश्विनी Yes, "And that has made all the difference!" प्रतिसादाबद्दल धन्यवाद! टर्मीनेटर · 07/11/2018 - 17:58 नवीन काहीच कळल नाही... काहीच कळल नाही... हा दोष माझाच आहे, शब्द वाचून सरळ काही अर्थबोध होत नसेल तर मी तो समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, उगाच शब्दांमागे दडलेले अर्थ शोधणे नाही जमत. त्यामुळेच कदाचित काव्य हा प्रकार आवडत नसावा मला. मुक्त विहारि · 07/11/2018 - 22:01 नवीन काही समजले नाही... काही समजले नाही... सौन्दर्य · 09/11/2018 - 08:39 नवीन काव्य समजलं नाही. कित्येक वेळा शब्दार्थ कळतात पण भावार्थ समजायला थोडं कठीणच जातं.
तुषार काळभोर · 06/11/2018 - 20:16 नवीन ह्या वाटेनं डोक्याला बायपास केलं पण काहीतरी भारी वाचतोय असं वाटत होतं.
यशोधरा · 07/11/2018 - 08:54 नवीन वेगळीच. वेगळीच. कविता सुचण्याच्या, स्फुरण्याच्या जाणिवेबद्दल आहे का हे?
प्राची अश्विनी · 07/11/2018 - 09:19 नवीन Robert Frost हूनही वेगळा Robert Frost हूनही वेगळा रस्ता.. आवडला..
अनन्त्_यात्री · 07/11/2018 - 16:58 नवीन In reply to Robert Frost हूनही वेगळा by प्राची अश्विनी Yes, "And that has made all the difference!" प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
टर्मीनेटर · 07/11/2018 - 17:58 नवीन काहीच कळल नाही... काहीच कळल नाही... हा दोष माझाच आहे, शब्द वाचून सरळ काही अर्थबोध होत नसेल तर मी तो समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, उगाच शब्दांमागे दडलेले अर्थ शोधणे नाही जमत. त्यामुळेच कदाचित काव्य हा प्रकार आवडत नसावा मला.
सौन्दर्य · 09/11/2018 - 08:39 नवीन काव्य समजलं नाही. कित्येक वेळा शब्दार्थ कळतात पण भावार्थ समजायला थोडं कठीणच जातं.
ह्या वाटेनं डोक्याला बायपास केलं
वेगळीच.
Robert Frost हूनही वेगळा
In reply to Robert Frost हूनही वेगळा by प्राची अश्विनी
Yes,
काहीच कळल नाही...
काही समजले नाही...
काव्य समजलं नाही.