दिव्यांग विद्यार्थ्यांच्या करिअर साठी

Akshay jagtap's picture
Akshay jagtap in काथ्याकूट
28 Sep 2018 - 2:03 pm
गाभा: 

दिव्यांग विद्यार्थीनां नोकरी साठी मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण साठी पुण्यात अशी एखादी संस्था आहे कां? कृपया जाणकार मिपाकरांनी माहिती द्यावी .

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

29 Sep 2018 - 1:07 pm | चौकटराजा

गोखले नगर परिसरात पत्रकार नगराजवळ कामायनी नावाची सन्स्था आहे. दिव्यांग म्हणजे नक्की काय ? त्याचे अनेक प्रकार आहेत. पण प्राथमिक चौकशी साठी वरील संस्थेत अवश्य जावे. आन्तरजालावर देखील शोध घ्यावा. पुण्यात अनेक संस्था आहेत या क्षेत्रात काम करणार्या. दोनानाथ मन्गेशकर रूग्णालयात श्री सुभाष चुत्तर नावाचे ग्रुहस्थ कौन्सिलिन्ग साठी कधी येतात याची चौकशी करून त्यान्ची भेट घ्या.त्यानी या बाबतीत भरीव कार्य केले आहे. माझी मुलगी हे असे करियर केल्याचे एक उदाहरण आहे.

Akshay jagtap's picture

30 Sep 2018 - 9:34 am | Akshay jagtap

धन्यवाद चौकटराजा आपण दिलेली माहिती माझ्यासाठी महत्त्वाची आहे . तुमच्या मुलीला माझ्याकडून शुभेच्छा!

विटेकर's picture

1 Oct 2018 - 10:40 pm | विटेकर

वानवडी येथे अपंग कल्याणकारी संस्था काही संघ स्वयंसेवक चालवतात. संस्था खूप जुनी सरकारमान्य आहे, लोकमान्य आहे. तिथल्या प्रमुखांशी वैयक्तिक संपर्क आहे, काही गरज लागली तर नि: संकोचपणे सांगावे!

विटेकर's picture

1 Oct 2018 - 10:40 pm | विटेकर

वानवडी येथे अपंग कल्याणकारी संस्था काही संघ स्वयंसेवक चालवतात. संस्था खूप जुनी सरकारमान्य आहे, लोकमान्य आहे. तिथल्या प्रमुखांशी वैयक्तिक संपर्क आहे, काही गरज लागली तर नि: संकोचपणे सांगावे!

धन्यवाद ! विटेकर जी गरज लागल्यावर मी नक्की संपर्क करेल. मिपाकर अगदी घरातील सदस्यांसारखे आहेत .