ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली.
पण आता त्याही पूढे जाऊन ड्रुपलमध्ये नुसतेच मराठी लिहिण्याची सोय नसून ड्रुपल स्वत:च मराठीत बोलू लागला आहे.
तांत्रिक बिघाडामूळे तो जे प्रतिसाद उडवतो त्यावर ड्रुपल आता,
' पंचायतीवरील सदस्यांकडे काही सदस्यांनी व्य नि पाठवून तक्रार केल्यामुळे पंचायतीने आपल्या अधिकारांचा वापर करत येथील काही लेखन आणि त्याला आलेले संबंधित प्रतिसाद उडवले आहेत!'
कळावे,
(लोकनियुक्त) मिसळपाव पंचायत समिती
अशी सही देखिल ठोकून देतो. आणि विनातक्रार ड्रुपलच्या ह्या चावटपणावर कितितरी लोकांचा विश्वास देखिल ठेवला जातो. ह्या ड्रुपलवर कुणाचेही कसलेही नियंत्रण चालत नाही. त्याच्या वर कुणीही कसलीही शंका घेतली असता सेकंदात पन्नास आयडी तयार करुन ड्रुपल सदर सदस्याला नामोहरम करतो.
तुम्हाला काय वाटते ड्रुपलचा हा खोटारडेपणा पकडता येणे शक्य आहे का?
ह्या ड्रुपलवर काय इलाज करता येईल ह्याची कुणाला कल्पना आहे का?
मराठी संकेतस्थळांच्या जडणघडणीमध्ये ड्रुपलचा वाटा असामान्य आहे म्हणून आम्ही हा चर्चा प्रस्ताव मांडत आहोत.
वाचने
5856
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुष्टी
मिसळपावाच
नक्की
In reply to मिसळपावाच by आजानुकर्ण
मं?
In reply to नक्की by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तेच विचारा की !
In reply to मं? by आजानुकर्ण
नरेंद्र दाभोळकरांचे च्यालेंज
In reply to तेच विचारा की ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आक्षेप