जळगाव_सांगली_निवडणूक.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
3 Aug 2018 - 6:24 pm
गाभा: 

जळगाव_सांगली_निवडणूक.
आत गोटात शिरून छावण्या उध्वस्त करत ताब्यात घेणे सोपे नसते
अभिनंदन त्या नेत्याचे जे रण नीती आखतात व कार्यकर्ते जे शिस्तबद्ध
व निस्वार्थी पणे मन लावून काम करतात
केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र
देश व राज्य सुरक्षित हाती

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

3 Aug 2018 - 7:39 pm | प्रसाद_१९८२

+100

सतिश पाटील's picture

3 Aug 2018 - 10:23 pm | सतिश पाटील

परत एक राजकीय जिलेबी
फेसबुकवर लिहायचा होता

खुश आमदीद !

* बालभारती मराठीत (इयत्ता आठवत नाही) एक कथा होती, ज्यातला राजा, सर्व प्रजेला सर्व संभाषण गाण्याच्या रुपातच झाले पाहीजे असे सांगतो. राजा बोले प्रजा गावयास लागते, हे तो पर्यंत चालते जो पर्यंत राजवाड्याला आग लागल्याची बातमी सैनिक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगत नाही :)

* इथे राजा एवजी विशीष्ट चष्म्यांची जनताच (अंध)श्रद्ध होऊन धार्मिक आणि राजकीय धाग्यांमुळे ललित लेखन कमी होते असा जावई शोध लावून, राजकीय चर्चाकारांच्या मागे हात धुवून लागली आहे.

* २० व्या शतकात महाराष्ट्रात जेव्हा सर्वाधीक ललित लेखन झाले तेव्हा ....

** इतर सगळ्यांसोबत ललित लेखक लेखिकांची सकाळही त्याच्या त्याच्या धर्मातील कवने कानावर पडून होत असे.

** वृत्तपत्र विक्रेते भल्या पहाटे राजकीय बातम्यांच्या हेडलाईन ओरडत गल्ली बोळातून फिरत, मोठ्या शहरात संध्याकाळचे वृत्तपत्र विक्रेतेही हेच करत तर लहान सहान गावात वृत्तपत्र वाचनाचे आणि रेडिओ वरील बातम्या ऐकण्याचे सामुहिक कार्यक्रम नित्याचे असत.

** स्वातंत्र्य लढ्याच्या काळात राजकीय अर्थ अभिप्रेत असलेले मेळे, तर स्वातंत्र्योत्तर काळात 'अंधेरेमे एक प्रकाश जय प्रकाश जय प्रकाश' सारख्या घोषणा बाजी गल्ली गल्लीतून होत असे, आणि प्रत्येक गल्ली प्रत्येक रस्त्यातील किमान ३० ते ४० % भिंतीं राजकीय घोषणाबाजी आणि पोस्टरांनी रंगलेल्या असत

** खूप मोठी प्रतिभा नसलेले साहित्य आणि काव्य तेव्हाही प्रसवले जात होते

** माझ्या परिचयातील एक प्राध्यापक लेखक प्राचार्य होते आणि आता सारखे व्यक्ति स्वातंत्र्य रुळलेले नसल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थीनींची अशुद्धलेखन आणि सुमार प्रेमकाव्ये असलेली प्रेमपत्रे प्राचार्यांपर्यंत पोहोचत पण त्यांनी त्यांची लेखन प्रेरणा त्यामुळे मेली असे म्हटल्याचे आठवत नाही (खाजगीत म्हणाले असल्यास ठाऊक नाही ;)

आणि तसेच या सर्वामुळे माझी लेखन प्रेरणा मेली असे म्हणालेला एकही मोठा मराठी साहित्यिक मला माहित नाही. असल्यास संदर्भ द्यावा घरच्या घरी दहा उठबशा काढतो. (त्या काळात चुकांची मुख्य शिक्षा उठबशांची असे!)

* आजच्याही काळातही मिपा न वाचणार्‍यांच्याही डोळे आणि कानावर व्हॉट्स अ‍ॅप ते टिव्ही राजकीय ठोठो सगळ्यांच्या भडिमार होतच असणार, सुमार टिव्ही सिरीयल आणि कार्यक्रम कुटूंबातील इतर सदस्यांसाठी पहावेच लागत असणार पण तरीही सध्याच्याही मिपा बाह्य सुपरिचित ललित साहित्यिकांकडून या सर्वामुळे आमच्या लेखन प्रेरणा मेल्या तुमच्या जिलेब्या बंद करा असा एकही सार्वजनिक उपोषणाचा कार्यक्रम टेलिव्हिजन केंद्रांसमोर पहाण्यात नाही. त्यांचे त्यांचे लेखन व्यवस्थित चालू असते.

* मिपावरील विशीष्ट चष्म्याच्या पुरोगामी मंडळींना, मिपावरील राजकीय धाग्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ होत असल्याचे भास होतात की काय म्हणून विरोधी बाजूची राजकीय भूमिका दिसली कि सेंसॉरशीपच्या मागण्या मिपा मालकांकडे करायच्या सेंसॉरशीप करुन मिळली नाही की करणी सेना चित्रपटगृहांच्या मागे धावून चित्रपटपाडण्यासाठी जे उद्योग करेल अगदी त्याचेच वेगळे स्वरुप धागा विषयावर चर्चा न करता ट्रोलींग करुन दाखवते . मिपा पुरोगामी करणीसेनेचा ! विजय असो !!
:))

* एखाद्या राजकीय क्षेत्रात पुरोगामी शक्तींची पिछेहाट का झाली परंपरावाद्यांच्या पारड्यात मते का पडली याची चिकित्सा आपल्याला भविष्यातील निवडणूकात उपयोगी पडावयास हवी म्हणून चर्चेचा आग्रह होण्या एवजी दोन युद्धरत देश जसे आपापल्या सैनिकांची पिच्छेहाट स्ट्रॅटेजिक कारणाने लपवतात तशा लपवा लपवीसाठी मिपा पुरोगामी करणीसेना सध्या जोरात कार्यरत आहे आणि ज्यांचा आवाज मोठा त्यांचेच खरे म्हणून त्यांच्या आवाजात आवाज मिसळून म्हणूया चला, मिपा पुरोगामी करणीसेनेचा ! विजय असो !!
:))

सोमनाथ खांदवे's picture

4 Aug 2018 - 12:11 pm | सोमनाथ खांदवे

सावधान ,
मिपावरील धुरंधर राजकीय तज्ञ मागा जी मैदानात उतरले आहेत .
पूर्वी लाखोंच्या संख्येने मराठी समाज मोर्चा मध्ये सामील होत होता त्या नंतर च्या प्रत्येक स्थानीय निवडणूक मध्ये भाजपलाच फायदा झाला .आता मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना पुन्हा मतदारांचे ध्रुवीकरण होऊन पुन्हा भाजपलाच फायदा झाला आहे , थोडक्यात मराठी समाजाचे प्रॉब्लेम्स चर्चेत राहिल्याने फक्त भाजपचा फायदा होतो .

गामा पैलवान's picture

4 Aug 2018 - 12:39 pm | गामा पैलवान

सोमनाथ खांदवे,

तुमच्याशी अंशत: सहमत. अंशत: अशासाठी की पूज्य भिडे गुरुजी हा घटक देखील अप्रत्यक्षरीत्या नडलेला दिसतोय.

शिवाय लोकं शहाणे झालेत ते वेगळंच. ढोंगातनं आरपार बघू लागलेत. मराठा आरक्षण हे फडणविसांना हटवण्यासाठी असंतुष्टांनी हाती घेतलेलं निव्वळ ढोंग आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद_१९८२'s picture

4 Aug 2018 - 12:33 pm | प्रसाद_१९८२

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उघड उघड मराठा आरक्षणांचे आंदोलन, जातीयवादी काड्या टाकुन अधिक पेटवत आहेत हे सर्वसामन्य जनतेला दिसत आहे. त्याचाच प्रत्यय कालच्या जळगाव व सां.मि.कु. महानगर पालिकेच्या निवडणुक निकालातून जनतेने दाखवून दिले

डँबिस००७'s picture

4 Aug 2018 - 1:18 pm | डँबिस००७

जळगाव_सांगली_निवडणूक जिंकल्या बद्दल भाजपा चे अभिनंदन !!

रामदास२९'s picture

9 Aug 2018 - 9:05 pm | रामदास२९

भा.ज.पा चे अभिनन्दन

नाखु's picture

9 Aug 2018 - 10:02 pm | नाखु

अभिनंदन

भाजपा विजयासाठी जळगावात मदत केल्याबद्दल

माहितगार's picture

9 Aug 2018 - 10:33 pm | माहितगार

अभिनंदने येताहेत पण सविस्तर विश्लेषणाचा अभाव जाणवतोय.

जसा काय देवेंद्र आमरपट्टाच घेऊन आलाय. मोदीचा भी घडा भरेलच ना कधीतरी.

मुख्यमंत्री, पंतप्रधानांसाटी यकदम आरेतुरे ? घाव वरमी लागल्याला दिसतुया ?! =)) =))