ईंडस्ट्रियल व्यवस्थापन
लेखनविषय (Tags)
ईंडस्ट्रियल व्यवस्थापनाच्या वर्गात विद्यार्थी असताना ऐकलेली एक गोष्ट शेअर करत आहे.
............................
एकदा मानवाच्या सर्व अवयवांची सभा भरली व प्रत्येक जण आपापल्या कामाची यादी देत कौतुक करुन घेत होते...
हात म्हणाले "माझे काम खुप महत्वाचे आहे मी नसेल तर माणुस काम करु शकणार नाहि स्वताचे रक्षण करु शकणार नाहि..माझ्या शिवाय मानवाचे जिवन त्याला असह्य होईल."
पाय म्हणाले" मी म्हणजे वेग..मानवाला इच्छित स्थळी पोहोचवणे वेळप्रसंगी संघर्षात त्याला मदत करणे माझे काम..."
.
मेंदु म्हणाला मित्रानो माझे काम सर्वात महत्वाचे आहे..मी सुचना देतो...तुम्हा सर्वाना कसे काम व काय काम करावे याच्या सुचना देतो..मि नसेल तर हे मानव जिवन व्यर्थ होईल
या प्रकारे लिव्हर..हृदय सारे जण आपले काम सांगत वहावा मिळवत होते..
या प्रकारे डोळे कान..लिव्हर आदी सर्व अवयवांनी आपापली कामे सांगित्तली..
अहो रूपं अहो ध्वनि न्यायाने कौतुके चालु होति
.
शेवटी वेळ आली गुदद्वाराची...
शरिरातले वेस्ट बाहेर टाकणे हेच त्याचे काम..तो बोलायला लागला. व सर्व अवयव कुचेष्टेने हसु लागली..
तुलनेने हिन दर्ज्याचे काम..आपली टर उडवली जात असल्याने ते नराज झाले व त्याने बोलणे बंद केले
सभा संपली मात्र गुदद्वार खुप नाराज व उदास होते.."माझ्या कामाला काहि किंमत नाहि ..मी एक तुछ्य अवयव आहे हि भावना त्याच्या मनात बळावली व त्याने ठरवले ज्या कामाला किंमत नाहि ते काम तरी कशाला करायचे? असा विचार करुन त्याने संप पुकारला व "टुल डाऊन" आंदोलन सुरु केले..
सकाळी मानव उठला . टॉयलेटला गेला पण क्रिया होईना..
तो तसाच बाहेर आला..दुपारी जेवण पण कमी गेले..रात्र झाली अन पोटात गुबारा धरला.
दुसरे दिवशी पण हिच अवस्था ..जेवण नाहि पोट दुखत होते...
तिस~या दिवशी मात्र अंगातले त्राण निघुन गेले रक्त शरिरात तयार होईना म्हणुन हात पाय गळाले.. डोळ्यावर अंधेरी आली..व डोके दुखु लागले..
हे नेमके काय होते हे न कळाल्याने परत अवयवांची सभा भरली ..
मेंदु हुषार असल्याने त्याने ओळखले व त्याला सर्वांची चुक उमगली..
तो ईतर अवयवांना म्हणाला...
आपण आपल्याच कामाच्या कौतुकात गर्क झालो मात्र गुदद्वाराचे काम महत्वाचे नाहि असे समजुन त्याची टर ऊडवली ...आपले चुकले याची सर्वाना जाणीव झाले व खल झाला व सर्वानी त्याची माफि मागायचे ठरवले..
सर्वजण त्याच्या कडे आले व हात जोडत माफि मागीतली व म्हणाले " मित्रा माफ कर आम्हि तुझ्या कामाला कमी लेखले..प्रत्येकाचे काम आपापल्या जागी महत्वाचे असते हे आम्हि अहंकाराच्या नादात विसरलो..आमची चुक झाली....आपण सर्वानी टिम म्हणुन काम केले तरच हा मानवि देव व्यवस्थित काम करु शकेल ..
तु राग सोड व आपले काम नियमीत पणे चालु कर
या वर ते हसले व त्याने आपले काम चालु केले मानवि देह परत व्यवस्थित कामाला लागला...
.
तात्पर्य..मी पामर काय सांगणार तैल बुद्धिच्या समुह सदस्यांनी ते काढले सुद्धा असेल
प्रतिक्रिया
Any Ass hole can make you
यापुढचं विधान ....
प्रत्येकजण आपापल्या खुर्चीचा
हंम्म!
आम्ही वैद्यकीय शिक्षण घेत असताना
छान बोधकथा. आवडली. अजून येऊ
जातीव्यवस्था तील उतरंड आणि
जवळची जातीव्यवस्था