नमस्कार मंडळी,
सर्व प्रथम माझ्या ब्लॉग ला तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मराठी ही ज्ञानभाषा आहे हे तुम्ही तुमच्या प्रतिसादामधून सिद्ध केलंत ..
आज एका महत्वाच्या विषयासंबंधी आपल्याशी बोलणार आहे, तो विषय आहे भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा Physics. न्यूटनची काही सूत्रे व काही formule याच्या पलिकडे या विषयात काही आहे असं फार कोणाला वाटत नाही. त्याला कारण म्हणजे ज्या पद्धतीने याविषया वरील पुस्तके लिहिली जातात आणि त्यातही गणिते सोडवून मार्क मिळवण्यावर भर दिला जातो त्यामुळे या विषयात काही मनोरंजक, मजेदार असू शकेल असं निदान त्या वयातल्या विद्यार्थ्यांना वाटत नाही..
पण या विषयाची गोम म्हणजे तुम्हाला Science ला जायचं असेल तर या विषयाशी सख्य करावंच लागतं..केवळ Physics आवडलं नाही म्हणून Science career सोडलेले खूप आहेत..शिवाय गोगलगाईच्या पोटात पाय असं म्हणतात तसं या Physics विषयाच्या पोटात Maths दडलेलं असतं..एकंदरच अवघड मामला..याचाच चुलत भाऊ Engineering Mechanics हा असून तो भल्याभल्यांना रडवतो..मुलांची वर्ष राहतात..मुलांना नैराश्य येतं..
या सर्व पार्श्वभूमीवर या विषयावर आधारीत गोष्टी मराठीत लिहाव्यात आणि मुलांचा ताण थोडा हलका करावा यासाठी मी एक ब्लॉग सुरु केला..यात विक्रम वेताळाच्या गोष्टींच्या रूपात या संकल्पना मांडत आहे..त्यात भर म्हणजे भारतातील पदार्थ विज्ञानाचे ४-५व्या शतकातील पुस्तक मिळाले..त्याचाही योग्य तेवढा संदर्भ देऊन गोष्टी लिहिल्या, लिहितोय..उद्देश एवढाच की मुलांनी निदान पास होण्यासाठी तरी अभ्यास करावा व नैराश्यातून सुटावं..त्याच साठी सारा खटाटोप..
--तुम्ही अशा विद्यार्थ्यांचे पालक असाल तर या ब्लॉग चा संदर्भ म्हणून वापर करून मुलांना संकल्पना समजवू शकता..
--स्वत: शिक्षक असाल तर शिकवण्यात थोडी मजा आणू शकता..
--विद्यार्थी असाल तर ताण थोडा हलका करू शकता..
--या विषयात नापास झालेल्या, हा विषय जड जाणाऱ्या, हा विषय अजिबात न आवडणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना हा ब्लॉग वाचायला सांगून थोडी मदत करु शकता..
काही सुधारणा सुचवायच्या असल्यास सुचवू शकता..जरूर विचार केला जाईल ..ब्लॉग लिंक खाली देत आहे..प्रतिक्रीया कळवा..वाचायचे पैसे पडत नाहीत!!!
विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात
हे फक्त Physics बद्दल झालं पण इतरही विषयांवर मराठीत लिखाण व्हायला हवं.. विषय अगणित आहेत .. वाचकही अगणित आहेत.. तुमच्या आवडीच्या विषयावर लिहा.. मला जसं मिपा वरच्या मंडळींनी समजून घेतलं तसं तुम्हालाही समजून घेतील.. प्रसंगी दुरुस्त्या सुचवतील .. पण यातून कोणालातरी शिकण्यात मदतच होईल .. त्यामुळे मागे हटू नका..
कळावे लोभ असाच कायम राहावा ही विनंती ..
अनिकेत कवठेकर
वाचने
4126
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
विज्ञान, गणित, या विषयंची
खरंय एका अर्थी..पण दोष त्यांचा नाही
In reply to विज्ञान, गणित, या विषयंची by कंजूस
अतिशय उत्तम संकल्पना.
हो खरंय तुमचं
In reply to अतिशय उत्तम संकल्पना. by दुर्गविहारी
अतिशय गरज असलेला हा विषय आहे.
हो खरंय तुमचं
In reply to अतिशय गरज असलेला हा विषय आहे. by शेखरमोघे
खुप मस्त
धन्यवाद
In reply to खुप मस्त by balasaheb
स्पृहणिय उपक्रम ! त्याला
धन्यवाद
In reply to स्पृहणिय उपक्रम ! त्याला by डॉ सुहास म्हात्रे
चांगली कल्पना आहे...
बापरे..बहुत गहरी बात..
In reply to चांगली कल्पना आहे... by सतिश गावडे