अहंकार आणि अपराधीपणाची भावना .

सोमनाथ खांदवे's picture
सोमनाथ खांदवे in काथ्याकूट
18 Jul 2018 - 7:17 pm
गाभा: 

क्षुल्लक कारणा मूळे आपण एखाद्या व्यक्तीचा अपमान करतो , दोन तीन दिवस आपल्या अहंकाराला गोंजारत आपल्या भूमिकेचे मनातल्या मनात आपण समर्थन करत असतो . पण कालांतराने ती व्यक्ती तेवढी वाईट नाहीये अशी पाश्चातापाची जाणीव आपल्याला व्हायला सुरुवात होते . पूर्वीचे त्या व्यक्तीचे सद्गुण दिसायला लागतात , मग एक दिवस आपणच ती कोंडी फोडून पुन्हा त्या व्यक्ती बरोबर जिव्हाळ्याचे नाते स्थापित करण्यात यशस्वी होतो .
‌ अस प्रत्येका च्या आयुष्यात कधी ना कधी झालेले असते , काही वेळेस त्या व्यक्ती चे निधन होईपर्यंत आपला राग शांत झालेला नसतो किंवा आपण संधी घालवलेल्या असतात आणि त्याबद्दल ची खंत आपल्या मनात सतत सलत असते .
‌ माझ्या पेक्षा वयाने कमी असलेल्या चुलतभाऊ चा मी राग अनावर झाल्यामूळे त्याचा चार चौघात अपमान केला व त्याला फाडफाड बोललो . पण काही दिवसानंतर मी त्याच्याशी संवाद साधून आमच्यात असलेला अबोला दूर केला आणि माझ्या मनावर असलेलं अपराधीपणाच ओझं कमी केलं .
मला मंगुशेठ बरोबर संवाद साधायचा आहे पण त्ये कुठं गायब झालेत कोणास ठाऊक ?

‌ अस तुमच्या बरोबर कधी झालंय का ? .

प्रतिक्रिया

लई येळा सोमनाथ भौ. मला लगेच राग येतो व शिव्या द्यायची वाईट सवय आहे. शिव्या दिल्यावर आत खुप वेदना होतात व पश्चाताप होतो पण अगोदर कंट्रोल होत नाही. समोरचा ते विसरणार नाही असे वाटते म्हणून माफी मागत नाही.

सोमनाथ खांदवे's picture

18 Jul 2018 - 9:04 pm | सोमनाथ खांदवे

मंग तुमी खिलजीराव च्या या धाग्यावर का नाय आले ? गावच्या जत्र सारखी तुंबळ शिवीगाळ चालली व्हती आन तुमच मन बी कस निरोगी गुटगुटीत झाल आस्त.

https://www.misalpav.com/node/42936

वाईट वाटून घ्यायला वेळ आहे कुणाला ?
इमोशनल होण्याचा जमाना गेला , इथून पुढे एक घाव दोन तुकडे ची संस्कृती आहे . तुम्ही बसा जुन्या विचारांना कवटाळत !!

सोमनाथ खांदवे's picture

19 Jul 2018 - 2:36 pm | सोमनाथ खांदवे

ट्रम्प , नवीन हाईस वाटत ! नाव सार्थकी केलंस रे बाबा !!
सारे जग त्या ट्रम्प ने जागतिक व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर आणले .
तू तरी शांततेत घेत जा .

सोमनाथ खांदवे's picture

19 Jul 2018 - 2:37 pm | सोमनाथ खांदवे

अरे हो सांगायचे विसरलो ,
' मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद '

माझं असं खुपदा होतं. मात्र माझं चुकलं हे उमजलं की मग मात्र मी पायावर डोकं टेकवून्देखिल माफी मागायला लाजत नाही. शक्यतो लोक माफच करतात, कधी कधी संधीचा फायदा घेऊण उट्टे काढतात, ते सहन करायची तयारी हवी.
बाकी, पश्चातापाची भावना खरी असली तर माफी मागण्याने मनामागण्यानेखुप कमी होतो.

मराठी कथालेखक's picture

19 Jul 2018 - 12:26 pm | मराठी कथालेखक

क्षुल्लक कारणा मूळे आपण एखाद्या व्यक्तीचा अपमान करतो , दोन तीन दिवस आपल्या अहंकाराला गोंजारत आपल्या भूमिकेचे मनातल्या मनात आपण समर्थन करत असतो .

सहमत..

मला मंगुशेठ बरोबर संवाद साधायचा आहे पण त्ये कुठं गायब झालेत कोणास ठाऊक ?

हं...मिपावर उगाच आक्रमक प्रतिसाद देण्यापेक्षा 'मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आभार' वगैरे मानून नंतर शालजोडीतले द्यावेत :)

माहितगार's picture

19 Jul 2018 - 12:29 pm | माहितगार

सोमनाथ भौ, तेलणीशी रुसला वेडा - या तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारीत आमचा हा धागा लेख साधारणतः याच विषयवर आहे.

बाकी आपल्या लेखात एक तळटीप आहे त्या बाबत म्हणाल तर 'भूले भटकेकी कभी न कभी घर वापसी हो ही जाती है', अशी आशा करणे अधिक उत्तम कारण घरवापसी प्रत्यक्ष झाली नाही तरी एक म्हण आहे; ' जुना बॉस कसा बरोबर होता ह्याची आठवण नौकरी बदलल्यावर येते, आधीच्या नवर्‍याचे चांगले गुण पुर्नविवाहानंतर उमजततात, आणि आपला बाप कसा बरोबर होता ते स्वतः बाप झाल्यावर कळते' आणि अशी आठवण होऊन तदनुषंगिक होणार्‍या व्यावहारीक अ‍ॅडजस्टमेंट ही केवळ अप्रत्यक्ष आणि मानसिक असली तरी पण जिथे कुठे असतील तेथे खरी प्रभावी घरवापसी असते.

ट्रम्प's picture

20 Jul 2018 - 6:28 pm | ट्रम्प

तुमचे प्रतिसाद खरंच खूपच मौल्यवान , जीवनाचा लौकिक अर्थ सांगता !सांगता !! परमार्थिक च्या वाटेने त्रिभुवनाची सफर घडवुन आणतात .

फक्त ते ' तदनुषंगिक ' म्हणजे काय तेवढं सांगा ना !!!

माहितगार's picture

20 Jul 2018 - 7:02 pm | माहितगार

तदनुषंगिक = त्या अनुषंगाने / त्या बाबतीत

आणि अशी आठवण होऊन त्या बाबतीत होणार्‍या व्यावहारीक अ‍ॅडजस्टमेंट ही केवळ अप्रत्यक्ष आणि मानसिक असली तरी पण, जिथे कुठे असतील तेथे खरी प्रभावी घरवापसी असते.

स्वतःचे उदाहरण सांगतो नौकरी बदलून नव्या नौकरीत गेल्या नंतर अमुक एक गोष्ट आधीच्या बॉसने कशी केली असती अथवा तो काय म्हणाला असता हे आठव्णे. अरे तो तर बरोबर होता याची उपरती होणे (त्याच्या सोबत असताना त्याचे मत दुर्लक्षीलेले असते) आणि नवीन नौकरीवर त्याने सांगितलेला मार्गच योग्य होता म्हणून इंप्लिमेंट करणे . म्हणजे प्रत्यक्षात जुन्या नौकरीत वापस जाऊन घर वापसी करत नाही . पण नवीन नौकरीत कळत नकळत जुन्या बॉसची संस्कृती घेऊन येतो.

* लिंक तेलणीशी रुसला वेडा - मानवी स्वभावाची सामुहीक असहकार चळवळ
https://www.misalpav.com/node/29325

ट्रम्प's picture

20 Jul 2018 - 6:40 pm | ट्रम्प

तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहचण्याचा प्रयत्न केल्याने वाळु मधूनी तेल निघाले नाही . तिथे पोहचता आम्हांस खालील प्रमाणे दिसुनी आले व तुमचा लेख याची देही याची डोळा पाहण्याची आमुची उत्कंठाता पार लयास गेली . तरी आपण पुन्हा एकदा प्रयत्नवर्धकता वाढवुनी सकळजनांची ज्ञानवृद्धी करण्याचा पण करावा . बाकी सर्व क्षेमकुशल असेलच अशी आशा सकळजनांच्या वतीने करितो .

हुश्श !!!!!!!!!!! दमलो बुवा .

This site can’t be reached
xn--wwwalpav-bfq2hwfxg.com’s server IP address could not be found.
DNS_PROBE_FINISHED_NXDOMAIN

ट्रम्प's picture

20 Jul 2018 - 8:14 pm | ट्रम्प

आग बाबो !!!
शेवटी आम्ही तंव वेलींची वल्कले सोडण्यात यशस्वी झाहलो असता आम्हास असे निदर्शनास आले की सर्व क्षुद्रजन का बरें तुमच्यामागी का बरे हाथ धुवुनीसी लागे ?