✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाघ-पेंटिंग

स
सप्तरंगी यांनी
Fri, 06/22/2018 - 18:51  ·  लेख
लेख
वाघ वाघ-close-up #art #painting #realism #oil #shilpasart #70x90cm कुणाला कशी काय आवडेल हे काही सांगता येत नाही. माझ्या मुलाला प्राण्यांमध्ये भलताच interest आहे. पण एकतर मी घरात किंवा मग तो प्राणी असा एकदम पेचात सवाल टाकल्याने अगदीच ना-इलाजाने त्याला कुत्र्याऐवजी, सॉरी सॉरी डॉगीऐवजी, मलाच सिलेक्ट करावे लागले. पण अनायसे चालून आलेली ती संधी त्याने आईची असलेली नसलेली कुवत पणाला लावावीच लागेल अश्या प्रकारे वापरली. मला मनात नसताना, स्वतःवर विश्वास नसताना आणि मुख्य म्हणजे आवड नसताना त्याला हवे असलेले काम सुरु करावे लागले. मी हो म्हणेपर्यंत मी घरातलयांकडून कशी कामे करून घेते याचा मला जो अभिमान होता तो काही क्षणात नष्ट झाला. कधी कधी मुले असा आपला नको तो दोष बरोबर उचलतात ते असे. आणि आई अश्या कुठल्यातरी कामात व्यस्त झाली कि तिचे आपल्याकडचे लक्ष कमी होते हे त्याला स्वानुभावाने बरोबर कळले असावे. आता त्याला चक्क वाघाचे पेंटिंग हवे होते त्याच्या रूममध्ये लावायला. आता वाघ काय कुणाच्या घरात असतो का? आजपर्यंत वाघाने मला फार जवळून पाहायची हिम्मतसुद्धा केली नाही तो काय माझ्या घरी आश्रयाला येणार. आणि आलाच तर मी त्याचे पोर्ट्रेट काढेपर्यंत पोझ देऊन बिचारा शांतपणे बसला असता का? पण हे सगळे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत मुलगा नव्हता.  कुत्रा घरात आणण्यापेक्षा वाघाशी युती करणं माझ्यासाठीसुद्धा इम्पल्सिव्ह असलं तरीपण जास्त सोईस्कर होतं.  मग हा नको तो नको करत त्यातल्या त्यात सोबर दिसणाऱ्या वाघाचा फोटो शोधला, जो आमच्या सज्जन कुटुंबात सामावून जाईल.  या वाघाला घरातच पाळायचे असल्यामुळे खूप जास्त विचार करायची गरज नव्हती पण मुख्य प्रश्न होता कि आपल्याला न आवडणारी गोष्ट आपण करू शकतो का ? पेंटिंग माझ्या कामाचा नाही तर छंदांचा भाग असल्यामुळे जर कोणी बाहेरच्यांनी वाघ पेंट करण्यासाठी विचारले असते तर ती माझी style नाही असे दिमाखात उत्तर देणे शक्य होते पण हे घरचे तर आपल्याला पुरते ओळखून असतात. त्यात आजकालची हि मुले तर तोंडावर बोलून पाणउतारा करूच शकतात.  त्यांच्यासमोर अशी स्टाईल-वाईलच सोंगे घेता येत नाहीत.  ती बरोबर पोल खोलतात.  त्यामुळे ट्राय करने मी क्या जाता है, वाघ नाही तर त्याची मावशी तर बनेल असा उद्दात विचार करून भावनेच्या भरात आणि जरा जोशात , आपण फार मोठठे आर्टिस्ट आहोत असं भासवत आजपर्यंत कधीच इतका मोठा ना वापरलेला ७०*९० सेंमीचा कॅनवास तोही चांगला लिनन, बसमधून मिरवत मिरवत आणला.  हा जोश कॅनवास घरी आणेपर्यंत टिकून होता. घरी येईपर्यंत सगळे उसने अवसान गळाले होते.  तरी कसेबसे- कधी आनंदाने, कधी कुणी धक्का दिला म्हणून, कधी रडत पडत  शेवटावर येऊन पोहोचले.  एक एक केस रंगवताना केसाळ ऐवजी जरा म्हातारा , याच बाबा,  निवडला असता तर बरे झाले असते का असं वाटून गेलं. डोळे हा त्यातला सगळ्यात अवघड भाग होता, कितीही बदल केले तरी तो काही माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायला धजावत नव्हता.  शेवटी जरा जोंजारून चुचकारून मी त्याला त्याला धीर दिला, आमच्या घरात तुला कायमस्वरूपी स्थान देऊ असे आश्वासन दिलं.  त्याला माझ्याकडे बघायचे हे मानसिक बळ देण्यात खूप वेळ गेला मग कुठे तो सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाला.  आज तो वाघ माझ्या घरचा बनुन गुमान भिंतीवर पण नजर रोखून बसला आहे. www.facebook.com/shilpasart ........................................................................................................................................................................................... What is needed, rather than running away or controlling or suppressing or any other resistance, is understanding fear; that means, watch it, learn about it, come directly into contact with it. We are to learn about fear, not how to escape from it.....Jiddu Krishnamurti
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3041 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

फारच सुरेख... डोळे तर अगदी

मदनबाण
Sat, 06/23/2018 - 10:56 नवीन
फारच सुरेख... डोळे तर अगदी खरेच आपल्याकडे पाहत आहेत असं वाटतं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Boudi Sopner Sundori... ;)
  • Log in or register to post comments

डोळ्यांबाबत

विशुमित
Sat, 06/23/2018 - 11:06 नवीन
चित्र पाहिल्या पाहिल्या मी हेच म्हणणार होतो. ==== सुरेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वाह! अप्रतिम आहे!

एस
Sun, 06/24/2018 - 14:40 नवीन
वाह! अप्रतिम आहे!
  • Log in or register to post comments

मस्त जमलंय!

निशाचर
Sun, 06/24/2018 - 16:50 नवीन
मस्त जमलंय!
  • Log in or register to post comments

उत्तम !

चौकटराजा
Wed, 06/27/2018 - 14:17 नवीन
छान जमलेय. त्याची फर एकदम अशी, नजर अशी की आता झेप घेतो की काय ? असे वाटते !
  • Log in or register to post comments

@चौकटराजा, तो झेप घेत नाही

सप्तरंगी
Tue, 07/03/2018 - 18:23 नवीन
@चौकटराजा, तो झेप घेत नाही म्हणून आम्ही ठीक आहोत, थँक्स तुम्हाला आणि त्यालाही:) बाकी सगळ्यांचेसुद्धा आभार, खूप दिवसात इथे येणे जमले नाही जरा उशिराच उत्तर देतेय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

खतरनाकली ब्युटिफुल !

चौथा कोनाडा
Wed, 06/27/2018 - 17:53 नवीन
खतरनाकली ब्युटिफुल ! जबरदस्त कला आहे तुमच्या हातात ! लेखाची शैली उत्कंठा वाढवणारी आहे ! झक्कासच !
  • Log in or register to post comments

खरं सांगायचं तर पेन्टिंग

सप्तरंगी
Tue, 07/03/2018 - 18:20 नवीन
खरं सांगायचं तर पेन्टिंग पोस्ट करायचं मग काहीतरी लिहायला हवं म्हणून लेख लिहायला घेतला, योगायोगाने चांगला जमला. तुमचे खूप आभार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

बछड्या

नाखु
Wed, 06/27/2018 - 17:57 नवीन
साठी थेट वाघ, भारीच आहे की?
  • Log in or register to post comments

बालहट्ट आणि स्त्रीहट्ट , त्यासमोर वाघ नमला :)

सप्तरंगी
Tue, 07/03/2018 - 18:17 नवीन
बालहट्ट आणि स्त्रीहट्ट , त्यासमोर वाघ नमला :) btw..Thanks
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सुरेख!!

रातराणी
Wed, 07/04/2018 - 11:58 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा