✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

macOS आणि iOS -1 (Change Folder Icon)

श
शाली यांनी
Tue, 06/12/2018 - 19:23  ·  लेख
लेख
बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मला माहित असलेली माहिती देण्यासाठी एक सदर सुरु करावे म्हणत होतो. यात काही टिप्स असतील, ट्रबलशुटींग असेल किंवा मला आवडलेली काही ॲप असतील. किंवा ॲप्पलविषयीच्या नव्या बातम्याही असतील. पण प्रश्न होता भाषेचा. ईंग्रजीत तर लिहायचे नाही आणि मराठीत लिहायचे तर ईंग्रजी शब्दांना पर्याय सापडत नाही. म्हणजे निदान मला माहित नाहीत. मग ठरवले जमेल तसे लिहावे, सुचतील ते शब्द वापरावे. तर आज अगदी साध्या गोष्टीने सुरवात करु. माझ्या डेस्कटॉपवर अनेक फोल्डर असतात. ज्यात माझ्या वेगवेगळ्या कामाच्या फाईल्स असतात. पण सगळे फोल्डर आयकॉन हे डिफॉल्ट आयकॉन असतात. ते पहायला फार कंटाळवाणे तर होतेच पण जास्त फोल्डर्स असतील तर पटकन शोधायला जरा अवघड जाते. प्रत्येकवेळेस स्पॉटलाईट सर्च ऊघडत नाही कोणी. (खरं तर फारसे त्रासदायक नाही पण आपल्या विशिष्ट फोल्डरला ‘विशिष्ट’ आयकॉन असला की छान वाटते.) माझ्या मिपावरील लेखांचे एक फोल्डर आहे ज्याचा डिफॉल्ट आयकॉन आहे. तर पाहूयात, तो कस्टम आयकॉन कसा करता येईल. प्रथम तुम्हाला जो आयकॉन वापरायचा असेल तो डाऊनलोड करुन घ्या. या साठी अनेक वेबसाईट्स आहेत ज्या ऊत्तम आणि वैविध्यपुर्ण आयकॉन फ्रीमध्ये देतात. शक्यतो ही इमेज png (transparent background) असेल तर छान दिसेल. मी ‘मिपा’चा लोगो आयकॉन म्हणून वापरला आहे. आता ही इमेज कॉपी करा. त्या साठी ही इमेज प्रिव्ह्यू मध्ये ऊघडा. एडीटवर क्लिक करुन ‘सिलेक्ट ऑल’वर क्लिक करा. नंतर कॉपी करा. 1 2 आता ज्या फोल्डरचा आयकॉन बदलायचा आहे त्या फोल्डरची info window ऊघडा. त्यासाठी फोल्डरवर राइट क्लिक करुन Get Info वर क्लिक करा किंवा ⌘+I हा किबोर्ड शॉर्टकट वापरा. Info Window ऊघडल्यानंतर त्यातील असलेल्या आयकॉनवर क्लिक करा. नंतर एडिट मध्ये जावून Paste वर क्लिक करा. 3 तुमच्या फोल्डरचा आयकॉन बदललेला असेल. 4 अर्थात ही माहिती कामासाठी फारशी ऊपयोगी नसली तरी जरा बदल म्हणून वेगवेगळे आयकॉन वापरुन पहायला काही हरकत नाही. पुढील सदरात ऊपयोगी टिप्स आणि ॲप्लिकेशन याबद्दल पाहू.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1545 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

सुरुवात चांगली आहे. पुढील

सालदार
Wed, 06/13/2018 - 15:52 नवीन
सुरुवात चांगली आहे. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा