पावसाची बॅटींग

dadabhau's picture
dadabhau in काथ्याकूट
7 Jun 2018 - 7:08 pm
गाभा: 

पावसाळा सुरु झालाय.. मंडळी कोण काय ठरवते तर कोण काय...
मी मात्र आता ३/४ महिने सगळ्या चॅनेल्स /पेपर मध्ये "पावसाची बॅटिंग " हा शब्द किती वेळेस उच्चारला/छापला जाईल याचा स्कोर मोजणार आहे...
काय हे आजकाल पाऊस पडत /कोसळत नाही तर फक्त "बॅटिंग" च करतो ना.. म्हणून हा स्कोर मोजायचा उपक्रम !!! साधारणतः पावसाळा संपल्यावर ३० सप्टेंबर च्या जवळपास मिपावर ह्या स्कोर चे पद्धतशीर पणे विश्लेषण प्रसिध्द केले जाईल . ( म्हणजे .. छापील "बॅटिंग " किती वेळेस वाचला .... मराठी चॅनेल वाल्याने माझ्या प्रेझेन्स मध्ये किती वेळेस उच्चारला ....चॅनेल च्या खाली दिसणाऱ्या धावत्या पट्टीवर किती वेळी गरागरा फिरवला गेला ( माझ्या समजुती प्रमाणे एक माणूस स्टुडिओत कुठेतरी बसून "शेवया करतांना सोऱ्या जसा फिरवतात तसा " एक मशीन गरागरा फिरवून ती पट्टी फिरवत असतो ).

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

9 Jun 2018 - 9:33 pm | मनिमौ

त्या यादीत मुंबई ची तुंबई, नालेसफाई, हिंदमाता हे शब्द पण जोडा

खड्डे, तुंबापुरी,नालेसफाईतील भ्रष्टाचार, रेल्वे खोळंबली, हार्बर लाईन, हायवे जाम, दरड कोसळली, माळशेज इ इ इ...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar

नोकरदारांची कुचंबणा, दाणादाण उडवली, दैना, जनजीवन विस्कळीत, जलमय, बीएमसीचे दावे वाहून गेले, थैमान.

जलप्रलय, चाकरमान्यांचे अतोनात हाल राहून गेले.

धर्मराजमुटके's picture

10 Jun 2018 - 12:07 pm | धर्मराजमुटके

मुंबईची झाली तुंबई
मुंबापुरीची झाली तुंबापुरी
मुंबईच्या महापौरांची विनोदी वाक्ये ( महापौर आणि वाक्ये बदलतात पण आशय तोच असतो !)

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2018 - 12:04 pm | टवाळ कार्टा

मुंबई स्पिरिट हे शब्दपण घ्या लिस्टात

प्रगत तंत्रज्ञानाचे तीन तेरा कसे वाजवावे हे अजूनही तो वरचा ठरवतो . मॉन्सून यायच्या आधीच त्याबद्दल शुभवर्तमान करणारे आपले हवामान खाते , आता टोकाच्या शिव्या खाते आहे .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मराठी_माणूस's picture

12 Jun 2018 - 3:47 pm | मराठी_माणूस

पावसाची "दडी"

खिलजि's picture

12 Jun 2018 - 4:10 pm | खिलजि

आणि हवामान खात्याला छडी

आज पावसात अचानक मला ते जुने दिवस आठवले

ते भळभळ वाहणारे नाक

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी लीलया खेळणारा पिवळा धम्मक शेमबूड

ती खाली घसरणारी तरीही हातात घट्ट धरून ठेवलेली चड्डी

आणि फक्त डाव्या हाताने तुला दिलेला झोका

ती निष्फळ ठरलेली पण मनापासून केलेली मेहेनत आणि तिने दिलेला धोका

सिद्धेश्वर विलास पाटणकर

नाखु's picture

14 Jun 2018 - 7:34 am | नाखु

हा शब्दच हद्दपार केला आहे, दाणादाण उडाली,असं काही ठिकाणी लिहीलं जाते

बळीराजा चिंतेत, आकाशाकडे डोळे लावून बसले असल्याने स्टाकमधील (संग्रही) छायाचित्र हमखास

दहा पंधरा तक्रारी, निराशाजनक बातम्या नंतर एखाद्या बंधारा भरल्याचे,नदी वाहती झाल्याच्या बातम्या मी हुडकत बसतोय

भिजपावसातला नाखु

वैतरणा, भातसा, विहार यांमध्ये केवळ अमुक टक्के जलसाठा.

तोंडचे पाणी पळाले.

मोडकसागर दुथडी भरून वाहू लागला. तलावही दुथडी भरतात.

सिरुसेरि's picture

16 Jun 2018 - 12:05 pm | सिरुसेरि

"पावसाची बॅटिंग थांबली रे , तुझी माझी जोडी जमली रे " असा काहितरी नवीन शब्द काव्य प्रयोग रुढ होइल .