✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साठा उत्तरांची कहाणी

अ
अनन्त्_यात्री यांनी
Tue, 04/17/2018 - 19:34  ·  लेख
लेख
एक टिनपाट महानगर होतं तिथं एक आय्-डी होता हा आय्-डी कसा होता? विद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ. त्याचा दिवस कसा जायचा? सक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा लंच टायमात एका संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा काॅफी ब्रेकात दुसर्‍या संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा परतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा. एकदा काय झालं? जरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वैचारिक वैफल्य आलं बिचार्‍याला. या वैफल्यानं काय झालं? त्यास आंजावैराग्य आलं आंजावैराग्याची लक्षणे कोणती? तो टंकेना की पिंकेना समस्त स्क्रीनांकडे तो पाठ फिरवू लागला. दगडामातीच्या, हाडामासाच्या जगात २४x७ वायफायरहित जगायचं स्वप्न बघू लागला. त्याच्या घंटो मिटल्या लॅपटाॅपची बिजाग्रं बिघडली. त्याच्या मिनिटोमिनीट बंद चलाखफोनावर कोळीष्टकं जमली. अनरेड कायप्पा पोष्टींनी सहस्रक ओलांडलं. विचारवंताचं हे कडकनाथ वैराग्य देखून इकडे समाजमाध्यमेशांची तंतरली. झुक्याची झोप उडाली पिचई पेचात पडला गेट्स गडबडला संस्थळमालक सटपटले "आज एकास पण उदईक समग्र विचारवंतांस समाजमाध्यमांप्रति ऐसे शुकवैराग्य आले तर आपल्या जगड्व्याळ पोटा-पसार्‍यांचे काय?" ही कुशंका त्यांस पोखरू लागली. समाजमाध्यमेश सत्वर मिटींगले. दूतास रदबदलीस पाठविण्याचे मुकर्रर केले. दूत विचारवंतादारी पोहोचून त्यास विनविता झाला, "एकडाव, फक्त एकडाव अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिना. समाधान न पाविल्यास बंद्यास बेशक बे-सीपीयु करा" विचारवंत द्रवले. अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिनले. डोळे उघडतात तो काय? सभोवती वरती खालती लखलख आरशांची खडी आरशाआरशातून खुणावणारे स्वत:चेच जुने आय् डी विचारवंत दिपले पण क्षणात सावरले. एकेक आरशात पाहते झाले. ...निरागस, उथळ, भावुक, रसिक, आक्रमक, तत्वज्ञ... विस्मृतीत गाडलेले माझे इतके उत्क्रांतीटप्पे येकगठ्ठा? विचारवंत गुंग झाले, क्षणभर नोस्टाल्जिले, जुन्या आय्-डींच्या नजरपहार्‍यात सांप्रतच्या आय्-डी ला शाबूत राखण्यात आंजाव्यग्र झाले. मग जगड्व्याळ मायासुरी जाळ्यात नकळत गुंतत गेले, ग्रहण सुटले, वैराग्य सरले, विचारवंत आभासी रूटीनात पुनश्च आकंठ रुतले, समाजमाध्यमेश सुटकेचा सुस्कारा सोडते जाहले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8721 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

:-)

एस
Tue, 04/17/2018 - 20:49 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

=)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/17/2018 - 20:56 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

लै भारी =)

रुपी
Wed, 04/18/2018 - 01:23 नवीन
लै भारी =)
  • Log in or register to post comments

मस्त.

चित्रगुप्त
Wed, 04/18/2018 - 04:16 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

=)) =)) बेक्कार भारी

सस्नेह
Wed, 04/18/2018 - 09:41 नवीन
=)) =)) बेक्कार भारी
  • Log in or register to post comments

आंजाचा आधुनिकशब्दकोश च सादर

अभ्या..
Wed, 04/18/2018 - 09:52 नवीन
आंजाचा आधुनिकशब्दकोश च सादर केलात जणू. अप्रतिम. मराठी मायमावलीने मांडीवर घेतलय तुम्हाला.
  • Log in or register to post comments

हाहाहा

वरुण मोहिते
Wed, 04/18/2018 - 10:06 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments

=)) भारी आवडेश :)

माहितगार
Wed, 04/18/2018 - 10:15 नवीन
=)) भारी आवडेश :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

पुंबा
Wed, 04/18/2018 - 12:33 नवीन
जबरदस्त..
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
गुरुवार, 04/19/2018 - 09:27 नवीन
सर्व मिपाकरांचे मन:पूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

:)

पैसा
गुरुवार, 04/19/2018 - 09:40 नवीन
:)
  • Log in or register to post comments

पैसा,

अनन्त्_यात्री
Fri, 04/20/2018 - 17:17 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

तुमच्या लेखनाला साजेसे एक व्यंगचित्र

जेम्स वांड
Sun, 04/22/2018 - 19:56 नवीन
Image removed. आगाऊपणा बद्दल आगाऊ माफी अटीतटीने आपापले राजकीय एजंडे राबवणाऱ्या सगळ्या मिपाकरांना समर्पित!!
  • Log in or register to post comments

जेम्स वांड

अनन्त्_यात्री
Sun, 04/22/2018 - 20:51 नवीन
व्यंगचित्र आवडलं !
  • Log in or register to post comments

आभार

जेम्स वांड
Mon, 04/23/2018 - 12:14 नवीन
हल्ली असे आयडी छाटून निवडून वेचून जमा करतोय, कारण त्यांच्याशिवाय आमचा 'कुठल्याही आनंदावर उत्तम विरजण घालून देऊ' हा छंद पुरा होऊ शकणार नाहीये. लब्धप्रतिष्ठित जनतेला इंटरनेटवर जिंकल्याचा सुखद अनुभव तरी का घेऊ द्यावा म्हणतो मी!, प्रसंगी उत्तम विरजण घालायलाच हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

:)

अनन्त्_यात्री
Mon, 04/23/2018 - 12:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

हा.हा.हा... =))

मदनबाण
Sun, 04/22/2018 - 22:36 नवीन
हा.हा.हा... =))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Wakhra Swag | Official Video | Navv Inder feat. Badshah |
  • Log in or register to post comments

मदनबाण,

अनन्त्_यात्री
Mon, 04/23/2018 - 11:15 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

जबर्या

नाखु
Mon, 04/23/2018 - 13:50 नवीन
फक्त ही कहाणी कुठल्या चतुर्मासात उ(प)द्यापीत करावी ते सांगा म्हणजे बरे!!! अखिल मिपा एक तर वसा घेऊ नये घेतला तर टाकू नये या संघ्याच्या अधिक मास की मात या समितीच्या वतीने नम्र विनंती
  • Log in or register to post comments

नाखु,

अनन्त्_यात्री
Mon, 04/23/2018 - 16:25 नवीन
_/\_ ! पृच्छा कळली. काय म्यां पामरे बोलावी उत्तरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा