काळोख्या,निशब्द,शांत नी पुर्ण अशा मध्यरात्री आकाशामधुन एखादा तारा निखळून पडताना जर आपण पाहीला तर आपल्या, त्या आकाशाप्रमाणे शांत झालेल्या, चित्तावर प्रकाशाची एक रेघोटी लकाकत चमकुन जाते. जीवनाचे एक नवीन तत्वज्ञान अशा वेळी जन्म घेऊ शकते नव्हे घेतेच. आपल्या असण्या आणि नसण्या मध्ये तत्वतः काहीही भेद नाही या अभेदाचा साक्षात्कार त्या निमिष मात्रात होऊ शकतो.
कल्पना करा, तुम्ही चटईवर पाठ टेकुन, कसल्याही चिंतेशिवाय, आकाशाकडे नजर लावुन, ह्या अंतरीक्षाचा मागोवा घेताय. आणि अशा वेळी एकापाठोपाठ एक, अनेक तारे निखळून पडताना आपण पाहु शकलो तर?
ही नुसतीच कल्पना नाही. येत्या २२ तारखेला, म्हणजे रविवारी मध्यरात्री (रविवार व सोमवार दरम्यानची रात्र) आपण असाच उल्का वर्षाव पाहणार आहोत.
हा उल्का वर्षाव कधी कुठे व कसा पहावा, याविषयी सोबतच्या व्हिडीयोमध्ये सविस्तर माहीती मिळेल.
विडीयो पहा
याद्या
4574
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
मागील वर्षीच्या
छान माहिती .......
धन्यवाद.
धन्यवाद.
नाही येणार पाऊस किंवा ढग या वेळी.
In reply to धन्यवाद. by कंजूस
धाग्याबध्दल धन्यवाद. यावेळी
फक्त आज मध्यरात्री संपूर्ण
असे होऊ शकले तर..
In reply to फक्त आज मध्यरात्री संपूर्ण by मार्मिक गोडसे
तासाभरात तीन उल्का पडतांना
भारीच
In reply to तासाभरात तीन उल्का पडतांना by मार्मिक गोडसे
तासाभरात तीन उल्का
चित्रगुप्त जी..