हिंदी चॅनेलच्या बिहारी - यूपी च्या पित्त्यांचा पराभव....

सागर's picture
सागर in काथ्याकूट
25 Oct 2008 - 8:14 pm
गाभा: 

हिंदी चॅनेलच्या बिहारी - यूपी च्या पित्त्यांचा पराभव....

आज तक चॅनेल नी राज ठाकरे यांच्या मराठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याच्या लढाईला गुंडगिरीचे रुप दिले होते. त्यासाठी लोकांना अधीक भडकवण्यासाठी "मनसे"वर बंदी टाकावी यासाठी उत्तर भारतीयांना खासकरुन मत देण्याचे आवाहन केले होते. त्यांचा हा विषारी प्रयत्न मराठी बांधवांनी केवढा जोरात हाणुन पाडला हे खालील निकालावरुन स्पष्ट होईल...

हाच निकाल येथे पाहता येईल....

http://aajtak.itgo.in/index.php?option=com_poll&task=results&Itemid=1&id...

या प्रतिसादानंतर 'आजतक' ने या विषयाचे नावच काढले नाही... सहजपणे स्वतःची चूक कबूल करायचा मोठेपणा त्यांच्यात नाही हेच खरे...

जय महाराष्ट्र
(भारत आणि महाराष्ट्र प्रेमी) सागर

From SocialImages

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

25 Oct 2008 - 9:11 pm | सखाराम_गटणे™

सहमत
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

रामदास's picture

25 Oct 2008 - 10:26 pm | रामदास

ज्याचा मृत्यु मनसेमुळे झाला असे वारंवार ओरडून सांगीतले जात होते तो रेल्वे अपघातात मरण पावल्याची वस्तुस्थिती आजच नेटवर वाचली.गोबेल्सच्या प्रचार तंत्राची प्रचिती आली.

स्पष्ट दिसते की पवन कुमार पाय घसरुन मेला.
रेल्वेत निदान चढता येणारयालाच नोकरी वर घेण्यात यावे असा एकादा कायदा करण्यात यावा.उगाच घोळ होतो.

वेताळ

इनोबा म्हणे's picture

25 Oct 2008 - 10:54 pm | इनोबा म्हणे

आज सकाळी झी चोवीस तास या मराठी वृत्तवाहीनीवर या पवनकुमारचा मृत्यू आमच्या डोळ्याने पाहीला राव आम्ही.रेल्वे स्थानकातील सीसी टीव्ही कॅमेर्‍यामुळे या घटनेचे चित्रिकरण झाले होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे पवनकुमारला अपघात झाल्यानंतर त्याला एका खास विमानाने झारखंडला त्याच्या गावी नेण्यात आल्याचे सांगितले जातेय. आता हा प्रवासखर्च या मुलाला किंवा त्याच्या बरोबर असलेल्या इतर मुलांना परवडला कसा? की याचे राजकीय भांडवल करता येईल म्हणून यांच्या बिहारी नेत्यांनी अर्थपुरवठा केला?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

26 Oct 2008 - 12:44 am | विसोबा खेचर

दोन कारणं -

१) दिवाळी आहे, सणासुदीचं वातावरण आहे,

आणि

२) आईवरून कुणाला शिवी द्यायची आमची पद्धत नाही!

म्हणूनच वाचले बिच्चारे आजतकवाले.. असो...

तरीही एक शेलकी कोकणी शिवी देतोच..)

हे भिकारचोट आजतकवाले थोबाडावर आपटले ते बरेच झाले...! :)

तात्या.

एकदम झकास तात्या,
अगदी ठेवणीतला नाही तरी त्या आज तक वाल्यांना मराठी लोक संस्कृती जपून पण कसा ठेवणीतला एकच रामबाण दणका देतात, हे कळेल. सणाचे भान ठेऊन तुम्ही आवर घातलात नाहीतर आज तक वाल्यांना तोंड दाखवायला पण तुम्ही जागा ठेवली नसतीत.... :)

जय महाराष्ट्र
- सागर

टारझन's picture

27 Oct 2008 - 1:53 am | टारझन

आहो ओ ओ ओ .. तात्या ... आवरलं नसतं तरी आम्हाला आवडलं असतं... च्यायला .. ते आय.बी.एन. आणि आज तक तर लै डोक्यात गेलेत .. आता काय म्हणेल तो टकला प्रभू चावला ... चोच्या साला ...
पत्रकारिता जगात कुठेच नि:पक्ष नाहीये ... आपल्या इथे जरा जास्त आहे इतकंच

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

कशिद's picture

26 Oct 2008 - 12:04 pm | कशिद

जेवद्या केस झाल्या आहेत.

त्या तुन साहेब ...छान पने बाहेर येतिल..

आनि मग दनक्यात सगल्यानचा समाचार घेतिल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2008 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काशिद साहेबांशी सहमत.

जेवद्या केस झाल्या आहेत.
त्या तुन साहेब ...छान पने बाहेर येतिल..
आनि मग दनक्यात सगल्यानचा समाचार घेतिल...

या निमित्ताने-
आज तक वाल्यांची चांगली खोड मोडली :)

अनामिका's picture

17 Nov 2008 - 12:15 pm | अनामिका

मनसेचं हेच ते वादग्रस्त पत्र

प्रती,

सर्व भैया चॅनेल्समधील मराठी पत्रकारांना... सस्नेह जय महाराष्ट्र

गेल्या दहा महिन्यांपासून आपल्या चॅनेल्सच्या माध्यमातून बातम्यांच्या नावावर जो काही तमाशा आपण दाखवत आहात त्याविषयी आपल्याला रुचेल, समजेल अशा लोकशाही माध्यमातून निषेध व्यक्त करावा म्हणून हा पत्रप्रपंच. मनसेने मराठी माणसांच्या अस्मितेसाठी, स्थानिक भूमीपुत्रांसाठी, लोंढ्यांच्या विरोधात जे आंदोलन उभारलं आहे, त्याला बदनाम करण्यासाठी आपण आपल्या वरिष्ठ भैया पत्रकारांसमवेत गळ्यात गळे घालून जे काही चालवलंय, ते आपल्या स्वत:च्या मनाला पटतं का? बिहारमध्ये रेल्वेगाडी जाळणाऱ्यांचा उल्लेख छात्र, असा केला जातो आणि मुंबईतील आंदोलकांचा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक 'राज के गुंडे,' असा केला जातो. मराठी माणसांच्या भावना आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देशासमोर मांडायला हव्यात.

आज या आंदोलनात आपण आपली भूमिका योग्यपणे बजावली नाही तर महाराष्ट्राच्या भावी पिढ्या आणि महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

तूर्तास एवढेच...
.....................

पत्रकारांमधे फूट पाडण्याचे उद्योग

टीवी जर्नलिस्ट असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून मी या पत्राचा निषेध करतो. भैया चॅनलमधील मराठी पत्रकार हा उल्लेख अत्यंत आक्षेपार्ह आहे. असं पत्र पाठवून टीवी पत्रकारांमधे फूट पाडण्याचे उद्योग होताहेत, हे अयोग्य आहे. पत्रकारांची बांधिलकी सर्वप्रथम त्यांच्या बातमीशी असते, इतर कशाशीही नाही. टीव्ही पत्रकार राज ठाकरे यांच्याबाबत आकसाने बातम्या देतात, हा आरोप गैरलागू आहे. पत्रकार त्याला दिसणारी आणखी एक बाजू मांडत असतो, त्याकडे डोळेझाक करून अशा स्वरूपाचं पत्र लिहिलं जात असेल, तर ते खेदजनक आहे.

- प्रसाद काथे (एनडी टीवी इंडिया)
............................

मनसेने आम्हाला पत्रकारिता शिकवू नये

प्रत्येक राजकीय पक्षाची जशी राजकीय भूमिका असते, तशीच प्रत्येक टीव्ही चॅनलचीही एक संपादकीय भूमिका असते. राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष त्यांच्या मनासारखे वागणार, नोकरीसाठी आलेल्या बेरोजगार तरुणांना मारहाण करणार, हिंसाचार करणार. त्यांच्या या अशा अतिरेकामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली आहे. हिंसाचार करताना आम्हाला विचारलं होतं का? मग, आता आम्ही पत्रकारिता कशी करावी, हे मनसेने आम्हाला शिकवू नये.
जय हिंद, जय महाराष्ट्र...
- रवींद्र आंबेकर (आयबीएन ७)

मुळ बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3720289.cms
तसेच याच विषयावर अजुन एक बातंमी पण जरा वेगळी http://www.saamana.com/2008/Nov/17/Link/pradeshik3.htm

"अनामिका"

धम्मकलाडू's picture

17 Nov 2008 - 5:29 pm | धम्मकलाडू

हिंसाचार करताना आम्हाला विचारलं होतं का? मग, आता आम्ही पत्रकारिता कशी करावी, हे मनसेने आम्हाला शिकवू नये.

शाब्बास!!!!!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"