Skip to main content

सिव्हिल इंजिनीअरिंग : मदत हवी आहे.

सिव्हिल इंजिनीअरिंग : मदत हवी आहे.

Published on 21/02/2018 - 15:09 प्रकाशित
माझ्या भावाने M.E (Civil- Construction Management) केले आहे . त्याचबरोबर त्याने सिविल क्षेत्राशी संबधीत काही सर्टिफिकेशन पण केली आहेत. आता सध्या तो जॉब सर्च करत आहे. परंतु ज्याप्रकारे आम्हा IT वाल्यांना naukri, shine, monstor आणि इतर करिअर साईट्स चा फायदा होतो तसा त्याला होताना दिसत नाहीये. खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला कंपन्यांचे किंवा रिक्रुटर्स चे फोन किंवा ई-मेल येत नाहीत. जे येतात ते मार्केटिंग आणि सेलिंग चे असतात. त्याला मध्यंतरी बेंगलोर मधून ऑफर आली होती पण घराच्या काही अडचणी मुळे सध्या तो पुणे सोडू शकत नाहीये. त्याचा हा strugle पाहवत नाहीये. तो एक हुशार मुलगा असून मला खात्री आहे कि जर संधी मिळाली तर त्याचे तो सोने करेल. पण त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी च मिळाली नाही तर त्याच्या टॅलेंट चा काय उपयोग. मी स्वतः गेले ८-९ वर्षे IT क्षेत्रात काम करत असल्याने त्याला मी हि जास्त मदत करू शकत नाहीये. कोणी मिपाकर या मध्ये मला मदत करू शकेल का. जर कोणी मिपाकर सिविल क्षेत्राशी संबंधित असेल तर कृपया मला तुमचा EMAIL ID किंवा PHONE नंबर व्यनि करू शकाल का? सध्या त्याने काम करून मला पैसे आणून द्यावेत असा माझा हेतू नाहीये. त्याला खूप चांगला पगार त्याला मिळावा अशी हि अपेक्षा नाहीये. पण स्वतःला आता विद्यार्थी दशेतून बाहेर काढून आपले व्यावसायिक जीवन सुरु करावे हीच एक भाऊ म्हणून अपेक्षा आहे. "रिकामे मन हे सैतानाचे घर " असे कोणीतरी म्हणलेले आहे त्यामुळे त्याने आता आणखी दिवस वाया न घालवता आता आपल्या आयुष्यातील पुढील टप्पा गाठावा असे मोनोमन वाटते. त्याला यामध्ये मी moral support शिवाय काहीहि करू शकत नाहीये. कारण माझे आणि त्याचे क्षेत्र पूर्ण पणे वेगळे आहे. इथे कोणी सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्राशी निगडित जे मिपाकर आहेत ते काही मदत करू शकतील का ???

याद्या 2314
प्रतिक्रिया 5

M.E (Civil- Construction Management) शिक्षण चांगले झाले आहे - १) आता पीजी केलेच आहे तर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लेक्चलर /सहायक प्रोफेसर अशा पोस्ट असतात, यांची भरती साधारण मे ते सप्टे या काळात जास्त प्रमाणात होते , तिकडे लक्ष ठेवा २) कन्स्ट्रकशन मधील लिमिटेड कंपन्यांच्या वेबसाईटवर जावून बघा , ब-याचदा त्यांना आवश्यकता असते पण प्रत्येक वेळी जाहीरात देवूनच भरती करत नाहीत , ऑनलाईन प्रयत्न करत रहा. ३) एमपीएससी अंतर्गत एम ई /एम टेक बेसवर असि. प्रोफेसर च्या ऑनपरिक्षा घेण्यात येतात , मागची २०१५ ला झाली होती , तशीच इंजिनिअरच्याही पोस्ट साठी असतात , पुढे येईल वाट पहा , ऑनलाईन सर्च करत रहा ४) प्रत्यक्ष साईट्वर काम करण्यासाठी अनुभव हवा तिथे शिक्षण एवढे महत्वाचे नसते, मिळेल तो छोटा मोठा जॉब करायला चालू करा , अगदी मी एम ई आहे तर मला एवढा पगार पाहिजे या भ्रमात राहू नका ५) धमक असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग, माहापालिका जिल्हा परिषद येथे ठेकेदार म्हणून नोंदणी करा , सरकारी कामे घ्या आणि व्यवसाय सुरु करा अवघड काही नसते हे त्याच्या डोक्यात घाला, जय माहिश्मती

Kiran Kumar Yani paryay kup changale sangitale ahet. M.E (Civil- Construction Management) Zhale ahe, ahi private company madhe kam karache asel tar, project planning & cotroll madhe sudha prayatna karu shakata. Building construction madhe nahi, pan prower plan construction & oil and gas construction madhe, Company like, Gama, Black and veatch, Mott MacDonald Global engineering, Aker solutions, Ashya ku sarya companya ahet pune ani Mumbai madhe.