Skip to main content

स्वराज्याचे शिलेदार

लेखक खिलजि यांनी सोमवार, 19/02/2018 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
तोबरे भरुनी निघाले सारे स्वराज्याचे शिलेदार शिवशाहीचा घोष दुमदुमे मांडला झेंड्यांचा बाजार भगवे निघाले , नभी फडफडले उद्या निघतील हिरवे न लाल धर्मावरून पेटतो इथे जहालांसंगे मवाल जर द्याल इजाजत करतो इथे मी, तुम्हांसी एक सवाल धर्म वेगळे मान्य मलापण रक्त का साऱ्यांचे लाल ? भगवा मनात माझ्या भगवा तनात माझ्या सोनेरी तेज जो देई तो सूर्यही भगवा माझा सिद्धेश्वर विलास पाटणकर C
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1479
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया