म्हातारपणाआधीची प्रतिज्ञा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
जेंव्हा कधी दुखणी मागे लागतील
तेंव्हा लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पीडणार नाही
त्यांची त्यांना कामं आहेत, माझी मी वेळेवर औषधं घेईन
किती वेळा ‘जावं’ लागलं, चर्चा करणार नाही
माझ्या दुखण्याची काळजी घेणारे आहेतच
त्यांचा मान ठेवेन, पण भार होणार नाही
गरज असेल तेंव्हा हक्काने मदत मागेन
पण नावडता म्हातारा होणार नाही!
फोन केला कुणाला तर मी कोण ते आधी सांगेन कोणाशी बोलायचंय ते सांगेन, ‘कोण बोलतंय’ विचारणार नाही ‘एकच मिनिट वेळ घेतो, वेळ आहे ना?’ असं विचारून कामातल्या लोकांचा अर्धा-पाऊण तास वेळ खाणार नाही हल्ली लोकांना संदेशवहनाचे अनेक मार्ग आहेत अवचित ऐकलेल्या दु:खद वार्ता मुद्दाम ‘इकडून तिकडे’ सांगणार नाही घरच्यांच्याही कमिटमेंट्स असू शकतात, चक्कर टाकू इच्छिणाऱ्या भल्या मित्रांना ‘लागल्या फोनवर’ ‘जेवायलाच या’ म्हणणार नाही घरातल्यांनी माझंही मन राखण्याची अपेक्षा असेलही पण त्रासदायक म्हातारा होणार नाही!
पुरूषांचं टेस्टेस्टेरॉन, स्त्रियांचं इस्ट्रोजेन कमी होत जाणं हे जीवशास्त्रीय सत्य आहे त्या कुबड्यांचा आधार घेऊन चिडचिड, वैफल्याकडे जाणार नाही अगदी तिशी-चाळीशीतल्याही उत्साहाने क्रिकेट, बॅड्मिंटन आता झेपणार नाही वेळ बदलली आहे, खेळ बदलेन, रोज दोनदा चालेन, बसून खाणार नाही तारुण्याचं स्टेशन एकदाच येऊन जातं, ते गेलं, हे विसरणार नाही वयानुरूप स्वत:ला बदलेन, वयाविपरीत वागणारा म्हातारा होणार नाही
आदराचा आधार-हात चुकूनही झिडकारणार नाही पण शक्य तोवर स्वावलंबी राहीन, सतत लाडाची अपेक्षा करणार नाही सूचवणं आणि हट्ट धरणं यातला फरक लक्षात ठेवेन माझंच ऐकावं अशी अपेक्षा ठेवणार नाही नेहमी स्वत:ला सांगेन "Grow grey gracefully" अनुभव असलाच तर दोनच उपदेशपर शब्द बोलेन हेकट, दुराग्रही म्हातारा होणार नाही
चित्रपट, नाटकं, कविता, पुस्तकं राहून गेलेली आहेत शक्य असेल तेंव्हा आस्वाद घेईन 'माझाच चॅनेल लावा' म्हणत रिमोट हडपणार नाही शक्य तिथे सहजीवनाची कास धरेन पण एकट्यानेही मनमुराद आनंद लुटेन इतरांच्या मर्यादा सांभाळून स्वतंत्र जगेन कडवट, एकाकी म्हातारा होणार नाही
गात्रं यथावकाश थकतीलच, तरीही माझ्यायोग्य कामं असतीलच ती आनंदात करेन, उपयोगी ठरेन निरुपयोगी म्हातारा होणार नाही क्षुद्र राजकारणी, वाढते कर, महागाई, हे असतीलच बीभत्सता, रोग, कंप्यूटर व्हायरसेसही वाढतील केवळ कुंपणावरून टीका करण्यापेक्षा बदलाचा प्रयत्न करणारा माणूस होईन "काय दिवस आलेत?" म्हणणार नाही कुरकुऱ्या म्हातारा होणार नाही
चारचौघांत सुखावेल इतकंच प्रिय बोलेन स्वार्थासाठी लाळघोटेपणा करणार नाही शक्य तेंव्हा नजरेने आधार देईन दुखवेल असं सत्य बोलणार नाही सखीला, मुलाबाळांना नजर चुकवावी लागेल असं अशोभनीय वर्तन करणार नाही बहुगुणी म्हातारा मी नसेनही अवगुणी म्हातारा होणार नाही!
समस्त मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया
म्हणजे
म्हातारपणी इतक सगळं समजण्याची
म्हातारपणी इतक सगळं समजण्याची
अतिशय सुंदर
चांगलं लिहिलंय,१+
मस्त
मस्त
माझ्या बाबतीत म्हणायचं तर
+१
झक्कास
चला आपण सारे आदर्श बायोकेमिकल
गम्मत बाजूला ठेवू पण मुक्तक
चित्रपट, नाटकं, कविता,
यालाच म्हणतात दात आहेत तर चणे
टीका जेव्हा व्हायची असेल
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Videoसुरेख मनोगत !
ह्यात अजून काय जोडावे?
शतशः सहमत
छान लिहिलंय.
क्या बात है!
मुक्तक आवडले...
आवडलं.
मुक्तक आवडलं..
पटली.