Skip to main content

'फेकू'किस्से

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 27/12/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांना थापा मारायची बालपणापासून सवयच असते. त्यातील काहींची मोठे झाल्यावर ही सवय मोडते तर काहीजण आयुष्यभर फेकुगीरी करत राहतात. समोरचा थापा मारतो हे आपल्याला कळत असतं, परंतू आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीचे वय, पद किंवा परिस्थीती बघून दुर्लक्ष करतो.अडाण्यापासून ते उच्च शिक्षितापर्यंत अशा थापा मारणारे सर्रास आढळतात. गंमत म्हणून मी प्रत्यक्ष ऐकलेले काही फेकू किस्से देतो. किस्सा: १ आमच्या घरी नवीन फ्रिज घेवून माणसं आली त्यांच्या मागे एक पिळदार शरीर असलेला तरुणही आला. तो नेमका बाबांच्या मित्राचा मुलगा होता. बाबांनी त्याला विचारले तू ह्यांच्याबरोबर कसा काय? मी टेंपोवर ड्रायव्हर म्हणून काम करतोय सध्या, बारावी नापासाला कोणती कंपनी नोकरी देतय काका? अनेक कंपन्यांमध्ये प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी मुलाखतीत नापास झालो. हां! एका टायर कंपनीत मुलाखतीत नापास झालो, परंतू त्या साहेबाने माझ्या शरीराकडे बघून एक जॉब देता येईल तुला ,करशील तू? एका दमात आपली कहाणी सांगून बाबांना ओळखायला सांगितलं,काय जॉब असेल सांगा? बाबा - हम्म्म.. अहो उघड्या अंगाने टायर दोन्ही हाताने वर उचलून ८ तास कंपनीच्या गेटसमोर उभं राहण्याचा जॉब होता. किस्सा:२ एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो, लग्नही मुहूर्तावर लागले होते. आम्ही मित्र बाहेर गप्पा मारत असताना आमचा एक इंजिनिअर मित्र रिक्षातून उतरताना दिसला. हा एक नंबरचा फेकू. चार माणसं दिसली की ह्याच्या फेकुगीरीला चेव चढतो. आल्या आल्या त्याची टकळी सुरू. काय रिक्षावाले आहेत इकडचे , अक्षरशः मेंढरांसारखे पॅसेंजर कोंबतात रिक्षात. आमच्या रिक्षाला ट्रॅफिक पोलिसाने अडवले, एकेकाला रिक्षातून बाहेर उतरवले. बारा पॅसेंजर एका रिक्षात पाहून तो पोलिसही आश्चर्यचकित झाला.मी म्हटलं आता ह्या रिक्षावाल्याचं काही खरं नाही. पण कसलं काय त्या पोलिसाने रिक्षावाल्याला त्याच्या समोर सर्व पॅसेंजरला पुन्हा रिक्षात बसवून दाखवायला सांगितले. रिक्षावाल्यानेही थ्री सीटर मध्ये आम्हा बारा जणांना व्यवस्थीत कोंबले. पोलिसानेही खूष होऊन रिक्षाला दंड न करता सोडून दिले. किस्सा: ३ असाच एक मित्र खाजगी कंपनीत कामाला आहे . त्याच्या मते त्याचा बॉस मूर्खच आहे. मालकाचा ट्रक ड्रायव्हर नेहमी गाडी दुरुस्तीच्या नावाखाली मालकाकडून पैसे घेत असतो. गाडी पंक्चर झाली, गेअर तुटला, पाटा तुटला काहीही कारण सांगून मालकाला लुटत असतो. एकदा तर त्याने गाडीचा 'मोसम तुटला ' असं सांगून मालकाकडून पैसे वसूल केले होते. वरील प्रत्येक किस्से मी आतापर्यंत ३-४ व्यक्तींकडून अगदी असेच्या असे अगोदर ऐकलेले आहेत. त्यामुळे खरंच असे किस्से घडले असतील का अशी शंका येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4483
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

रोचक आहेत किस्से. या निमित्ताने फोका तानणे हा वाकप्रचार आठवला. बाकी शीर्षकामुळे हा वेगळाच धागा वाटला होता ;-).

In reply to by टवाळ कार्टा

फक्त 20 लाखच हो. 25 लाख ही तुमची मनकी बात आहे. बाकी धाग्यातले किस्से अगदीच पाणचट वाटले.

In reply to by सतिश गावडे

बाकी धाग्यातले किस्से अगदीच पाणचट वाटले.
+१ बबन तांबेंचा धागा मस्त आहे त्यापेक्षा..

In reply to by सतिश गावडे

नजर एका दिशेला आणि बाण दुसऱ्याच दिशेला मारलाय त्यामुळे असेल.

फेकु ( फोकाडे ) लोकांचे किस्से मस्तच . " काय अंटसंट फोका मारुन राहिला बे ? " असेच यांना म्हणले पाहिजे .

हे तर काहीच नाही. मी शाळेत असताना मास्तरने असे फेकले होते. "अमेरिकेत population कंट्रोल करण्यासाठी माणूस 60 वर्षाचा झाला की त्याला गोळी घालून ठार मारतात."