Skip to main content

शंका/समाधान.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 03/12/2017 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
शंका/समाधान. * या विशाल अवनी वर्ती, प्रशांत सागर वसतो त्यास भेटण्या सरिता का धावते जणू अभीसारीका? * त्या लाल कमल पुष्पात गोड मकरंदाची रेलचेल आत भ्रमर कैद होतो रात्री तिथेच का रमतो? * गगनात चंद्रमा हसतो धवल प्रकाश पसरतो ते मनोहर दृश्य बघुनि का सागर उफाळतो? * ति फुले रंगी बेरंगी मादक रस गंधाने फुलती. त्या रान पुष्पा वरती.. का भ्रमर असा घुटमळतो? * त्याच्याच नाभी कमलांत कस्तुरी गंध दरवळतो तरीही तो कस्तुरी मृग का शोध घेत फिरतो? * असे कितीक गोड प्रश्न का सतावतात मजला? या शंकांचे समाधान कधी होईल का मजला?? * अश्याच एका कातरवेळी भेटलास तू सजणा तनूत वीज कल्लोळली स्पर्शाने काया मोहरली * घेतलेस मज मिठीत चुंबलेस लाल अधरा सा~या प्रश्नाची उत्तरे दिलीस मज तू प्रियकरा
लेखनविषय:

वाचने 808
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया