✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

स
सचिन काळे यांनी
Sun, 12/03/2017 - 09:47  ·  लेख
लेख
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी. पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते! Making of photo and status : वरच्या फोटोत काय दिसतंय ते पहा बरं!!? त्यात एक जोडपं दिसतंय ना? त्यांच्या गळ्यात असलेल्या हारावरून आणि एकंदर पेहरावावरून त्यांचं नुकतंच लग्न झालेलं वाटतंय ना? जोडपं जरा गावकडचं असावं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे अभिर्भाव तर किती मजेदार दिसतायत नाही!!? डोक्यावर पदर घेतलेली नवरी कित्ती नाजूक साजूक वाटतेय. तिचे टपोरे डोळे नववधूसारखे बावरलेले वाटतायत. ओठांचा केलेला चंबु तर खासच दिसतोय. आणि चेहऱ्यावर रुळणार्या बटेने तर नागिणीसारखे वेटोळे घेतलेत. तसेच डोक्याला मुंडासे बांधलेल्या नवरदेवाच्या जाड भुवया, सुपासारखे कान, आणि फुगीर नाक त्याच्यातील राकटपणा दर्शवितोय. हा फोटो पाहून मला असं वाटलं, की नुकतेच लग्न झालेले त्यातील नवरा नवरी हनिमूनला जाताना कोणाचातरी निरोप घ्यायला दोन क्षण थांबलेत. बस्! मी ठरवलं की आपण ह्या त्यांच्या निरोप घेण्याच्या प्रसंगावरचंच स्टेटस लिहावं. दोघेही गावाकडचे वाटत असल्यामुळे स्टेटसची भाषा मी मुद्दाम गावरान निवडली आणि स्टेट्सच्या सुरवातीलाच पहिलं वाक्य लिहिलं "येऊ का आता?" आपण निरोप घेताना म्हणतो ना अगदी तसं! पुढे लिहिलं "लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी." या वाक्यावरून वाचकांना मी कन्फर्म करून दिलं, की या जोडप्याचं नुकतंच लग्न झालंय आणि ते खंडाळ्याला हनिमूनला जायला निघताना आपला निरोप घ्यायला थांबलेत. आता मी त्या जोडप्यांकरिता 'खंडाळा' हेच हनिमूनचं ठिकाण का निवडलं असावं? कारण मला स्टेटसमध्ये जराशी गंमत आणायची होती. खंडाळा म्हटलं तर आपल्याला काय आठवतं बरं? अगदी बरोब्बर!! आपल्याला 'आमिर खान'चं तुफान गाजलेलं 'आती क्या खंडाला?' हे गाणं आठवतं. बस् ! मी त्या गाण्याचा आणि आपल्या स्टेटसचा संबंध लावून टाकला. आणि नवरदेवाच्या तोंडी उपहासाने एक वाक्य टाकून दिले, की "पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!" म्हणजे पहा! नवरदेव किती खोडकर आहे ते!! त्यालाही माहितेय ते आमिर खानचं गाणं आणि त्यातील गंमत. इथे झालं की मग आपलं फोटोवरून स्टेटस तयार! फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश लिहिलेले नसतानाही मी त्या फोटोला अजूनच मजेदार करून टाकलं. प्रत्येकाचा एकाच गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. तुम्हीही तुमची कल्पनाशक्ती वापरून ह्याच फोटोवर एक संपुर्ण वेगळं स्टेटस लिहू शकता. बघा बरं प्रयत्न करून. पण ते मला कळवायला विसरू नका हं! --- सचिन काळे. माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
3496 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मस्तच

सिद्धार्थ ४
Mon, 12/04/2017 - 19:31 नवीन
लै भारि
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सचिन काळे
Mon, 12/04/2017 - 20:28 नवीन
@ सिद्धार्थ ४, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

239 वाचने होऊनही फक्त एकच

प्रसाद_१९८२
Mon, 12/04/2017 - 20:43 नवीन
239 वाचने होऊनही फक्त एकच प्रतिक्रिया? तीही माझी व लेखकाची सोडून याचा अर्थ तुमच्या ह्या "जिलब्यां"ना इथले सदस्य वैतागलेले दिसतायत. :))
  • Log in or register to post comments

...

सचिन काळे
Mon, 12/04/2017 - 22:00 नवीन
@ प्रसाद १९८२,
239 वाचने होऊनही फक्त एकच प्रतिक्रिया?याचा अर्थ तुमच्या ह्या "जिलब्यां"ना इथले सदस्य वैतागलेले दिसतायत.
@ प्रसादजी, पुडीत जिलबी आहे हे माहीत असूनही 239 लोकांनी पुडी खोलून पाहिली, यातच सर्व आले नाही का? खाली वाचा, सतीश गावडेजी किती आवडीने जिलबीचा आस्वाद घेतायत ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

खडकी दापोडी वाकड बोपोडी

सतिश गावडे
Mon, 12/04/2017 - 21:07 नवीन
खडकी दापोडी वाकड बोपोडी तळेगांव कान्हे की रावेतला कुटं कुटं जायाचं हनिमुनला राया कुटं कुटं जायाचं हनिमुनला
  • Log in or register to post comments

हा! हा! हा!

सचिन काळे
Mon, 12/04/2017 - 22:03 नवीन
@ सतीश गावडेजी, झक्कास गाणे आठवले तुम्हाला! हा! हा!! हा!!
  • Log in or register to post comments

आपणच मागे म्हटल्याप्रमाणे..

अनन्त्_यात्री
Tue, 12/05/2017 - 11:41 नवीन
यापुढे माझं नांव घेताना लोकं बोलतील "सचिन काळे म्हणजे ओ तेच हो! हा! हा!! हा!! वाले!!
  • Log in or register to post comments

...

सचिन काळे
Tue, 12/05/2017 - 12:33 नवीन
अगदी बरोबर!! हा! हा!! हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

भारी :)

विनिता००२
Tue, 12/05/2017 - 15:25 नवीन
भारी :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सचिन काळे
Tue, 12/05/2017 - 19:45 नवीन
@ विनिता००२, प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनिता००२

लय भारी .....

नितीन पाठक
Wed, 12/06/2017 - 15:45 नवीन
मस्त. मजा आली. अजून येउ द्या.
  • Log in or register to post comments

आभार!

सचिन काळे
Wed, 12/06/2017 - 16:26 नवीन
@ नितीन पाठकजी, आपण देत असलेल्या प्रोत्साहनाकरिता आपले फार फार आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक

खूप छान

कपिलमुनी
Wed, 12/06/2017 - 16:37 नवीन
तुम्ही आधी फोटो टाकून वाचकांकडून स्टेट्स मागवू शकता आणि नन्तर तुमचे स्टेट्स टाका
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सचिन काळे
Wed, 12/06/2017 - 18:37 नवीन
@ कपिलमुनीजी, माय फ्रेंड!! आपणांस खूप सारे धन्यवाद!
तुम्ही आधी फोटो टाकून वाचकांकडून स्टेट्स मागवू शकता आणि नन्तर तुमचे स्टेट्स टाका
आपण खूप छान कल्पना मांडलीत. हा एक फारच सुंदर उपक्रम होईल. पण आपला आदर राखून आपणांस सांगावेसे वाटते, की असा उपक्रम माननीय संयोजकांनीच राबविणे योग्य राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हगणदारीमुक्त गाव वैगरे चा

सूड
Wed, 12/06/2017 - 18:51 नवीन
हगणदारीमुक्त गाव वैगरे चा फोटो आहे का?
  • Log in or register to post comments

...

सचिन काळे
Wed, 12/06/2017 - 18:57 नवीन
@ सूड, नाही हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रविवारची वाट बघत आहोत.

सिद्धार्थ ४
Fri, 12/08/2017 - 14:32 नवीन
आता अजिबात धीर धरवत नाही. काय असेल बरे ह्या वेळी?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा