चिकन ६५ का ब्वा??
बऱ्याच वेळा चिकन ६५ घरी केले गेले आणि सारखा मनात प्रश्न घोळत होता या रेसिपीला चिकन ६५ का ब्वा म्हणत असतील ?? उत्सुकतेने गूगल काकाकडे काही माहिती शोधली तर बरीच रंजक माहिती मिळाली.
1) पुर्वीच्या साऊथ इंडियन लोकांमध्ये 'कोण किती मिरच्या खातो' याच्यावरून चुरस असायची. यातूनच एका हॉटेल व्यावसायिकाने एक डिश बनवली. त्या डिशमध्ये एक किलो चिकनमध्ये ६५ मिरच्या असायच्या. म्हणून चिकन-६५ !
2) ही डिश अस्तित्वात आली, त्यावेळी तिला आधी काही दिवस लोणच्यासारखं साठवून ठेवलं जायचं आणि मगच सर्व्ह केलं जायचं. साठवून ठेवण्याचा हा कालावधी ६५ दिवसांचा असायचा आणि म्हणून चिकन-६५ !
3) डिशमध्ये चिकनचे ६५ पीस असायचे आणि सोबत त्यात मसालेही बरोब्बर ६५ प्रकारचे वापरले जायचे म्हणून चिकन-६५ !
4) आणि आता हा शेवट . या डिशला चेन्नईमधल्या सुप्रसिद्ध बुहारी रेस्टॉरंटने सर्वप्रथम १९६५ मध्ये बनवलं होतं. या सालावरूनच त्यांनी या डिशला चिकन-६५ हे नाव दिलं. याच रेस्टॉरंटने नंतर चिकन -७८, चिकन-८२ आणि चिकन-९० या डिशही आणल्या. ज्या अनुक्रमे १९७८, १९८२ आणि १९९० साली तयार करण्यात आल्या होत्या. पण यात लोकप्रिय झाली ती चिकन-६५.
आणि अजून काय काय किस्से असतील तर जरूर सांगा आणि आता मी बनवत असलेली चिकन ६५ ची रेसिपी
साहित्य
बोनलेस चिकन १/२ किलो ,३ चमचे दही , १ चमचा आले लसूण पेस्ट , १ चमचा गरम मसाला , १ चमचा dhane pavder , १/२ चमचा हळद , २ चमचा लाल तिखट , १ अंडे , मीठ ( आपल्या ब्लड प्रेशर नुसार / ब्लड प्रेशर भीतीप्रमाणे ) मी पाऊण चमचा घेतलेल .हे सर्व एका भांड्यात मस्तपैकी फेटा नंतर यात चिकन चे तुकडे टाका मिक्स करा १/२ तास फ्रीझ मध्ये ठेवा या वेळात do whatever you want to do man !!!
नंतर फ्रीझ मधून काढून तळा .
तळताना २ मिनिटे उच्च ज्योत ५ मिनिटे मंद ज्योत आणि पुन्हा २ मिनिटे उच्च ज्योत मस्त कुरकुरीत होतात आणि आता बसा माफ करा खा !!!
४ क्रमांकाची गोष्ट
कांदा ??
In reply to कांदा ?? by पगला गजोधर
छे!!! किसलेला कोबी देतात त्या
धागाकर्ते माफ करा मला, पण एक
In reply to धागाकर्ते माफ करा मला, पण एक by पगला गजोधर
धन्यवाद सुचनेबद्दल
६५
In reply to ६५ by सुनील
90 ml का ब्वा
In reply to 90 ml का ब्वा by सत्याचे प्रयोग
त्याऐवजी,
पदार्थसूची क्रमांक -६५.
In reply to पदार्थसूची क्रमांक -६५. by प्रभाकर पेठकर
हे कारण पटतंय...