कोळंबी मसाला ..
मी शुद्ध शाकाहारी न नवरा पक्का मांसाहारी आहे :( म्हणून असे उपदव्याप करायला शिकतेय हळूहळू
कोळंबीला कधी हात हि न लावलेली मी ,शेंडा कोणता न बुडुख कोणते न कळणारी मी, हे सहज बनवू शकते तर कोणीही बनवू शकेल नक्किच :)
साहित्य :
सुके प्रॉन्स / कोलंबी ( मी एक डिश भर घेतल्यात )
३ सुक्या बेडग्या मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
आले तुकडा एक इंचभर
चिंच एक बुटुक
ओला नारळ - १ वाटी
टॉमॅटो बारीक चिरून -अर्धी वाटी
कांदा बारीक चिरलेला - अर्धी वाटी
हळद अर्धा छोटा चमचा
लाल तिखट अर्धा छोटा चमचा
कोथिंबीर सजावटीला
मीठ चवीपुरते
कृती :
ड्राय कोलंबी तव्यावर कोरड्या भाजून घ्याव्यात , त्याचे डोके खुडून टाकावे
आता मिक्सर मध्ये मिरच्या ,नारळ , लसूण , आलं , चिंच यांचं थोडं पाणी घालून वाटण करून घ्याव
कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात कांदा परतावा कांदा सोनेरी झाला कि टॉमेटो परतून घावा .तेल सुटू लागलं कि लाल तिखट , हळद न चवीनुसार मीठ घालावं परतून घेऊन त्यात वाटण घालून एकजीव करावं न मग त्यात भाजल्या कोलंबी घालून मिश्रण हलक्या हातानं एकजीव करावं न कोथिंबीर घालून सजवावे :) शंपी रेसेपी :) फोटू काढूपर्यंत नवर्यानी अर्धी डिश फस्त केली होती , म्हणून कशी बशी अर्धी वाटी का होईना फोटॊपूर्ती उधार घेऊन संपवलं एकदाच :)
वाचने
23188
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह, मुलगी शिकली प्रगती झाली.
पिवशे!
भारी लिवलंय !
ते दिसतंय छान पण पिश्वे , काय
है हे सृजा बस क्या, कोलम्बी
In reply to ते दिसतंय छान पण पिश्वे , काय by स्रुजा
छान!
In reply to है हे सृजा बस क्या, कोलम्बी by पियुशा
:) :)
In reply to छान! by इशा१२३
मी तर म्हणते मुलाला दत्तकच घे
In reply to :) :) by स्रुजा
पियुशा, तू अगदी टिपिकल बायको
उखाणा मी सांगतो ....
In reply to पियुशा, तू अगदी टिपिकल बायको by रेवती
धन्य ----^------- :) :) :)
भारी दिसतय
उत्तम रेसिपी, पहिल्यांदाच
सुके प्रॉन्स / कोळंबी नव्हे..
येस्स! कांद्यातली करंदी/जवळा
In reply to सुके प्रॉन्स / कोळंबी नव्हे.. by डॉ सुहास म्हात्रे
सुकट पाण्यात दहापंधरा मिनिटं
In reply to येस्स! कांद्यातली करंदी/जवळा by निशाचर
सुकट पाण्यात दहापंधरा मिनिटं भिजत घालून हलके पिळून मग फोडणीला टाकल्यास नीट शिजते.+१ भाजलेल्या सुकटीची चव न भाजलेल्या सुकटीपेक्षा फार वेगळी असते. चटणी करायला भाजलेली सुकट ब्येष्ट. पण, इतर पदार्थांत भाजून मूळ सुकटीची चव मारून टाकणे शक्यतो टाळावे. केवळ कांदा व मसाल्यासह तव्यावर परतलेल्या सुकटीत थोडेसे वांग्याचे बारीक तुकडे (व थोड्याशा बटाट्याच्या पातळ काचर्या) टाकल्यास मस्तं लागतात.+१ अगदी, आमच्याकडे पण, बाकी
In reply to येस्स! कांद्यातली करंदी/जवळा by निशाचर
निशाचर न म्हात्रे सर तुमच्या
काय आठवण काढलीत डॉक! जवळा,
घोकअता
असे म्हणणे बरोबर नाही हो
In reply to घोकअता by गामा पैलवान
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही.
In reply to असे म्हणणे बरोबर नाही हो by कविता१९७८
पियुडे अग काय हे... डायरेक्ट
ताज्या मच्छीचा बाजार जवळ
In reply to पियुडे अग काय हे... डायरेक्ट by विशाखा राऊत
ताज्या मच्छीचा बाजार जवळ असताना सुकी कशाला करतेस?असं कसं, असं कसं ?! उत्तम प्रत असलेली सुकट, सोडे आणि बोंबील वापरून सुगरणीने बनवलेले पदार्थ ताज्या मासळीच्या पदार्थांना तोडीस तोड असतात बरं का ! अर्थातच, दोन्ही आपापल्या जागी एकूण फर्मासच :)हो पण नवशिक्याने डायरेक्ट
In reply to ताज्या मच्छीचा बाजार जवळ by डॉ सुहास म्हात्रे
म्हणूनच कौतूकाने थोडा क्लास
In reply to हो पण नवशिक्याने डायरेक्ट by विशाखा राऊत
धन्स गो विशाखा, मी शिकतेय ग
सुकट ,जवळा आणि तांदळाच्या भाकऱ्या
ह्म्म
आहा मस्त पाकक्रुती.
पिवशे, ह्यांना प्रॉन्स म्हणत
सुकी (कोरडी) सुकट
चित्रांना जोडणार्या साखळ्या
पिक्चर लिन्क्स आर डेड. डेड
In reply to चित्रांना जोडणार्या साखळ्या by आनंदी गोपाळ
पिक्चर लिन्क्स आर डेड.डेड नाही एक्सपायर्ड. फरक आहे ;) :) लेखिकेने बहुतेक (अ) चित्रे अल्बममधून काढून टाकली आहेत, (आ) अल्बम डिलीट केला आहे, (इ) चित्रे एडिट केली आहेत, किंवा (ई) चित्रांचा पब्लिक अॅक्सेस काढून टाकला आहे.गणेशा