अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग २
नंतर आम्ही चिडिया टापू भागाकडे जात होतो. हा भाग पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं ,वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही. पण फक्त तेवढच नाहीये, ह्या सगळ्याला समुद्र किनार्याची जोड आहे, त्यामुळे समुद्री वैभवही आहे. फोटो बघुन लक्षात येईलच. फुलपाखरं आणि पक्षी क्यामेर्यात कैद नाही करु शकले :( आम्ही फुलपाखरं बघुन थांबलो एके ठिकाणी तर ती आमच्याच अंगावर नाचत होती. फार मजा आली अशी अंगा खांद्यावर बागडुन उडणारी फुलपाखरं बघताना.
वाटेत एके ठिकाणी आम्ही आमच्या शिदोर्या सोडुन खायला बसलो, तिथे काही पोरं मासे पकडत होती आणि कितीतरी जेलीफिश कार्टून सारखे बागडत होते. खायचं सोडून त्यांनाच बघत बसलो आम्ही. अश्या वेळी मी नेहमी एक गोष्ट पाळते आणि इतरांनाही सांगते, माश्यांना किंवा इन जनरल कोणत्याही जंगली प्राण्याला तुमच्याकडचा खाऊ आयुष्यात देऊ नका, आणि पर्यावरणाचे /निसर्गाचे नियम पाळा. अंदमानी लोक कसोशीने हे नियम पाळतात. आपण तिथे जाऊन तिथला तोल बिघडवु नये.
मग आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो तर एक बॉटॅनिकल झूलोजिकल गार्डन लागलं. तिथे अंदमानी मगरी , घोरपडी , अस्वलं, अंदमानी पक्षी त्यांच्या हॅबिटॅट मधे स्वच्छंद बागडताना बघितले, प्रत्येक झाडावर त्याचं सायंटिफिक नाव लावलं होतं. तिथुन बाहेर पडेस्तो जोरदार पाऊस आला. खूप भिजले पावसात. अंदमानमधला पाऊस खूप बेधुंद असतो, कोणत्याही वेळी कोणत्याही दिशेने कितीही वेळ पाऊस कोसळु शकतो. मुसळधार पाऊस म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला. मग तिथुन अजुन थोडं पुढे मुंडा पहाड च्या पायथ्याला मुंडा पहाड बीच वर पोचलो. तिथे थोडा क्लिकक्लिकाट केला मग सुरक्षित क्षेत्रात आंघोळ केली. कपडे बदलायला आणि शावर घ्यायला सरकारने व्यवस्था केलीय लाकडी घरांची तिथे जाऊन कपडे बदलले आणि पुढल्या वाटेला लागलो.
सुनामीमधे पडलेल्या झाडांचा आता असा उपयोग केला आहे
अंघोळीसाठीचे सुरक्षित क्षेत्र जाळीने मार्क केलय . इथे प्रत्येक बीचवर लाईफगार्ड, पोलीस कंपल्सरी असतातच. आणि अंघोळीसाठी सुरक्षित क्षेत्र मार्क करतात. पर्यटकांनी त्या क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते.
मग आम्ही जिथे गेलो ती जागा माझ्यासाठी स्वर्ग होती. त्या गावाचं नाव मंजेरी . पुर्ण रिजर्व फॉरेस्ट एरिया. तिथे जाण्यासाठी परमिट काढावं लागतं. ही जागा महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक हिस्सा असलेल्या १५ बेटांपैकी एक आहे.
हे मंजेरीच्या वाटेतले फोटो
इथल्या दलदलीत मगरी आहेत
@ मंजेरी फॉरेस्ट चेक पोस्ट.
@मंजेरी जेटी
इथे फॉरेस्ट पोस्ट पासून ७-८किमी आत घनदाट जंगलात ही एक जेटी आहे. आम्ही तिथे गेलो आणि मला परत यायचच नव्हत!! एक तर तिथे अज्जिबात माणसं नव्हती. फक्त आम्ही दोघंच आणि सोबतीला इतका सुंदर निसर्ग. आम्ही पोचलो तेव्हा भरती येत होती तिथे. काय काय नाही पहिलं तिथे? हजारो प्रकारचे जिवंत कोरल्स, आजपर्यंत फक्त डिस्कवरी वर पाहिलेले मासे, मगरीने एका मोठ्या माशाला खातानाचा लाईव्ह शो, माश्यांचे खेळ बापरे!!! शब्दातीत अनुभव होता.
आमचं वाहन
इथुन तृप्त मनाने निघालो तेव्हा ५ वाजले होते. लगेच सुर्यराव पश्चिमेला गुडुप होणार होते . वाटेत कुठेतरी हा सुर्यास्त टिपला .
उद्या महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक भाग असलेलं जॉली बॉय बेट बघायचं अस ठरवुनच गुडुप झालो अंधारात.
क्रमशः
उद्या महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक भाग असलेलं जॉली बॉय बेट बघायचं अस ठरवुनच गुडुप झालो अंधारात.
क्रमशः
वाचने
9082
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
अप्रतिम !
सुरेख!
मस्त
व्वा !
भन्नाट!
भन्नाट!
मस्त माहिती !!
भारीच! जाण्याचा योग कधी येतोय
अंदमान येथील समुद्र नि निसर्ग
धन्यवाद खरेकाका
In reply to अंदमान येथील समुद्र नि निसर्ग by सुबोध खरे
अंदमानला जावेसे वाटत आहे.
मस्त!
सुरेख लेखन आणि अप्रतिम
भन्न्नाट सुंदर दिसतो आहे हा
अंदमान -- एक सुखद स्वप्न. ते
फोटो मेमरी कशी आणि किती नेली
क्यामेराबद्दल विचारताय मला,
In reply to फोटो मेमरी कशी आणि किती नेली by मी कोण
हाही भाग खुप आवडला.
सुंदर.
धन्यवाद!!
जॉली बॉय
जॉली बॉय