प्रवासी वाहतूक नियम कोणासाठी?
शाळेत असताना मित्राच्या सायकलवर डबलसीट बसून शहरातील रस्त्यावर फिरायला मजा वाटायची. असंच एकदा फिरत असताना एका सिग्नलला पोलिसाने आम्हाला अडवलं. सायकलच्या दोन्ही चाकांचे वॉल्व खोलून चाकातील हवा काढून टाकली व वॉल्वची रबरी नळी काढून मित्राच्या हातात दिले. आम्ही दोघे गांगरून पोलिसाकडे बघतच राहीलो. कितवीला आहात तुम्ही? पोलिसाने विचारले. सातवीला, मित्राने सांगितले. मग डबलसीट सायकल चालवू नये हे तुम्हाला शाळेत शिकविले नाही? शाळेत तुम्हाला वाहतुकीचे नियम शिकवले असतील ना? पोलिसाने विचारलं. नाही शिकवलं असं म्हणायची आमची हिम्मत झाली नाही.
शाळेत नागरीक शास्त्रात , रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला, सिग्नलवर लाल दिवा दिसला तर थांबा, हिरवा दिसला तर पुढे जा, झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता पार करा अशा प्रकारचे वाहतुकीचे जुजबी नियम शिकवले होते. सायकल डबलसीट चालवू नये हे शाळेत कधीच शिकवले नव्हते. कॉलेजला गेल्यावर बाईकचं लायसन्स काढताना वाहतूकीचे नियम कळाले. बाईक चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही ह्याची कटाक्षाने काळजी घेतो. वाहतूक पोलिस तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणार्या रिक्षाला दंड करतात किंवा ओव्हरलोड मालवाहतूक करणार्या ट्रकला पकडतात. अर्थात ह्यात चुकीचं असं काही नाही, प्रवाशांच्या व वाहनाच्या सुऱ़क्षिततेच्या दृष्टीने ते योग्यच आहे.
प्रत्येक वाहनांकरता त्या वाहनाच्या क्षमतेनुसार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असते. एसटीच्या साध्या बसला ५२ सीट व १३ की १६ उभ्या प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक केली जाते. सायकल, बाइक, रिक्षा, टॅक्सी,खासगी बसेस ह्यांच्यावर प्रवासी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याचे बघितले आहे , परंतू एसटीवर किंवा सिटी बसवर अशी कारवाई झाल्याचे कधी बघितले नाही.
ह्यावरून मला प्रश्न पडलाय, की एसटी व सिटी बसेसला प्रवासी वाहतुकीचे नियम लागू होत नाही का? प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य आहे का ?
बाईकला आरसा नसल्यास , इंडिकेटर नसल्यास दंड केला जातो. परंतू कित्येक एसटी व सिटी बसेसला हॉर्न,इंडिकेटर , दोन्ही बाजूचे आरसे नसले तरी वाहतूक पोलिस कारवाई का करत नाही?
प्रतिक्रिया
शंका योग्य
+ १
होते कारवाई. गेल्या वर्षी
पूर्वी सायकलींनाही बिल्ले असायचे?
http://www.aisiakshare.com
वाहन आणि music
वाहन आणि music