Skip to main content

भटकत होतो

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 08/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
भटकत होतो. एक डोंगर दिसला. चढत गेलो. हिरवी झाडं पाणी फुलं. उन मरणाचं. झळझळत गेलो. भटकत होतो. बोडकं माळरान. तुडवत गेलो. कुसळं शेळ्या मेंढ्या कुत्री. चप्पल तुटलं. भळभळत गेलो. आभाळाच्या कडेला लावून मी हात बसलो या देवळात मूर्तीच्या गाभाऱ्यात ठोकळाच ठेवलेला ही उदास छटा आता नको आहे हे उनाड पाखरू आता नको आहे ही गंजकी तलवार आता नको आहे जगणं *** वगैरे नेहमीचंच
लेखनविषय:

वाचने 1231
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

यात अजून भर घालून, खास तुमच्या स्टाईलमध्ये, ललित काही होईल वेगळंसं,