✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुस्तकं

म
मितान यांनी
Sun, 04/23/2017 - 09:21  ·  लेख
लेख
पुस्तकं जिवंत असतात. जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो. अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात. काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात. अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात. पुस्तकांना आकांक्षा असतात कधी व्यक्त कधी लपलेल्या.. डोळ्यातून उरात झिरपत राहणाऱ्या... पुस्तकांचीही स्वप्नं असतात स्वप्नांना पोसतात पुस्तकं.. भावनांचे समुद्र कोंडलेले असतात पुस्तकात तुम्ही मुक्त केले की मनस्वी पाखरं होतात त्यांची विचारांचे झरे झुळझुळतात पुस्तकात त्यांना वाट दिली की नदी होते त्यांची कधी गंगा कधी कालिंदी राग दुःख द्वेष असूया मत्सर याची लेणी माणसं जेव्हा पुस्तकांना देतात तेव्हाच ती ते निःसंकोचपणे मिरवतात यात आश्चर्य वाटायला नको कारण त्यांच्यात नसतेच 'मीपण' ! पुस्तकांच्या ढाली करून पुस्तकांच्या भिंतीआडून पुस्तकांच्या खिडकीतून पुस्तकांच्या दुनियेत हळूच बघा तरी पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत. - माया ज्ञानेश जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
धर्म
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
2778 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

खूप छान लिलयस...तरल, हळवे..

सस्नेह
Sun, 04/23/2017 - 09:30 नवीन
खूप छान लिलयस...तरल, हळवे..
  • Log in or register to post comments

_/\_

पैसा
Sun, 04/23/2017 - 09:55 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

क्लास

नंदन
Sun, 04/23/2017 - 11:17 नवीन
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत.
आमेन!
  • Log in or register to post comments

पुस्तकांच्या वाटांवरून नवी

पद्मावति
Mon, 04/24/2017 - 15:01 नवीन
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत. आहा...क्लास्स!!
  • Log in or register to post comments

सुंदर!

रुपी
Tue, 04/25/2017 - 02:07 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

_/\_

स्मिता चौगुले
Tue, 04/25/2017 - 10:19 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा