(नारंगीभारल्या रात्री होत्या)
लेखनविषय:
काव्यरस
सुरापरीच्या वाटेवरती, गटारांगण अंथरले होते...
गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते!
मी मोकळा..त्यावर संत्रा, नारंगी नखरे,कातिल चखना...
फक्त एवढे कळले..नंतर, रोम-रोम मोहरले होते!
विरघळलेला बर्फ गारसर,पुन्हा एकदा फसफसलेला...
तोच चखना अलगद खिश्यात माझ्या लपवलेला होता
मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर?
त्याच्या निरागस प्रश्नावरही, चार थेंबे नारंगी उडवले होते
घोट घेतानाही क्षणभर, ग्लास अडखळला तेव्हा...
पुन्हा नव्याने चुंबण्यास, ओठ माझे थर थरले होते
मूळ कवीची क्षमा मागतो, थोडा बहकलो होतो
शब्द बदलले एक नवे काव्य गहन रस उमजले ;)
वाचने
2427
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मस्त!!
In reply to मस्त!! by प्रीत-मोहर
भरा!!!
लैच टुकार विडंबन.
In reply to लैच टुकार विडंबन. by अभ्या..
किमान टुकार तरी आहे ;)
विषय वेगळा पण तेवढीच चपखल
किक नीट नाही-बसली! ;)
जम्या नय