Skip to main content

?? नाव सुचले नाही ??

लेखक इना यांनी गुरुवार, 30/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
काळरात्र सरताना उमलते पहाट अनवाणी किती युगांच्या वेदनांची गातात श्वास गाणी सोडले मी जिथे स्वतःला दूर तो गाव आहे प्रवास कसला? आता नुसती फरफट आहे कोण इथे जन्मास आला घेऊन खरा चेहरा? नितीमत्ता मिरवीत आहे मुखवटयांचा आसरा मोहाच्या झाडाखालीच असते सदैव येणेजाणे चार पावसाळे पाहिल्यांचे आहे अनोळखी वागणे शून्य शब्दात व्यक्त होणे आजची निकड आहे बोलक्या लोकांना आता 'समजून' घेणे आहे!
लेखनविषय:

वाचने 589
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया