इथेच जमवा कंपू, इथेच टाका तंबू !
प्रेर्ना - पिरा तैं चा धागा
मूळ कविता - गदिमा
चला जाउ द्या पुढे हि चर्चा
अजुनी नाही धागा संपला
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !
आणखी थोडा व्हिजा वाढवू
काही वर्षं अजून थांबू
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !
नाही गर्दी नाही प्रदूषण
जीवन इथले असे विलक्षण
उतरा ओझी, विसरा नाती
डॉलर पळभर चुंबू
इथेच टाका तंबू !
घट्ट धरूया आपली संस्कृती
सण वार अन रितिभाती
ढोल ताशे जोरात वाजवू
हिरव्या नोटा छापू
इथेच टाका तंबू !
नॉस्टलजीक कधी होऊ
आंजा वरती धागे काढू
हिअर ऑर टू गो असे संभ्रमु
भारत प्रेमाची नशा झिंगु
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !
मिस यू मिस यू
मम् मातृ भू
मिस यू मिस यू
मम् मातृ भू
अधे मध्ये गळे काढू
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !
जय मराठी जय आम्रविका
:)
राहता अहमदनगर जिल्ह्यात आहे.
मी परावलंबी पारपरग्रहखतावर
वा! ३० सेकंद टाईमपास झाला!
आता अजून हे राहीलंच होतं की !
:)
ख्या ख्या भारी. मिपाला