मुघल्स
नौपाडा पोलीस स्टेशन कडून हरिनिवास सर्कल कडे येतांना डावीकडे मुघल्स म्हणून नवीन रेस्त्र्रोन निघालाय ...मागच्या भोजनालयाचा अनुभव बर्यापैकी ताजा असतांना नवीन काही ट्राय करण्याचा उत्साह उणावलेला ...पण तरीहि गेलो ...
अजून सगळे नीट स्थिर स्थावर होतंय तिथे ...नवीन संसार मांडलेला कळतोय आणि बऱ्याच बाबी खटकायला सुरुवात होते न होते तोच मेनू कार्ड समोर आले ... एरवी पेक्षा किंचित महाग डिशेश वाटल्या पण भुके पोटी इतरत्र जायचे त्राण नव्हते तेव्हा .. १ चिकन राजस्थानी, एक पनीर अद्र्की धनिया, रोटी, जीरा रैस आणि दही इतके मागवले (तिघांसाठी)
आणि वाहवा ....
पुलंनी म्हटल्या प्रमाणे मुर्गी घासाघासाला दाद घेत गेली ...पनीर अप्रतिम ...आणि जीरा राईस सारखा यक्ष्ट्रा पण भाव खाऊन गेला ...
बिल ९७० अंमळ जास्त वाटले पण तरीही बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवीन चाखले आणि ते इतके उत्तम निघाले ....त्यांची पुण्यात शाखा आहे म्हणे क्याम्पात ...कोणतेही पंजाबी चवीचे पदार्थ इथे दिले जाणार नाहीत असे चालक ठासून सांगत होते ...
आहे तसे नीट राखले आणि शोर्ट कट्स मारले नाहीत तर भविष्यात खवैय्याना एक उत्तम पर्याय मिळेल ...
तस्मात पुढील कट्टा तिथे व्हावयास हरकत नाही ....
वर्गीकरण
वाचने
3227
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
पत्ता द्या
In reply to पत्ता द्या by लालगरूड
पत्ता :
आमेन
काही फोटो टाकले असते तरी
In reply to काही फोटो टाकले असते तरी by खटपट्या
क्षुधार्त
//...कोणतेही पंजाबी चवीचे
ठाण्यात मामलेदार सोडून बाकी गोष्टीही मिळतात तर!
In reply to ठाण्यात मामलेदार सोडून बाकी गोष्टीही मिळतात तर! by बोका-ए-आझम
योगायोगाचा गोष्टी
In reply to योगायोगाचा गोष्टी by अत्रन्गि पाउस
ती मामलेदारची शाखा नाही.
हम्म जाऊन आलोय मुघल ला
In reply to हम्म जाऊन आलोय मुघल ला by वरुण मोहिते
मुलुंडला कुठे ?
मोगलाई